बॉडी बनवण्याच्या नादात घेऊ नका प्रोटीनचे ओव्हरडोस नाहीतर…

Spread the love

बॉडी बिल्डिंग आणि प्रोटीन डायट

जेव्हा तुम्ही जिम जॉईन करता तेव्हा सुरुवातीपासूनच तुम्हाला प्रोटीन डायट घेण्याचा आग्रह केला जातो. अर्थात यामागे त्यांचे व्यावसायिक कारण सुद्धा असते आणि प्रोटीन घेतल्यास लवकर बॉडी कमावता येते असे तरुणांच्या मनात भरवले जाते. पण हि गोष्ट सुद्धा खरी आहे की यात काही खोटेपणा नाही. प्रोटीन मुळे नक्कीच शरीर मस्क्युलर बनू शकते. पण त्याचा अतिरेक होऊ न देणे हि आपली जबाबदारी आहे. कारण जर प्रोटीनचा ओव्हरडोस झाला तर अनेक शारीरिक समस्यांना ते आमंत्रण ठरू शकते आणि शरीराची अवस्था खराब होऊ शकते.

(वाचा :- ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश अन्यथा भोगावे लागतील दुष्परिणाम!)

प्रोटीन शेक घेताना या गोष्टींची घ्यावी काळजी

जर तुम्ही तुमच्या जिम ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली प्रोटीन डायट घेत असाल तर ते तुम्हाला तुमच्या आहारातील बदल आवर्जून सांगतील. कारण जेव्हा तुम्ही प्रोटीन डायट घेण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्ही तूमचा नेहमीचा सामान्य आहार घेऊ शकत नाही. जर त्यांनी स्वत:हून तुम्हाला याबद्दल काही सांगितले नाही तर तुम्ही त्यांना दिवसभर तुम्ही काय काय खाता ते अवश्य सांगा. जेणेकरून तुम्हाला नेमक्या किती प्रोटीनची गरज आहे ते ठरवून तुमच्या प्रोटीन शेकची मात्रा ठरवली जाईल.

(वाचा :- अवयव दान कसं करतात आणि कोणत्या अवस्थेतील अवयव दुस-याच्या कामी येऊ शकतात?)

डायटमध्ये घ्या या गोष्टींची काळजी

जर तुम्ही नेहमी प्रोटीन शेकचे सेवन करत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या दिवसातील तिन्ही जेवणांमध्ये अजिबात डाळीचे सेवन करू नका. कारण डाळीमध्ये आधीपासूनच खूप प्रोटीन असते. अशावेळी तुम्ही दिवसातून केवळ एकदाच डाळीचे सेवन करा आणि प्रोटीनचे प्रमाण संतुलित ठेवा. अनेक जण असे असतात की ज्यांना कुठून तरी कानी पडलेलं असतं की जितकी जास्त डाळ खाऊ तेवढा शरीराला फायदा होईल. पण हे सुद्धा चुकीचे आहे कारण अश्याने डाळीमधून सुद्धा प्रोटीनचा अतिरेक होऊ शकतो.

(वाचा :- जाणून घ्या नाश्त्यापासून डिनरपर्यंतच्या योग्य वेळा, अवेळी जेवत असाल तर लठ्ठ होणारच!)

जास्त प्रोटीनमुळे निर्माण होणाऱ्या समस्या

प्रोटीन हे आपल्या शरीराला निरोगी आणि स्यायुंना मजबूत करण्यासाठी खूप गरजेचे आहे. पण याचा अर्थ हा अजिबात नाही की प्रोटीनचा ओव्हरडोस तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक चांगल्या गोष्टीची एक मर्यादा असते जर त्या मर्यादेपेक्षा जास्त त्या गोष्टीची मात्र झाली तर ती गोष्ट वाईटच ठरते. जास्त प्रोटीनमुळे स्नायू निर्माणाची जागा कमजोर होऊ शकते. आता आपण पाहूया अधिक प्रमाणात प्रोटीन घेतल्याने सामान्यत: कोणत्या समस्या उद्भवतात.

(वाचा :- संजय दत्त ग्रस्त असलेल्या फुफ्फुसाच्या कर्करोगाची 3 री स्टेज आयुष्यासाठी किती धोकादायक?)

काही सामान्य समस्या

पोटात गॅस तयार होणे, घेतलेला आहार योग्य पद्धतीने न पचणे, नेहमी पोट आणि पूर्ण शरीर जड जड भासणे, विष्ठा योग्य प्रकारे न होणे. विष्ठा करताना वेदना होणे, पायदुखी सुरु होणे, चालताना किंवा उभे राहिल्यावर पायाच्या टाचा दुखणे, या शिवाय सुद्धा अनेक गंभीर आजार योग्य वेळेस प्रोटीनचा ओव्हर डोस न थांबवल्यास होऊ शकतात. म्हणून जर तुम्हाला शरीर कमवायचे असेल, बॉडी बिल्डर व्हायचे असेल तर व्यायामाचाच आधार घ्या आणि प्रोटीनचे प्रमाण मर्यादित ठेवा. कोणताही शोर्टकट हा घातक असतो हे नेहमी लक्षात असू द्या.

(वाचा :- मध आणि लिंबूचे एकत्रित सेवन केल्यास…)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *