बॉयफ्रेंडसोबत दिसली सुष्मिता सेन, प्रेमात आकंठ बुडालेल्या या कपलचा स्टायलिश लुक लई भारी

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि रोहमन शॉल (Rohman Shawl) या दोघांनीही त्यांच्या नात्याची माहिती चाहत्यांसोबत फार पूर्वीच शेअर केली आहे. हे कपल अनेकदा सोशल मीडियावरही त्यांच्यातील खास बॉन्डिंग व्यक्त करताना दिसत असते. एवढंच नव्हे सार्वजनिक ठिकाणी असतानाही या दोघांमधील सुंदर ट्युनिंग स्पष्टपणे पाहायला मिळते.

काही दिवसांपूर्वी देखील असेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले. सुष्मिता सेन आपल्या नवीन वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. रोहमन सुद्धा तिला प्रमोशनमध्ये मदत करताना दिसतोय. प्रमोशनसाठी सुष्मिता बॉयफ्रेंड रोहमन सोबत मुंबईतील वांद्रे याठिकाणी पोहोचली होती. यादरम्यान कपलचा स्टायलिश लुक चाहत्यांना पाहायला मिळाला.
(सचिन तेंडुलकरची लाडकी लेक साराचा फॅशनेबल लुक, तिच्या स्टाइलला कोणीही देऊ शकत नाही टक्कर)

​फॉर्मल लुकमध्ये कलरफुल टच

सुष्मिता सेनने फॉर्मल आउटफिट परिधान केले होतं. तिच्या फॉर्मल टॉपला कलरफुल टच देण्यात आला होता. या रंगीबेरंगी टॉपवर तिनं काळ्या रंगाची स्ट्रेट कट ट्राउझर परिधान केल्याचे तुम्ही पाहू शकता. या पँटला क्लासिक कट पॉकेट्स डिझाइन देण्यात आलं होतं. सुष्मिताने यासह निळा, जांभळा, पिवळा, लाल रंगाचा ह्यूज टॉप मॅच केला होता. टॉपच्या नेकलाइनवर व्ही- कट डिझाइन तुम्ही पाहू शकता. टॉपचे पीजेंट डिझाइन स्लीव्ह्ज होते, ज्याची लांबी मनगटापर्यंत होती.

(अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल. राहुलचे एकसारखेच कपडे? फोटो झाले होते व्हायरल)

​फ्लॅट्स व सनग्लासेसमुळे स्टाइलमध्ये पडली अधिक भर

सुष्मिताने आपल्या या आउटफिटवर बेलीज मॅच केले होते. त्याचे कलर कॉम्बिनेशन न्यूड आणि काळ्या रंगाचे होते, जे तिच्या आउटफिटच्या रंगाशी मॅचिंग होते. तसंच तिनं टू-शेड्स सनग्लासेस देखील घातले होते, ज्यामुळे तिच्या फॅशनेबल लुकमध्ये अधिक भर पडली होती. सुष्मिताने केस मोकळे ठेवले होते आणि साइड पार्टिशन देत केस किंचितसे वेव्ह स्टाइल केले होते. तिने अतिशय कमीत कमी मेकअप करण्यावर भर दिला होता.

(करीना कपूरचे शूटिंगमधील फोटो केले शेअर, सुंदर फोटो पाहून चाहते झाले घायाळ)

​रोहमनने गर्लफ्रेंडच्या वेब सीरिजचे केलं प्रमोशन

सुष्मिता सेन आपल्या वेब सीरिजचे प्रमोशन करण्यासाठी वांद्रे येथे पोहोचली होती. तिच्यासोबत बॉयफ्रेंड रोहमन शॉल देखील होता. या कार्यक्रमासाठी त्यानं अ‍ॅथलेझर आउटफिटची निवड केली होती. रोहमन काळ्या रंगाची पँट आणि टी – शर्ट परिधान केलं होतं. हे हाफ स्लीव्ह्ज टी शर्ट घालून त्यानं गर्लफ्रेंड सुष्मिताच्या नवीन वेब सीरिजचे प्रमोशन केलं. टी-शर्टच्या पुढील बाजूस सुष्मिताच्या वेब सीरिजचे नाव प्रिंट करण्यात आले होतं. तर मागील बाजूस प्रॉडक्शन हाउसचे नाव दिसत आहे. (फोटो क्रेडिट : योगेन शाह)

(मलायका अरोराचा ग्लॅमरस अवतार, पाहा पारंपरिक ते वेस्टर्न लुकमधील स्टायलिश फोटो)

स्टायलिश कपल ​: सुष्मिता-रोहमन

प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडप्याच्या स्टाइलबाबत सांगायचे झाले तर हे दोघंही अन्य सेलिब्रिटी जोडप्यांना तगडी टक्कर देताना दिसतात. हे दोघंही आपले स्टायलिश अवतारातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. या फोटोमध्ये सुष्मिता आणि रोहमनचा फॅशनेबल तसंच ट्रेंडी लुक पाहायला मिळतो.

(सिनेमातील त्या सीनसाठी जेव्हा मनीष मल्होत्राने वापरलं चक्क राणी मुखर्जीच्या आईचे मंगळसूत्र)

​फॅशन आहे फर्स्ट क्लास

सुष्मिता सेनची फॅशन नेहमीच फर्स्ट क्लास असते. दुसरीकडे रोहमन देखील मॉडेल आहे. त्यामुळे त्याची स्टाइल सुद्धा अप्रतीम अशीच असते. सुष्मिता आणि रोहमन स्वतःचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान सुष्मिताची फॅशन फॉलो करणाऱ्यांची संख्या आजही कमी झालेली नाही.

(मिस युनिव्हर्स स्पर्धेशी संबंधित ‘ही’ घटना, ज्यामुळे सुष्मिताला आवरले नव्हते अश्रू)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *