बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा ग्लॅमरस अवतार, तिचे हे स्टायलिश फोटो पाहिले आहेत का?

Spread the love

‘टिप-टिप बरसा पानी’ या गाण्यामध्ये शिफॉनची साडी नेसून चाहत्यांना आपल्या बोल्ड अवताराने घायाळ करणाऱ्या रवीना टंडनला खासगी आयुष्यातही ग्लॅमरस आउटफिट (Fashion Tips) परिधान करणं पसंत आहे. अभिनेत्री रवीना टंडनने मोठ्या पडद्यावर आतापर्यंत कित्येक दमदार भूमिका निभावल्या आहेत. शानदार अभिनयाप्रमाणेच रवीना टंडनची स्टाइल (Raveena Tandon Fashion) देखील अप्रतिम आहे.

तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या आजही भलीमोठी आहे. एखाद्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचे असल्यास किंवा टीव्ही शोमध्ये हजेरी लावायची असल्यास, ही अभिनेत्री हटके लुक कॅरी करते. सोशल मीडियावर रवीनाचे एकापेक्षा एक स्टायलिश लुक पाहिल्यानंतर तिच्या वयाचा अंदाज बांधणे खरंच कठीण ठरते. तुम्हीही या अभिनेत्रीच्या स्टाइलचे चाहते आहात का? चला तर पाहुया तिचे फॅशनिस्ता लुकमधील काही मोहक फोटो. (सर्व फोटोंचे क्रेडिट: योगेन शाह आणि इन्स्टाग्राम)
(प्रसिद्ध डिझाइनर तरुण तहिलियानीने लाँच केले ब्रायडल लेहंग्यांचे नवं कलेक्शन)

​बोल्ड फिश टेल गाउन

एका रेड कार्पेट कार्यक्रममध्ये आपली हटके उपस्थिती दर्शवण्यासाठी रवीना टंडनने गडद लाल रंगाच्या फिशटेल गाउनची निवड केली होती. या ड्रेसवर ऑफ शोल्डर डिझाइनसह बिशप स्लीव्ह्ज होते. बॉडीकॉन फिटिंगच्या या ड्रेसमध्ये रवीना सुंदर दिसत होती. रवीनाच्या गाउनमध्ये फिशटेल डिझाइन देखील जोडण्यात आलं होतं. ज्यामुळे तिला जलपरीसारखा लुक मिळाला होता. अभिनेत्रीनं लाइट टोन मेकअपसह वेव्ही हेअर स्टाइल केली होती.

(प्रेग्नेंसीमध्ये अनुष्का शर्मा परिधान करतेय अशा प्रकारचे स्टायलिश आउटफिट)

​मोहक लुक

एक कार्यक्रमासाठी रवीना टंडनने सीक्वंस वर्क असणारा हा राखाडी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ए सिमेट्रिकल कट, फुल स्लीव्ह्ज, स्लिट आणि डीप वी कट नेकलाइन डिझाइन होतं. रवीनाने या ड्रेसवर गडद गुलाबी रंगाची स्ट्रॅप हील्स मॅच केली होती. तसंच या लुकसाठी तिनं लाइट टोन मेकअपसह स्मोकी आईज लुक आणि वेव्ही हेअर स्टाइल केली होती. रवीनाचा हा लुक स्टायलिश होता.

(नीता अंबानींची सून श्लोका मेहताचे ‘या’ दागिन्यांवर आहे अत्यंत प्रेम, पाहा फोटो)

​ग्लॅमरचा तडका

पांढरा आणि आयव्हरी रंगाचे कपडे परिधान करणं बहुतांश जण टाळतात. पण रवीनानं जेव्हा या रंगाचा स्लिट गाउन परिधान केला होतो तेव्हा उपस्थितांची नजर तिच्यावरच खिळली होती. त्वचेच्या रंगाशी मिळत्या-जुळत्या असणाऱ्या कापडावर आयव्हरी रंगाचे शीअर मटेरिअल जोडण्यात आले होतं. या गाउनवरील सुंदर सीक्वंस वर्कही तुम्ही पाहू शकता. या गाउनचं फिटिंग बॉडीकॉन डिझाइनसारखे होते. याव्यतिरिक्त गाउनमध्ये डीप कट नेकलाइन आणि हाय स्लिट देखील जोडले होतं. रवीनाने स्टेटमेंट ईअररिंग्स, स्लीक बन आणि गडद लाल रंगांचे लिपस्टिक असा ग्लॅमरस टोन मेकअप केला होता.

(Fashion Tips को-ऑर्ड ड्रेसची क्रेझ! का वाढतेय या स्टायलिश पॅटर्नची मागणी?)

​लेडी बॉस लुक

लेडी बॉस लुकमध्येही स्वतःला ग्लॅमरस टच कसा द्यायचा, हे तुम्ही रवीना टंडनच्या या फोटोद्वारे पाहू शकता. गडद चॉकलेटी आणि निळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेला हा शिमरी लुकिंग सूट अभिनेत्रीने कॉर्सेट ब्रालेटसह मॅच केला होता. या आउटफिटवर रवीनाने स्ट्रॅप हील्स मॅच केल्या होत्या. वेव्ही हेअर स्टाइलमुळे तिचा लुक अधिकच आकर्षक दिसतोय.

(करीना कपूरने परिधान केला आतापर्यंतचा सर्वात सुंदर ड्रेस, चाहत्यांना आवडला लुक)

​पेन्सिल स्कर्ट आणि शर्ट

साधारणतः ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिला- तरुणींना तुम्ही अशा प्रकारच्या लुकमध्ये अनेकदा पाहिलं असावं. पण रवीनानं या लुकमध्येही फॅशन एलिमेंट जोडल्याने तिचा अवतार सुपरस्टायलिश दिसत आहे. अभिनेत्रीनं एक कार्यक्रमासाठी गोल्डन सीक्वंस वर्क असणारा स्कर्ट आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे शर्ट परिधान केलं होतं. या पोषाखावर रवीनाने स्टेटमेंट ईअररिंग्स मॅच केले होते.

(सारा अली खानची ‘ही’ साडी पाहून नेटिझन्सना हसू आवरेना, अशा केल्या होत्या कमेंट्स)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *