बॉलीवूडमधील या अभिनेत्रींना प्रेग्नेंसीमध्ये योगाभ्यास केल्याने झाले होते भरपूर लाभ!

Spread the love

करीना कपूर

करिना कपूर सध्या दुसऱ्या मुलाची आई होणार आहे. त्यामुळे ती नियमित योग करतेच. पण या आधीच्या गरोदरपणावेळी सुद्धा तिने आवर्जून योगवर भर दिला होता. त्याचे फलित म्हणून एक सुदृढ आणि अतिशय निरोगी असे पुत्ररत्न तिला तैमुरच्या रुपात लाभले. पण करिना कपूरने फक्त गरोदरपणाच्या वेळीच योग केला असे नाही तर त्या आधीपासून कित्येक वर्ष तिने योगला समर्पित केली आहे. तिच्या झिरो फिगरच्या रहस्यामागे योगचा खूप मोठा हातभार आहे. आपले हे शरीर सौंदर्य लवकर लयास जाऊ नये म्हणून ती दरोरोज एक ठराविक वेळ खास योगसाठी देते.

(वाचा :- प्रेग्नेंसीच्या प्रत्येक आठवड्यात किती टक्के असतो गर्भपाताचा धोका?)

शिल्पा शेट्टी

शिल्पाने २०१२ मध्ये मुलाला जन्म दिला. त्या आधी तिला स्वस्थ राहण्यासाठी योग करण्याचा सल्ला तिच्या डॉक्टरांनी दिला. त्याचे फळ म्हणून तिची डिलिव्हरी उत्तम झालीच पण मुलगा देखील निरोगी लाभला. यामुळे शिल्पा योगकडे अधिक आकर्षित झाली. डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी सुद्धा तिने योगचाच आधार घेतला. आज ती सुद्धा एक स्लिम लेडी म्हणून बी टाऊन मध्ये प्रसिद्ध आहे. तिच्या इतक्या वर्षाच्या योग साधनेचे फलित म्हणून सध्या ती एक योग एक्सपर्ट म्हणून सुद्धा काम करते. अनेक मोठ मोठे लोक खास तिच्याकडून योगच्या टिप्स घेतात.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये चालण्याचे लाभ तेव्हाच मिळतील जेव्हा ‘या’ गोष्टींचं तंतोतंत पालन कराल!)

लारा दत्ता

बॉलीवूडची एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आणि टेनिसपटू महेश भूपती यांची बायको लारा दत्ता हिने सुद्धा आपल्या गरोदरपणात सुदृढ राहण्यासाठी योगची निवड केली. अनेक जणांकडून तिने गरोदरपणात योग केल्याने होणारे फायदे ऐकले होते. त्यांचे अनुभव तिला भावल्याने तिने सुद्धा गरोदरपणात न चुकता योग केला आणि आता ती इतरांना आवर्जून योग करण्याचे सल्ले देते. तिने गरोदरपणातच अनेकदा सोशल मीडियावर आपल्या योग अभ्यासाचे व्हिडीओज आणि फोटोज टाकून योगचे महत्त्व लोकांना सांगण्यास सुरुवात केली होती.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये शारीरिक उष्णतेची समस्या भेडसावते आहे? मग ट्राय करा ‘हे’ घरगुती उपचार!)

सोहा अली खान

सैफ अली खानची बहिण आणि करीना कपूरची नणंद सोहा अली खान ही सुद्धा योग अभ्यासात निपुण आहे. 2017 मध्ये गरोदर असताना तिने करीना कपूरच्या सांगण्यावरून योगचे धडे गिरवायला सुरुवात केले. यामुळे ती स्वत: तर सुदृढ राहीली पण तिला लाभलेले कन्यारत्न सुद्धा निरोगी आणि गोंडस जन्माला आले. लारा दत्ताप्रमाणे तिला सुद्धा योगचे महत्त्व पटल्याने तिने ही सोशल मीडियावरून आपल्या योग अभ्यासचे फोटोज व व्हिडिओज शेअर करून गरोदर स्त्रियांना गरोदरपणात योग करण्यास प्रोत्साहित केले.

(वाचा :- सिझेरियन डिलिव्हरी रोखायची आहे? मग यावर करा कंट्रोल!)

योगासनांचे फायदे

गरोदरपणात योग केल्याने शरीर संतुलित राहते. यामुळे गर्भाशय ग्रीवाच्या आसपासच्या स्नायुंवरील दबाव कमी होतो आणि शरीर डिलिव्हरी साठी तयार होते. प्राणायाम आणि योग केल्याने योग्य प्रकारे श्वास घेण्यात मदत मिळते व शरीर एकदम रीलॅक्स राहते. योगमुळे स्त्रिया डिलिव्हरी मध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यास सक्षम होतात. यामुळे जर तुम्ही गरोदर असाल वा ओळखीच्या लोकांमध्ये कोणी गरोदरपणाच्या काळात असेल तर आवर्जून त्यांना योगचे महत्त्व पटवून द्या.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर पोटाची व कंबरेची मालिश करणं का असतं आवश्यक?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *