ब्राह्मीमध्ये आहे अँटी-एजिंगचा फॉर्म्युला, औषधी वनस्पतीपासून तयार केलेल्या Cica Creamचे ‘हे’ आहेत फायदे

Spread the love

​औषधी वनस्पती ‘ब्राह्मी’

ब्राह्मी ही एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीस मेंदूची कार्यक्षमता वाढवणारी वनस्पती म्हणून मानले जाते. ब्राह्मीचे वैज्ञानिक नाव ‘सेंटेला असायटिका’ असे आहे. तर सामान्यतः ही वनस्पती ‘मण्डूकपर्णी’ आणि ‘जल ब्राह्मी’ या नावाने ओळखली जाते. कित्येक आजार दूर करण्यासाठी ब्राह्मीचा आयुर्वेदिक उपचारांमध्ये उपयोग केला जातो.

(नितळ व डागविरहित त्वचेसाठी रात्री चेहऱ्यावर अशा पद्धतीने लावा कोरफड जेल)

​सिका क्रीमचा उपयोग कधी करावा?

वास्तविक सिका क्रीम सर्व प्रकारच्या त्वचेसाठी लाभदायक मानली जाते. विशेष म्हणजे ही क्रीम संवेदनशील त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. या क्रीममध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. या क्रीमचा उपयोग आपण केमिकल पील, IPL ट्रीटमेंट किंवा रेटिनॉल यासारख्या क्रीम लावल्यानंतरही करू शकता. या क्रीमच्या उपयोगामुळे कोलेजनचे उत्‍पादन वाढते. ज्यामुळे चेहऱ्यावर दिसणारी वृद्धत्वाचे लक्षणे कमी होण्यास मदत मिळते.

(थंडीत बॉडी मसाज का करावा, आयुर्वेदानुसार कोणते तेल वापरल्यास मिळतील जास्त लाभ? जाणून घ्या)

​ब्राह्मीयुक्त सिका क्रीमचे फायदे

ब्राह्मीपासून तयार केलेले क्रीम किंवा जेल लावल्यास स्‍ट्रेच मार्कची समस्या कमी होऊ शकते. या औषधी वनस्पतीतील पोषक घटकांमुळे स्ट्रेच मार्कचे निशाण हळूहळू कमी होऊ लागतात. यामुळे त्वचेच्या आतील पेशी आणि फायब्रोब्लास्ट्सचे उत्पादन जलदगतीने होऊ लागते, ज्यामुळे शरीरावर दिसणारे स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत मिळते.

(चेहऱ्याची त्वचा अशी डिटॉक्स करते अनुष्का शर्मा, तजेलदार त्वचेसाठी असं फॉलो केलं जातं रुटीन)

​जखम भरण्यासाठी

या क्रीमच्या वापरामुळे जखम लवकरात लवकर भरण्यास मदत मिळते. कारण यातील पोषण तत्त्व जखमेच्या भागातील पेशींचे उत्पादन वाढवण्याचे कार्य करतात. एवढंच नव्हे तर नवीन रक्तवाहिन्यांचीही निर्मिती करतात आणि जखम लवकर ठीक करतात.

(Skin Care Tips पिंपलमुळे आहात त्रस्त? अशा पद्धतीने चेहरा ठेवा स्वच्छ व मॉइश्चराइझ)

​चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी

ब्राह्मीमधील पोषण तत्त्व आपली त्वचा सैल पडू देत नाहीत. फ्लेवोनोइड्स नावाच्या फायटोन्युट्रिएंट्सचे उत्तम स्त्रोत म्हणजे ब्राह्मी. हा घटक आपल्या त्वचेसाठी अँटी-ऑक्सिडंटच्या स्वरुपात कार्य करतात आणि फ्री रॅडिकल्सच्या समस्येपासून आपल्या त्वचेचं संरक्षण करतात. हे कोलेजन आणि त्वचेतील टिशूचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात. ज्यामुळे त्वचा तरूण आणि चमकदार दिसते.

(हिना खानने शेअर केलं ब्युटी सीक्रेट, चमकदार त्वचेसाठी लावते स्‍ट्रॉबेरी फेस पॅक)

​त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी

संशोधनातील माहितीनुसार, एखाद्या जखमेवरील टाके काढल्यानंतर सहा ते आठ आठवड्यापर्यंत त्वचेवर ब्राह्मीची क्रीम लावावी. यामुळे जखमेचे व्रण कमी होण्यास मदत मिळते. दिवसातून दोनदा या क्रीमचा वापर करावा.

(स्ट्रॉबेरी लेग्समुळे मुलींचे पाय दिसतात खराब, ही समस्या दूर करण्यासाठी जाणून घ्या सोपे उपाय)

NOTE त्वचेशी संबंधित कोणतेही औषधोपचार करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच दुसऱ्या व्यक्तीचे स्किन केअर रुटीन फॉलो करू नये. कारण प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार एकसारखा नसतो.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *