ब्रेकअपनंतर व्यक्तीत होतात ‘हे’ मोठे बदल!

Spread the love

कमिटमेंटपासून दूर राहणे

ज्या व्यक्तीचे ब्रेकअप होते आणि ती व्यक्ती जेव्हा नव्या नात्यामध्ये जाते तेव्हा नव्या जोडीदाराला कमिटमेंट देण्याचे टाळते. अर्थात हे नातं मी खरंच आयुष्यभरासाठी टिकवेन असे वचन ती देत नाही. अर्थात या मागे समोरच्याला फसवण्याचा त्या व्यक्तीचा उद्देश नसतो तर आपली झालेली फसवणूक ती व्यक्ती विसरलेली नसते. म्हणून नवं नातं खरंच कितपत टिकेल का याची त्या व्यक्तीलाच शाश्वती नसते. त्यामुळे हा एक मोठा बदल घडतो की ब्रेकअप झाल्यावर आयुष्यात जे जोडीदार येतात त्यांना कमिटमेंट देण्यास मन धजावत नाही.

(वाचा :- गडगंज श्रीमंत धीरुभाई व कोकिलाबेन अंबानी यांची साधी पण आकर्षक प्रेमकहाणी!)

जास्त स्वाभिमान

ज्या व्यक्तीवर आपण खरं प्रेम करतो त्या व्यक्तीसाठी आपण आपला सर्व स्वाभिमान सोडून दिलेला असतो. त्या व्यक्तीसाठी काहीही म्हणजे काहीही करण्याची आपली तयारी असते. पण जेव्हा ती व्यक्ती सोडून जाते तेव्हा आपल्याला आपली चूक कळते की आपण आपला स्वाभिमान प्रेमात सोडून देणे हे चूक आहे. त्यामुळे ब्रेकअप झाल्यावर तो स्वाभिमान पुन्हा जागृत होतो आणि इतर कोणत्याही व्यक्तीसाठी तो पुन्हा सोडून देता येत नाही.

(वाचा :- लग्नाआधी नवरीला कधीच विचारु नयेत ‘हे’ ५ प्रश्न!)

प्रॅक्टीकल होणं

ब्रेकअप हे माणसाला प्रॅक्टीकल बनवते. आजवर भावनेत अडकून पडलेला व्यक्ती ब्रेकअप मुळे ताळ्यावर येतो आणि त्याला कळते की कोणात जास्त अडकून राहणे हे आपल्यासाठीच धोकादायक आहे. कारण समोरच्या व्यक्तीला त्याचा जास्त त्रास होत नाही पण आपल्याला खूप त्रास होतो. ही गोष्ट लक्षात आल्यावर साहजिकच ती व्यक्ती इमोशनलपणा सोडून प्रॅक्टीकलपणावर भर देते आणि शक्य तितकं प्रॅक्टीकल राहण्याचा प्रयत्न करते. आयुष्यात नवीन व्यक्ती आली तरी तिच्यात जास्त अडकून राहत नाही. हा अजून एक मोठा बदल ब्रेकअप नंतर व्यक्तीमध्ये घडतो.

(वाचा :- समाजाच्या ‘या’ प्रश्नांमुळे स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही भोगावा लागतो मनस्ताप!)

कुटुंब आणि मित्रमैत्रिणींना जास्त वेळ

माणूस जेव्हा प्रेमात असतो तेव्हा त्याला इतर जगाशी काहीही पडलेली नसते. त्या व्यक्तीसाठी आपला जोडीदारचं सर्वस्व असतो. यामुळे कुटुंबातील रक्ताचे लोक, मित्र मैत्रिणी यांच्याशी संबंध तुटतो आणि त्यांच्याशी असलेले नाते काहीसे दुरावले जाते. प्रेमात असलेल्या माणसाला तुम्ही या गोष्टी कितीही समजावून सांगितल्या तरी तो ऐकणार नाही. पण जेव्हा ब्रेकअप होते आणि मानसिक आधार द्यायला हीच सगळी लोकं मदत करतात तेव्हा त्या व्यक्तीला आपली चूक कळते आणि ती व्यक्ती आपल्या कुटुंबाला आणि मित्र मैत्रिणींना जास्त प्राधान्य देते. त्यांच्या सोबत राहून तिला आनंद सुद्धा मिळतो.

(वाचा :- लॉकडाऊनमुळे नात्यांमध्ये जाणवतोय जीवघेणा तणाव? मग असा जपा नात्यांतील जिव्हाळा!)

करियरवर फोकस

ब्रेकअप नंतरचा सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ती व्यक्ती करियर वर फोकस करू लागते. प्रेमाच्या नादात आपलं आपल्या करियरकडे झालेलं दुर्लक्ष पाहून त्या व्यक्तीला पश्चाताप होतो आणि प्रेम वगैरे सगळं खोटं असतं हा समज मनात घेऊन ती व्यक्ती आपल्या करियरवर लक्ष केंद्रित करते. या दरम्यान ती व्यक्ती नवीन व्यक्तींना सुद्धा आपल्या आयुष्यात येऊ देत नाही. तर मंडळी अशाप्रकारे ब्रेकअपचे विविध साईड इफेक्ट्स दिसू लागतात आणि व्यक्तीच्या आयुष्यात बदल घडतो.

(वाचा :- ‘या’ कारणामुळेच आजची तरुण मंडळी अरेंज्ड मॅरेजपेक्षा प्रेमविवाहावर ठेवतात विश्वास!


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *