ब्रेस्ट मिल्क कमी असल्याने बाळाची भूक भागत नाही? जाणून घ्या ५ सामान्य कारणे व उपाय!

Spread the love

बाळाचे योग्यरित्या संगोपन होणे हा बाळाच्या जन्मानंतरच्या शारीरिक विकासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. बाळ जन्माला आल्यावर पहिले 6 महिने केवळ आईच्या दुधावरच वाढते. आईच्या दुधात सर्व पोषण तत्वे असतात जी या 6 महिन्यात बाळाला मिळतात. दुसरी गोष्ट म्हणजे जण झाल्यावर बाळाची पचनसंस्था जास्त मजबूत नसते. त्यामुळे त्याला अन्य पदार्थ पचन नाही. त्याला केवळ आईचेच दूध पचते कारण ते पचण्यास हलके असते.

सामान्यत: स्त्रियांमध्ये दुधाचा तुटवडा जाणवत नाही. मात्र काही स्त्रिया अशा असतात ज्यांना या समस्येला सामोरे जावे लागू शकते. यामुळे बाळाच्या विकासात बाधा येते. कधी कधी बाळाला फोर्म्यूला दूध पाजावे लागते किंवा अन्य स्त्रीचे दुध पाजावे लागते. आपण आपल्याच बाळाची भूक भागवू शकत नाही ही गोष्ट कोणत्याही स्त्रीसाठी वेदनादायक असते. आज आपण जाणून घेऊया की अशी कोणती कारणे आहेत जी स्तनपानात अडथळा निर्माण करतात.

गर्भनिरोधक गोळ्या

एका विशिष्ट वयातच मुल झाले पाहिजे हा विचार करून अनेक स्त्रिया संभोगानंतर धोका नको म्हणून गर्भनिरोधक गोळ्या घेतात. कोणतीही गोष्ट एका विशिष्ट प्रमाणात घेणे फायद्याचे असते पण त्यापेक्षा जास्त प्रमाण झाल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात आणि हीच गोष्ट गर्भनिरोधक गोळ्यांना देखील लागू होते. त्यामुळे अनेकदा स्त्रियांकडून गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन झाल्यास त्याचा परिणाम स्तनातील दुधावर होऊ शकतो. यामुळे गरोदरपणानंतर बाळाला स्तनपान करण्याची वेळ येते तेव्हा कमी मात्रामध्ये दुध बाहेर पडते. या समस्येला सामोरे जायचे नसेल तर गर्भनिरोधक गोळ्यांव्यतिरिक्त अन्य पर्याय वापरून पहा.

(वाचा :- चारचौघात मुलांवर हात उगारताय? मग थांबा, नाहीतर मुलांवर होतील ‘हे’ वाईट परिणाम!)

थायरॉइड असंतुलन

गरोदरपणात अनेक स्त्रियांना थायरॉइड असंतुलनाला सामोरे जावे लागते आणि हे सुद्धा कमी दूध येण्याचे कारण ठरू शकते. थायरॉइडची समस्या असली तरी अनेक स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष करतात. या थायरॉइडच्या समस्येमुळे अनेकदा स्त्रियांना दीर्घकालीन समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकीच एक समस्या गरोदरपणानंतर स्त्रीयांना त्रास देऊ शकते आणि ती समस्या म्हणजे स्तनांमधून दूध कमी येणे होय. त्यामुळेच वेळीच गरोदर स्त्रीने थायरॉइडवर उपचार घ्यायला हवेत, जेणेकरून त्याचा त्रास तिला व बाळाला भोगावा लागणार नाही.

(वाचा :- अयोग्य बेबी प्रोडक्ट्समुळे मुलांचं होऊ शकतं नुकसान, कशी व काय काळजी घ्यावी?)

ताण तणाव

हो मंडळी, ताण तणाव सुद्धा स्त्रीच्या स्तनांमधील कमी दुधाला कारणीभूत ठरतो. गरोदरपणात स्त्री जेवढा ताण घेते, त्यामुळे कोर्टीसोल घटकाचा स्तर वाढीस लागतो. हा घटक वाढल्यास त्याचा परिणाम थेट स्तनांमधील दुधावर होतो. म्हणून गरोदरपणात स्त्री जे जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. जेवढी ती आनंदी राहील तेवढा कोर्टीसोल हा घटक नियंत्रणात राहील. स्तनांमधील दुधाच्या कमतरतेमुळेच जाणकार सुद्धा स्त्रियांना गरोदरपणात कमीत कमी ताण घेण्याचा सल्ला देतात जेणेकरून ही समस्या निर्माण होऊ नये.

(वाचा :- मुलांना दिवसभर ठेवायचं आहे एनर्जेटिक? मग खाऊ घाला ‘ही’ खास डिश!)

व्यसन

व्यसन हे मानवी शरीरासाठी अजिबात उपयुक्त नाही हे आपण जाणतोच आणि हेच कारण स्त्रियांमध्ये कमी दुधाला कारणीभूत ठरते. अनेक स्त्रियांना धुम्रपान, मद्यपान करण्याची सवय असते. गरोदरपणात तर या वाईट सवयी स्त्रियांनी आवर्जून टाळल्या पाहिजेत. मात्र मनावर नियंत्रण नसल्याने त्या गरोदरपणा सारख्या महत्त्वपूर्ण काळात सुद्धा व्यसनाच्या आहारी जातात. त्याचाच परिणाम म्हणून व्यसन करणाऱ्या अनेक स्त्रियांमध्ये दुधाची कमतरता दिसून येते. केवळ गरोदरपणात व्यसन केल्यानेच नाही तर आधीपासून सुद्धा व्यसनाची सवय असल्यास ही समस्या उद्भवते. त्यामुळे स्त्रियांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये आणि स्वत:ची व बाळाची काळजी घ्यावी.

(वाचा :- मुलांना टिव्ही व मोबाईलपासून ठेवायचं आहे दूर? मग खालील टिप्स नक्की ट्राय करा!)

औषधी वनस्पती

आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल की औषधी वनस्पती तर शरीरासाठी उपयुक्त असतात मग त्यांच्या सेवनाने ही समस्या कशी काय उद्भवू शकते. तर सर्वच औषधी वनस्पतींच्या सेवनाने ही समस्या उद्भवत नाही तर साल्विया, पुदिना आणि अशा काही मोजक्या वनस्पतींच्या सेवनाने स्तनांमधील दुधात कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा वनस्पतींचे सेवन हे कमीत कमी प्रमाणात करावे आणि कोणत्याही प्रकारे आयुर्वेदिक उपचार घेताना एकदा डॉक्टरांचा आणि जाणकारांचा सल्ला आवर्जून घ्यावा.

(वाचा :- मुलांना कोणत्या वयात व कशा पद्धतीने खाऊ घालावेत कांद्याचे पदार्थ?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *