भूक लागल्यानंतर या ३ सूपचा घेऊ शकता आस्वाद, जाणून घ्या ही माहिती

Spread the love

​व्हेजिटेबल सूप

– हंगामानुसार आपण मिक्स व्हेजिटेबल सूप तयार करू शकता. यासाठी आपली आवडती भाजी पाण्यात शिजवून घ्या. सूपसाठी शिमला मिरची, सोयाबीन, मशरूम, हिरवा कांदा आणि बटाटा बारीक चिरून वेगळ्या पॅनमध्ये उकळत ठेवा.

– यानंतर ही सर्व सामग्री आधीच्या सूपमध्ये मिक्स करा. यामध्ये चवीनुसार काळे मीठ, जिरे पावडर इत्यादी आवश्यक पदार्थांचा समावेश करावा.

– सूप घट्ट होण्यासाठी काही जण सामग्रीमध्ये कॉर्नफ्लोर मिक्स करतात. पण अधिक प्रमाणात याचा वापर करणं टाळावे.

(स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या या आजाराचा सामना करतेय सोनम कपूर, चाहत्यांसोबत शेअर केल्या टिप्स)

​बीट सूप

– बीटरूट सूप रेसिपी तयार करण्यासाठी टोमॅटो, बटाटा, कांदा, लसूण, काळी मिरीची पावडर आणि लिंबू रस या सामग्रीचा उपयोग केला जातो. हे सर्व पदार्थ आरोग्यासाठी पोषक आहेत.

– बिटाचे सूप तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये बारीक कापलेला कांदा आणि लसूण फ्राय करून घ्यावा. यानंतर कापलेले बीट, बटाटा आणि टोमॅटो देखील परतून घ्यावा. सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने शिजण्यासाठी पॅनवर झाकण ठेवावा. कुकरमध्ये सूप तयार करणार असाल तर चार शिट्या झाल्यानंतर त्यावरील झाकण काढावे.

(मधुमेह होण्याची नवी कारणे? जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली संशोधनातील महत्त्वाची माहिती)

​मिक्सरमध्ये सामग्री वाटून घ्यावी

– तयार झालेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या. जाडसर पेस्ट तयार करावी. यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये मिश्रण गाळून घ्यावे. त्यामध्ये काळी मिरी आणि लिंबू रस मिक्स करून घ्या. सजावटीसाठी तुम्ही कोथिंबीर वापरू शकता. गरमागरम सूपचा आस्वाद घ्या.

– बिटाच्या सेवनामुळे शरीरामध्ये हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत मिळते. बीटमधील घटक आपल्या त्वचेसाठीही पोषक आहेत. यातील औषधी गुणधर्मामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. बीटमध्ये अँटी ऑक्सिडंट्सचा साठा आहे.

(तास-न्-तास एकाच जागी बसून काम करताय का, हृदयाची काळजी कशी घ्यावी?)

​ऊर्जेचा स्त्रोत

बीटमध्ये कॅल्शिअम देखील असते. हाडे, दातांच्या मजबूतीसाठी बीट लाभदायक आहे.

(कंबरदुखी दूर करण्यासाठी व कमरेच्या स्नायूंसाठी उपयुक्त आसन, वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती)

मुगाचा शोरबा

– मुगाचा शोरबा १० मिनिटांमध्ये तयार होतो. यासाठी अख्ख्या मुगाचा वापर करावा. मूग स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजवून घ्या. तीन ते चार शिट्या होऊ द्याव्यात. या रेसिपीसाठी पाण्याचे प्रमाण जास्त ठेवावे आणि गॅसच्या मध्यम आचेवर मूग शिजवावे.

– आता यामध्ये कोथिंबीर, बारीक कापलेली मिरची, बारीक कापलेला कांद्याची फोडणी द्यावी. मसाला म्हणून केवळ चिमूटभर हळदीचा वापर करावा. थोडेसे मीठ आणि काळी मिरी मिक्स करा व गरमागरम शोरब्याचा आस्वाद घ्यावा.

(आरोग्यासाठी अंडे खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या अंडे शिजवण्याची योग्य पद्धत)

NOTE आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा? किती प्रमाणात करावा? याबाबत आपल्या ओळखीच्या डॉक्टर तसंच आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *