मधुमेह आणा नियंत्रणात, आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाचे

Spread the love

टीम मैफल
भारतीय महिलांना अलीकडे आरोग्याशी निगडित ज्या आजाराचा सामना करावा लागतो, त्यामध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहाची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. या दोन्ही समस्यांवर काही उपाय ‘एम्स’ आणि ‘डायबिटीस फाउंडेशन ऑफ इंडिया’द्वारे सुचवण्यात आले आहेत. एम्स आणि डीएफआयईच्या संयुक्त वतीने केलेल्या एका अध्ययनात असे लक्षात आले आहे, की प्री-डायबिटिक महिलांनी ‘ड’जीवनसत्त्व योग प्रमाणात सेवन केले, तर त्या लठ्ठपणा आणि मधुमेह दोन्हीला नियंत्रणात ठेवू शकतात. दररोज योग्यवेळी उन्हात उभे राहिल्या, तरी ही समस्या दूर होऊ शकते.

चरबी घटवा आणि मधुमेह नियंत्रणात आणा

संशोधकांनी आपल्या अध्ययनामध्ये २० ते ६० वर्षं वयाच्या महिलांना सहभागी केले होते, ज्या प्री-डायबिटिक होत्या. या महिलांचे वजनही सामान्यपेक्षा अधिक होते. संशोधनकर्त्यांच्या असे लक्षात आले, की मधुमेह असलेल्या ज्या महिलांना नियमितपणे उपचारासोबत ‘ड’ जीवनसत्त्व आधार म्हणून दिल्या गेल्याने त्यांच्या रक्तातील शर्करा आणि ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित होत गेले. ज्या महिलांना ‘ड’ जीवनसत्त्व दिले गेले नव्हते, त्या महिलांच्या चाचणीमध्ये मधुमेहचा स्तर वाढलेला दिसून आला.
(Health Care Tips मुतखडा (किडनी स्टोन) : वेळीच उपचार आवश्यक)

विशेष म्हणजे ‘ड’ जीवनसत्त्व दिल्याने महिलांच्या रक्तातील शर्करा आणि ग्लुकोजचा स्तर सामान्याच्या आसपास आला. तसेच, त्यांच्या शरीरातील चरबी बऱ्याच प्रमाणात कमी झाली. ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता ही बऱ्याच लोकांची सामान्य समस्या आहे. भारतातच नाही, तर जगभरात ‘ड’ जीवनसत्त्व कमी असल्याने अनेक प्रकारच्या अडचणी आरोग्याशी जुळलेल्या समस्या म्हणून पुढे येत आहेत. भारतामध्ये उन्हामुळे आवश्यक प्रमाणात ‘ड’जीवनसत्त्व मिळते; परंतु याबाबत झालेल्या संशोधनामध्ये काही वेगळेच सांगितले गेले आहे.
(Neck Pain Exercise मानदुखी टाळण्यासाठी करा या ५ गोष्टी)

प्रत्येकवेळी मोठे कारण


या अध्ययनाचे लेखक आणि फोर्टिस हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अनुप मिश्रा यांच्या मते, वेगवेगळ्या अध्ययनामध्ये असे लक्षात आले आहे, की भारतीयांमध्ये ‘ड’जीवनसत्त्वाची कमतरता मोठ्या प्रमाणात असते. याचे प्रमुख कारण म्हणजे पोटाची वाढलेली चरबी. बहुतांश महिला गृहिणी असून, घर सांभाळण्याचे काम करतात. दिवसभर घरात असल्यामुळे त्यांच्या शरीराला सूर्याचे थेट ऊन मिळत नाही. त्यामुळे त्यांना ‘ड’जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते.
(तोडा वेदनेची शृंखला! व्याधींना दूर ठेवण्यासाठी करा हे उपाय)

१५ मिनिटाचे ऊन पुरेसे


‘ड’जीवनसत्त्वामुळे केवळ हाडांचा विकास होतो असे नाही, तर हाडेही मजबूत होतात; परंतु ‘ड’जीवनसत्त्वासांठी सर्वांत चांगला स्रोत ऊन हाच आहे. आठवड्यातून तीन वेळा १०-१५ मिनिटे उन्हामध्ये राहिल्याने शरीर स्वत:च ‘ड’ जीवनसत्त्व बनवायला लागते. मात्र, यासाठी लोकांकडे वेळ नाही. ‘ड’जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये रिकेट्‌स हा कोरडा आजार आणि मोठ्यांना ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका असतो.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *