मलायका अरोराच्या सर्वात स्टायलिश ड्रेसची लोकांनी उडवली होती खिल्ली

Spread the love

बॉलिवूडच्या सर्वात स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीमध्ये मलायका अरोराच्या (Malaika Arora) नावाचाही समावेश आहे. मलायकाने कधी नो मेकअप सेल्फी तर कधी अल्ट्रा ग्लॅमरस ड्रेस परिधान करून आपल्या चाहत्यांची मने जिंकली जाते. पण कधी- कधी ड्रेसिंग स्टाइलवरूनच तिला भरपूर ट्रोल देखील केले जाते. या अभिनेत्रीच्या वॉर्डरोबमध्ये बॉडी हगिंग ड्रेस साठी खास जागा आहे, ही गोष्ट तिच्या चाहत्यांना माहीत असेलच.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून ते आतापर्यंत मलायका स्टायलिश अवतारातच दिसते. बॉडीकॉन ड्रेसपासून ते वेगवेगळे ग्लॅमरस आउटफिट मलायका परिधान करत असते. पण कधी- कधी कळत- नकळत अति स्टायलिश अवतारामुळेच मलायकाला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जातं.
(मलायका अरोराचा ग्लॅमरस अवतार, पाहा पारंपरिक ते वेस्टर्न लुकमधील स्टायलिश फोटो)

​स्टायलिश ड्रेसमुळे ट्रोल

डेअरिंग नेकलाइन ड्रेसमध्ये स्टायलिश कसे दिसायचं, याबाबत मलायका अरोराला चांगलीच माहिती आहे. मग तिनं मंदिरा विर्कने डिझाइन केलेला बॅकलेस गाउन घातलेला असो किंवा रॉबर्टो कॅवलीचा स्टायलिश ड्रेस…या अभिनेत्रीचा प्रत्येक लुक परफेक्ट असतो. असेच काहीसे मलायका अरोराच्या एका फोटोशूटदरम्यानही पाहायला मिळालं होतं. या फोटोशूटदरम्यान तिनं न्यूड सीक्वेन्स ड्रेस परिधान करून प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले होतं. पण या स्टायलिश ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर नेटिझन्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

(जेव्हा सनी लियोनीला स्टायलिश ड्रेसवरून करण्यात आलं होतं ट्रोल)

​आउटफिट केलं होतं कॉपी?

आपल्या स्टायलिश फोटोशूटसाठी मलायका अरोराने The Dolls House Fashionने डिझाइन केलेला प्लंजिंग नेकलाइन असणाऱ्या सीक्वेंस ड्रेसची निवड केली होती. यावर तिने मेकअपसह स्टायलिश कर्ल्स, न्यूड पेन्सिल हील आणि हेअरडू मॅच केले होतं. या स्पार्कलिंग ड्रेसमध्ये मलायका सुंदर दिसत होती. पण तिनं हॉलिवूड स्टार किम कर्दाशियनचा ड्रेस कॉपी केल्याचे म्हणत नेटिझन्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मलायकाच्या ड्रेसचं डिझाइनं किमने २०१९ मध्ये मेटगाला इव्हेंटसाठी परिधान केलेल्या ड्रेस प्रमाणे दिसत असल्याचे नेटिझन्सचे म्हणणं होतं.

(जान्हवी कपूरची साडीतील हटके स्टाइल, रक्षाबंधनासाठी तुम्हीही ट्राय करू शकता हे लुक)

​किम कर्दाशियनचा ड्रेस

दरम्यान, मलायका या ऑल न्यूड ग्लॅमरस ड्रेसमध्ये मोहक दिसत होती. पण तिनं हॉलिवूड स्टारचा लुक कॉपी केल्याचे युजर्सचे म्हणणं होते. किमने मेटगाला इव्हेंटसाठी थिएरी मुगलरने डिझाइन केलेला ड्रिप बोल्ड ड्रेस परिधान केला होता. तर मलायका अरोराचा ड्रेस हाउस ऑफ फॅशनने डिझाइन केला होता. डिझाइनर थिएरी मुगलरने वर्ष २००३ नंतर आपले कोणतेही डिझाइनर कलेक्शन मार्केटमध्ये उपलब्ध केले नव्हते. पण निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी खास किमच्या मागणीनुसार लेटेक्स बीडेड ड्रेस डिझाइन केला होता. हा ड्रेस तयार करण्यासाठी त्यांना आठ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागला.

(करीना कपूर आणि मलायकाने पुन्हा एकसारखेच कपडे केले परिधान, पाहा फोटो)

​नेटिझन्स मलायकाला म्हणाले…

मलायका अरोराच्या (Malaika Arora Fashion) चाहत्यांना तिची ही स्टाइल आवडली तर काहींनी मलायकाच्या लुकची तुलना किम कर्दाशियन (Kim Kardashian) सोबत केली. काही जणांनी तिला ‘लो बजट किम कर्दाशियन’ असेही म्हटलं. एकूणच या चमचमणाऱ्या ड्रेसमधील मलायकाचा लुक प्रेक्षकांना आवडला नसल्याचे दिसले.

(मलायका अरोरा ते करीना कपूर, प्रेग्नेंट असताना या अभिनेत्रींनी केलं शानदार रॅम्प वॉक)

​यापूर्वीही केलं गेलं ट्रोल

ड्रेसिंग स्टाइलवरून मलायका अरोराला अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. दरम्यान यापूर्वीही किम प्रमाणे न्यूड बॉडी जिम वेअर परिधान केल्याचे सांगत नेटिझन्सकडून मलायकावर निशाणा साधण्यात आला होता. किमचे न्यूड बॉडीसूट जेथे लोकांसाठी फॅशन स्टेटमेंट ठरलं होतं. तिथे दुसरीकडे यावरून मलायकाला वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आलं. या बॉडीसूटमध्येही मलायक सुंदर दिसत होती. पण तिचे फोटो पाहून नेटिझन्सनी तिला भरपूर ट्रोल करण्यास सुरूवात केली.

(Nora Fatehi नोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *