मायलेकीची जोडी! मिशापासून ते आराध्याने परिधान केला होता आईसारखाच पोषाख

Spread the love

आपल्या आईसारखेच कपडे परिधान करणे, तिच्या प्रमाणे मेकअप करणं आणि तिचेच सँडल घालून घरभर आणि भरभर चालण्याचा प्रयत्न करणं, इत्यादी… या आणि अशा कित्येक गोष्टी प्रत्येक मुलगी लहान असताना करतेच. मुलीच्या बालपणाचे गंमतीशीर किस्से बॉलिवूडमधील अभिनेत्री देखील सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

बॉलिवूडमधील (Bollywood Fashion) कित्येक अभिनेत्री स्वतःसोबतच आपल्या लाडक्या लेकीच्या फॅशनचीही पुरेपूर काळजी घेतात. यामध्ये मायलेकींच्या काही अशाही जोड्या आहेत, ज्या एकसारखीच वेशभूषा देखील करतात. आतापर्यंत असे अनेक फोटो तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. बॉलिवूड (Bollywood) अभिनेते- अभिनेत्रींप्रमाणेच त्यांच्या मुलांच्या आउटफिट्सचीही (Star Kids In Bollywood) मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते.
(देबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न, असा होता वेडिंग लुक)

​मीरा राजपूत-मिशा कपूर

बी-टाउनमधील ‘मायलेकी’ची सर्वात क्युट जोडी म्हणून मीरा राजपूत आणि मिशा कपूर प्रसिद्ध आहेत. मीरा राजपूत आपल्या दोन्ही मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पण यापैकी काही फोटोंमध्ये मिशा आणि मीराची स्टाइल एकसारखीच असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. यातील पहिला फोटो थायलँडमधील आहे. कुटुंबीयांसोबत हॉलिडे एन्जॉय करणाऱ्या मीरा आणि मिशाने पोम-पोम डिटेलिंगसह ब्ल्यू स्ट्राइप डिझाइन असलेला कफ्तान ड्रेस घातला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये मीरा आणि मिशाने एकसारखंच डिझाइन असलेला गुलाबी आणि हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या लुकसाठी मीराने कमीत कमी मेकअप केला होता. मिशाचा पेहराव देखील आईप्रमाणेच दिसत आहे.

(करीना कपूरचे शूटिंगमधील फोटो केले शेअर, सुंदर फोटो पाहून चाहते झाले घायाळ)

​ऐश्वर्या राय बच्चन- आराध्या बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनची लाडकी लेक आराध्या बच्चन ‘Mamma’s Daughter’ म्हणून ओळखली जाते. कारण ऐश्वर्या जेथे कुठे जाते तेथे लाडक्या लेकीला आपल्यासोबत घेऊनच जाते. आपल्या आईसोबत वेळ घालवणे किंवा कान फिल्म फेस्टिव्हलदरम्यान गाउन ठीक करण्यात ऐश्वर्याची मदत करणे असो, आराध्या नेहमीच आपल्या आईसोबत असते. दरम्यान काही वर्षांपूर्वी ऐश्वर्या राय बच्चनने सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राच्या शोसाठी रॅम्प वॉक केलं होतं. यावेळेस ऐश्वर्याने डिझाइनरकडून आपल्यासह आराध्यासाठीही वन शोल्डर शिमरी गाउन तयार करून घेतला होता.

(ऐश्वर्या रायपासून ते अनुष्का शर्मापर्यंत, ‘या’ दागिन्यांशिवाय राहू शकत नाहीत हे ५ स्टार्स)

​सनी लियोनी-निशा कौर वेबर

सनी लियोनी आणि तिची मुलगी निशा कौर वेबरमधील बाँडिंग तुम्ही सोशल मीडियावरील फोटो- व्हिडीओद्वारे पाहू शकता. सनी निशासोबतचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान या मायलेकीच्या एका फोटोवर चाहत्यांनीच नव्हे तर बॉलिवूडकरांनीही लाइक- कमेट्सचा पाऊस पाडला होता. २०१९मध्ये दिवाळी सणासाठी सनी लियोनी आणि निशा कौर वेबरने एकसारखाच लेहंगा परिधान केला होता. सनीने दोघींचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोने सर्वांची मने जिंकली होती.

(सारा अली खानचा ‘हा’ लुक पाहून लोक भडकले, म्हणाले…)

​ईशा देओल-राध्या तख्तानी

हेमा मालिनी यांची कन्या आणि बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल लग्नानंतर आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. पण आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे ती स्वतःचे स्टायलिश फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. ईशा देओल आणि तिची कन्या राध्या तख्तानीच्या एका फोटोची जोरदार चर्चा झाली होती. या फोटोमध्ये दोघींनीही एकसारखीच आणि एकाच रंगाची साडी नेसल्याचे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. एका डान्स इव्हेंटसाठी ईशा देओल आणि राध्या तख्तानीने महाराष्ट्रीयन नऊवारी साडी नेसली होती.

(Radhika Merchant नीता अंबानींच्या होणाऱ्या सूनेचे हे पाच डिझाइनर लेहंगे पाहिले का?)

गीता बसरा-हिनाया हीर

२००६ मध्ये ‘दिल दिया है’ या सिनेमाद्वारे गीता बसराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. दरम्यान अभिनेत्री गीता बसरा आणि तिची मुलगी हिनाया हीर प्लाहा अनेकदा मॅचिंग आउटफिटमध्येच दिसतात. मालदीवमध्ये असताना गीतानं हिनायासोबतचे फोटो शेअर केले होते. मायलेकीच्या एकसारख्याच आउटफिटची बरीच चर्चा झाली होती. एका फोटोमध्ये दोघींनीही केशरी रंगाच्या आउटफिटसह हॅट मॅच केल्याचे तुम्ही पाहू शकता. तर दुसऱ्या फोटोमध्ये फ्लोरल प्रिंटचा हिरव्या रंगाचा वन शोल्डर ड्रेसमधील मायलेकींचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळत आहे.

(अंकिता लोखंडेने साडी लुकमधील सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *