त्वचा उजळण्यासाठी
निस्तेज, निर्जीव आणि रुक्ष त्वचा असल्यास पपई फेस पॅकचा वापर करा. दोन ते तीन दिवसांनंतर पपईचा फेस पॅक लावल्यास उत्तम. पिकलेल्या पपईचा गर घ्या आणि मॅश करा. यामध्ये तीन चमचे मध आणि एक चमचा मुलतानी मिक्स करा. हे फेस पॅक मान आणि चेहऱ्यावर लावा. हलक्या हातानं मसाज करा आणि २० मिनिटांसाठी लेप लावून ठेवा. लेप सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
(Skin Care Tips त्वचा निरोगी राहण्यासाठी हे ५ व्हिटॅमिन आहेत आवश्यक)
मुरुम कमी करण्यासाठी

पिंपलचा त्रास कमी करण्यासाठी कच्च्या पपईचा वापर करावा. कच्चा पपई किसून घ्यावा आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर अर्ध्या तासांसाठी लावा. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या. हा उपाय केल्यास चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग देखील कमी होतील.
ओपन पोअर्सची समस्या कमी करण्यासाठी

पिकलेल्या पपईचा गर आणि केळ्याची साल मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या. या पेस्टमध्ये तुम्ही मुलतानी माती देखील मिक्स करू शकता. ओपन पोअर्स कमी करण्यासाठी हे फेस पॅक लावा. अंदाजे २० मिनिटांसाठी हा लेप आपल्या चेहऱ्यावर लावून ठेवा. थोड्या वेळाने थंड पाण्याने आपला चेहरा धुऊन घ्यावा. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय तुम्ही करू शकता.
(Skin Care Tips तेलकट त्वचेसाठी बेस्ट आहेत टोमॅटोचे ३ उपाय, असा करा वापर)
कोंडा कमी करण्याासाठी

कच्चा पपई आणि लिंबू रस वाटीमध्ये एकत्र घ्या. या पेस्टमध्ये तुम्ही दही देखील मिक्स करा. मुळापासून संपूर्ण केसांना हेअर पॅक लावा. अर्ध्या तासानंतर केस हर्बल शॅम्पूने धुऊन घ्या. या पॅकमुळे तुमचे केस मजबूत, चमकदार होतील. विशेष म्हणजे केसामधील कोंडा कमी होईल.
(Skin Care Tips निरोगी त्वचेसाठी लिंबूपासून घरामध्येच तयार करा टोनर)
नॅचरल कंडिशनर

अर्धा वाटी पिकलेला पपई, एक पिकलेले केळ, थोडेसे दही, एक चमचा एरंडेल तेल आणि एक चमचा नारळाचे तेल एका प्लेटमध्ये एकत्र घ्या आणि हेअर पॅक तयार करा. आता हे पॅक टाळू आणि केसांना लावा. एका तासानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. या नैसर्गिक स्वरुपातील कंडिशनरमुळे केसांशी संबंधित सर्व समस्या कमी होण्यास मदत मिळेल.
(कोरफड आणि हळदीचे मास्क चेहऱ्यासाठी आहे बेस्ट, त्वचेला मिळतील मोठे फायदे)
डाग आणि सनबर्न

चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकुत्या, काळवंडलेल्या त्वचेची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही कच्च्या पपईचा फेस पॅक वापरू शकता. यासाठी कच्च्या पपईच्या पेस्टमध्ये कांद्याचा रस, टोमॅटो आणि लिंबू रसाचे काही थेंब मिक्स करा. त्वचेवर ज्या ठिकाणी डाग आहेत तेथेच ही पेस्ट लावा. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
सनबर्न कमी करण्यासाठी पपई, काकडी आणि कच्चे दूध वाटीमध्ये एकत्र घ्या आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि थोड्या वेळानं थंड पाण्याने तोंड धुऊन घ्या.
Note चेहरा आणि केसांसाठी कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(तेलकट त्वचा व सनटॅनच्या समस्येतून हवीय सुटका? वापरा घरगुती मिल्क फेशियल)
Source link
Recent Comments