मुरुम, काळवंडलेल्या त्वचेपासून हवीय सुटका? वापरा आयुर्वेदिक मुलतानी मातीचे फेस पॅक

Spread the love

​दूध आणि मुलतानी फेस पॅक

चेहऱ्यावरील डाग, मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी मुलतानी मातीमुळे मदत मिळू शकते. ही माती आपल्या त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि त्वचेतील रक्तप्रवाहही वाढतो. दूध आणि मुलतानी माती एकत्र करून लावल्यास त्वचा नितळ व चमकदार दिसू लागते.

सामग्री : दोन ते तीन मोठे चमचे मुलतानी माती, दोन चमचे दूध

विधि: एका वाटीमध्ये मुलतानी माती आणि दूध एकत्र घ्या. जाडसर पेस्ट तयार करा. १० ते १२ मिनिटांसाठी ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. पॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.

(Natural Skin Care घरच्या घरी कसे तयार करायचे ऑरेंज पील ऑफ मास्‍क?)

​अंडे आणि मुलतानी माती फेस पॅक

स्किन टाइटनिंगसाठी हे फेस पॅक सर्वात उत्तम घरगुती उपाय आहे. अंड्यातील पांढरा भाग आपल्या त्वचेसाठी लाभदायक असतो.

सामग्री: एक अंडे, एक चमचा दूध, एक चमचा मुलतानी माती

विधि : वाटीमध्ये अंड्याचा पांढरा भाग आणि मुलतानी माती एकत्र घ्या. यामध्ये थोडेसे दूध मिक्स करा आणि जाडसर पेस्ट तयार करा. हे पॅक चेहरा आणि मानेवर लावा. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यावा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय करावा.

(Aishwarya Rai Bachchan मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायचं ब्युटी सीक्रेट माहीत आहे का?)

​हळद आणि मुलतानी माती फेस पॅक

धूळ, माती, प्रदूषणामुळे आपल्या त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ज्यामुळे सुरकुत्या, मुरुम आणि त्वचेशी संबंधित अन्य समस्यांचा सामना करावा लागतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी हळद व मुलतानी मातीचे फेस पॅक वापरुन पाहा. हळदीमध्ये अँटी बायोटिक, अँटी फंगल, अँटी-एजिंग, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे गुणधर्म आपल्या त्वचेचं संसर्गापासून संरक्षण होतं.

(केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर टाळा, सकाळी उठल्यानंतर चेहऱ्याची अशी घ्या काळजी)

सामग्री : एक चमचा मुलतानी माती, १/४ चमचा हळद, गुलाब पाणी

विधि: मुलतानी मातीमध्ये हळद मिक्स करा. यामध्ये आवश्यकतेनुसार गुलाब पाण्याचा समावेश करावा. जाडसर पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा.

​मध आणि मुलतानी माती फेस पॅक

मधामुळे आपल्या त्वचेला नैसर्गिक मॉइश्चराइझर मिळते.

सामग्री : एक चमचा मुलतानी माती, २ चमचे गुलाब पाणी, अर्धा चमचा मध

विधि: मुलतानी मातीमध्ये मध आणि गुलाब पाणी मिक्स करा. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर लेप लावा. लेप सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा. सकारात्मक परिणामांसाठी हा उपाय नियमित करू शकता.

(तुम्हालाही नाकातील केस कापण्याची सवय आहे का? ही माहिती नक्की जाणून घ्या)

​त्वचेसाठी काही टिप्स

  • आपली त्वचा नेहमी मॉइश्चराइझ ठेवा. त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ देऊ नका.
  • आपल्या आहारामध्ये फळे आणि भाज्यांचे जास्त प्रमाणात सेवन करा.
  • दिवसभरात आठ ग्लास पाणी प्यावे.
  • मद्यसेवन, धूम्रपान, जंक फूड आणि कॅफीनचे अतिरिक्त सेवन करणं टाळा.
  • नियमित व्यायाम देखील करावा.

(Natural Skin Care त्वचेची काळजी घेताय ना? या १० गोष्टी लक्षात ठेवणं आहे आवश्यक)

NOTE : त्वचेसाठी कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आठवणीने घ्यावा. त्वचेचं नुकसान होऊ नये यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *