मुलांचं सर्दी-पडसं व खोकला दूर करण्यासाठी असा बनवा घरगुती काढा!

Spread the love

आता हिवाळा सुरु झाला आहे आणि या ऋतूत सर्वाधिक होणारा आजार म्हणजे सर्दी पडसं (cold-cough) आणि खोकला होय, खास करून लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर या आजाराला तोंड द्यावं लागतं कारण त्यांची रोगप्रतिकार शक्ती (how to boost immunity) कमजोर असते. यामुळे थोडी जर थंडी शरीराला लागली तरी त्यांना सर्दी खोकला होतो. हा आजार जरी सामान्य असला तरी जर हाताबाहेर गेला तर खूप हैराण करतो. कधी कधी आपल्याला सुद्धा सर्दी खोकल्याचा खूप त्रास होतो.

अशावेळी त्या लहान मुलांना किती त्रास होत असेल याचा विचार देखील करवत नाही. सर्दी खोकला झाला की डॉक्टरांकडे जावे आणि गोळ्या घेणे हीच आपली सवय, मात्र अशा गोळ्या जास्त खाणे सुद्धा घातक ठरू शकते. खास करून लहान मुलांना जास्त औषधे न देण्याचा सल्ला जाणकार सुद्धा देतात. यावर पर्याय म्हणून आम्ही तुम्हाला एका खास काढ्याबद्दल सांगणार आहोत जो तुम्ही सर्दी खोकला झाल्यावर लहान मुलांना देऊ शकता.

बाळासाठी काढा

करोनाचे संकट आल्यापासून आयुर्वेदाचे महत्त्व वाढले आणि आणि त्यातल्या त्यात विषाणूपासून संरक्षण देणाऱ्या काढ्यांचे सेवन सुद्धा वाढले आहे. परंतु तुम्ही अशा प्रकारचे काढे लहान मुलांना देऊ शकत नाही कारण यात तीव्र औषधी वनस्पतींचा वापर केलेला असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आज अशा काढ्याबद्दल सांगणार आहोत जो खास लहान मुलांसाठी आहे आणि त्याचे सेवन कल्याने लहान मुलांना अजिबात कसला त्रास होणार नाही. या लेखात तुम्हाला काढा बनवण्याची पद्धती, त्यासाठी काय काय साहित्य लागते याची माहिती आणि सोबतच फायदे सुद्धा जाणून घेता येतील.

(वाचा :- मुलांना जंक फुड खाऊ घालण्याआधी जाणून घ्या त्याचे गंभीर दुष्परिणाम!)

साहित्य

कोणताही पदार्थ तयार करण्यापूर्वी त्याचे योग्य साहित्य माहित असणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे आपणही सर्व प्रथम या काढ्यासाठी लागणारे प्रमुख साहित्य जाणून घेऊया. लहान मुलांना सर्दी, खोकला आणि तापापासून संरक्षण देणाऱ्या या काढ्याच्या निर्मितीसाठी दीड कप पाणी, 10 तुळशीची पाने, अर्धा ते एक अख्खा लिंबू, एक चमचा मध, थोडीशी काळी मिरी, चिमुटभर ओवा, चिमुटभर हळद आणि अर्धा इंच आल्याची गरज आहे.

(वाचा :- काही मुलं आईच्या गर्भातच पडतात ‘या’ हृदय रोगाला बळी! बचावासाठी काय काळजी घ्यावी?)

काढा कसा बनवावा?

काढ्यासाठी लागणारे सर्व साहित्य जमा झाले की तुम्ही काढा बनवण्यास सुरुवात करू शकता. सर्वात प्रथम एक भांडे घ्या आणि ते गॅसवर ठेवा. आता त्यात दीड कप पाणी टाका आणि ते उकळू द्या. मग यात हळद, ओवा, आले आणि काळी मिरी टाका. भांड्यावर झाकण ठेवा आणि 5 मिनिटे ते उकळू द्या. मंद आचेवरच पाणी उकळवा. जेव्हा पाणी अर्धे होईल तेव्हा गॅस बंद करा. अशा प्रकारे तुम्ही पहिला टप्पा पूर्ण करता. आता आपण पुढील कृती जाणून घेऊया.

(वाचा :- मुलांना प्लास्टिकच्या भांड्यात खाऊ घालताय जेवण? मग आरोग्यास होतील ‘हे’ दुष्परिणाम!)

पुढील कृती

पाणी उकळले आणि अर्धे झाले की गॅस बंद करून थोडावेळ ते थंड होऊ द्या. तुमचा काढा आता तयार झाला आहे. मात्र असाच काढा बाळाला भरावू नये. त्या आधी पाणी गाळून घ्यावे. आता या काढ्यामध्ये लिंबू पिळावा आणि तुमचा अंतिम काढा तयार झाला. हा काढा तुम्ही आता लहान मुलाला देऊ शकता. जो त्याला सर्दी, खोकला, आणि तापापासून संरक्षण देईल. हा काढा मोठी माणसे सुद्धा पिऊ शकतात. पण त्यांच्यावर तो जास्त प्रभावशाली ठरण्याची शक्यता कमी आहे.

(वाचा :- मुलांच्या मोबाईल व कम्प्युटर ‘स्क्रीन टाइम’चा समतोल साधण्यासाठी साध्यासोप्या टिप्स!)

या काढ्याचे फायदे

आता आपण सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या काढ्यामुळे लहान मुलांना नक्की काय फायदे होतात ते जाणून घेऊया. या काढ्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काढ्यामध्ये वापरलेले सर्व साहित्य हे बाळाच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहे. यामुळे श्वासाशी निगडीत सर्व प्रकारच्या विकारांपासून आराम मिळतो. गळ्यातील खसखस सुद्धा दूर होते. या काढ्याला दिवसातून दोन वेळा कोमट पाण्यातून एक ते दोन चमचे भरवा. एक गोष्ट लक्षात ठेवा की काढा जास्त गरम असू नये. जर मुल 1-2 वर्षाचे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असेल तर तुम्ही त्याला जास्त प्रमाणात काढा पाजू शकता.

(वाचा :- ब्रेस्ट मिल्क कमी असल्याने बाळाची भूक भागत नाही? जाणून घ्या ५ सामान्य कारणे व उपाय!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *