मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी असे बनवा हेल्दी व टेस्टी ओट्सचे लाडू!

Spread the love

रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे आपल्या शरीराचे सुरक्षा कवच होय. जर ही रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल तर विविध प्रकारचे आजार आपल्या आरोग्याला विळखा घालू शकतात. मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमी असते. जस जसा तो वाढत जातो तस तशी ही रोगप्रतिकारक शक्ती वाढत जाते. याचमुळे लहान बाळांची शक्य तितकी काळजी घेणे गरजेचे असते कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमी असते.

आता अनेक पालकांना हा प्रश्न पडतो की बाळाला काय खाऊ घातल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि बाल सुरक्षित राहील, तर त्याच अनुशंगाने या लेखात आम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या एका पदार्थाबद्दल माहिती देणार आहोत. तो पदार्थ म्हणजे ओट्सचे लाडू (recipe of oats ladoo) होय. हे ओट्सचे लाडू तुम्ही बाळाला खाऊ घातलेत तर त्याचा चांगला परिणाम बाळाच्या शरीरावर दिसून त्याची रोगप्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढेल.

बाळाला कधीपासून ओट्स द्यावेत?

बाळाला ओट्स देणे हे फायदेशीर आहे हे तर आपल्याला कळले पण ते एक विशिष्ट वयापासून बाळाला खाऊ घालणे गरजेचे असते. तुम्ही बाळ जन्मतःच लगेच त्याला ओट्स खायला देऊ शकत नाही. बाळ जेव्हा ७ महिन्यांचे होईल तेव्हा त्याला ओट्स खायला देणे उचित ठरते. ओट्स हे पहिले डाळीच्या रुपात त्याला खायला घालावे आणि पहावे की बाळ ते सहज खाते आहे की नाही. ते ओट्स बाळाला पचतायत की नाही. जर बाळाला कोणताच त्रास होत नसेल तर फळे किंवा भाजीच्या साथीने तुम्ही बाळाला ओट्स खायला देऊ शकता.

(वाचा :- मुलांना जंक फुड खाऊ घालण्याआधी जाणून घ्या त्याचे गंभीर दुष्परिणाम!)

ओट्सचे लाडू कसे बनवावेत?

ओट्सचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम त्यासाठी लागणारे साहित्य जमा करून घ्या. ओट्सचे लाडू बनवण्यासाठी एक कप कापलेले बदाम, एक छोटा चमचा तूप, एक वाटी ओट्स, अर्धा चमचा दालचिनी पावडर, एक कप किसलेला नारळ, 3 कापलेले खजूर, एक कप गुळ, चिमुटभर मीठ, दोन चमचे सब्जा हे साहित्य जमा करावे. यातील अर्धे अधिक साहित्य आपल्या घरी आधीपासूनच उपलब्ध असते. उरलेले साहित्य आपण बाजारातून सहज मिळवू शकतो.

(वाचा :- वायू प्रदूषणामुळे लहान मुलांच्या फुफ्फुसांचं होतंय खूप नुकसान, घ्या ‘ही’ काळजी!)

पहिली कृती

एकदा का साहित्य जमा झाले की आपण ओट्सचे लाडू बनवण्यास सुरुवात करू शकतो. सर्वप्रथम बदाम हलकेसे भाजून घ्या आणि त्यानंतर त्यात तूप टाका. आता भांड्यात ओट्स टाका आणि ते सुद्धा चांगले भाजून घ्या. आता हे ओट्स एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यावर दालचिनी पावडर टाका. त्यानंतर यात कापलेले खजूर टाका. खजूर टाकून झाल्यावर त्यात गुळ टाका. अशाप्रकारे तुम्ही ओट्सचे लाडू बनवण्याची अर्धी कृती पूर्ण करता. आता आपण पुढील कृती जाणून घेऊ.

(वाचा :- हिवाळ्यात मुलांना हेल्दी ठेवायचंय? वापरा सेलिब्रेटी डाएटिशियन ऋजुता दिवेकरच्या ‘या’ खास टिप्स!)

दुसरी कृती

खजूर आणि गुळ टाकल्यानंतर सर्व मिश्रण मिक्सर मध्ये एकत्र वाटून घ्या. वाटलेल्या मिश्रणामध्ये सब्जा टाका. हाताने हे मिक्स करून घ्या आता हातांवर तूप लावा आणि हाताने ह्या मिश्रणातून लाडू वळून घ्या. अशा प्रकारे तुमचे ओट्सचे लाडू अखेर तयार होतात. हे लाडू तुम्ही त्वरित लहान मुलांना खायला देऊ शकता किंवा लहान बाळाला भरवू शकता. वापरले सर्व साहित्य हे चांगल्या गुणवत्तेचे असणे गरजेचे आहे कारण त्यामुळे लाडू जास्त काळ टिकतील आणि मुलांना खऱ्या अर्थाने त्या लाडूंमधून पोषण मिळेल व त्यांची रोगप्रतिकारक शक्ती सुधारेल.

(वाचा :- ऐन करोनामध्ये आपल्या मुलांचा नाताळ सण असा बनवा खास!)

लाडूंना द्या वेगळा स्वाद

लहान मुलं ही खवय्यी असतात. त्यांना चांगल्या चवीचे पदार्थ खायला आवडतात. अशावेळी ओट्सची चव त्यांना आवडेलच असे नाही. म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी खास चवीचे वा फ्लेवर्सचे लाडू बनवू शकता. लहान मुलांना चॉकलेट फ्लेवर ,मधील ओट्सचे लाडू जास्त आवडत असल्याचे एका निरीक्षणात दिसून आले होते. चॉकलेट्समुळे देखील लहान मुलांना खूप फायद होतात. त्यामुळे तुम्ही चॉकलेट्सच्या चवीचे लाडू त्यांना आवर्जून खाऊ घालू शकता. हे लाडू बाजारात सुद्धा सहज उपलब्ध होतात किंवा तुम्ही घरच्या घरी देखील चॉकलेट मिक्स करून हे लाडू बनवू शकता.

(वाचा :- जया बच्चन का म्हणते ऐश्वर्याला बेस्ट मॉम? ऐश्वर्याच्या टिप्स नवोदीत मातांच्या येऊ शकतात कामी!)

ओट्स खरंच फायदेशीर आहेत का?

लहान बाळांसाठी ओट्स हे चांगलं खाद्य मानलं जातं. कारण यात खनिजे, जीवनसत्त्व, फायबर आणि अँटी ऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणावर असतात. आणि हे सर्व घटक लहान बाळाच्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे बाळासाठी उर्जेचा एक चांगला स्त्रोत म्हणून ओट्सला मान्यता मिळाली आहे. तांदळाच्या तुलनेतही ओट्स हलके असल्याने त्यांचे शरीरात सहज पचन होते. ओट्स हा एक असा पदार्थ आहे ज्याची बाळाला कमीत कमी अॅलर्जी होते. पण तरीही ओट्स बाळाला खाऊ घालण्यापूर्वी किमान एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

(वाचा :- मुलांचं सर्दी-पडसं व खोकला दूर करण्यासाठी असा बनवा घरगुती काढा!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *