मुलांच्या बारीकपणामुळे आहात चिंताग्रस्त? मग त्यांच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश!

Spread the love

आपल्या मुलाने सुदृढ असावे आणि त्याने नेहमी निरोगी राहेवे अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. पण अनेकदा जन्माच्या वेळी गुटगुटीत असणारं बाळ जसं जसं मोठं होऊ लागतं तसं तसं त्याचं वजन कमी होऊ लागतं. तो अधिक बारीक होऊ लागतो. यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचं तेज आणि सुंदरता सुद्धा निघून जाते. या बदलत्या शारीरिक स्थितीला अनेक कारणे कारणीभूत असू शकतात. अशावेळी आई वडिलांना सुद्धा मुलाबद्दल चिंता वाटायला लागते.

अशा कमकुवत शरीरामुळे आरोग्य सुद्धा धोक्यात येऊ शकते. म्हणून मुलांचे योग्य वयात योग्य वजन असणे महत्त्वाचे ठरते. तुम्ही आजवर अनेक प्रयत्न करून सुद्धा तुमच्या मुलाचे वजन वाढले नसेल तर आता आम्ही सांगतो आहोत ते उपाय वापरून पहा. नक्की तुमच्या मुलाचे वजन वाढेल आणि पुन्हा एकदा तो धष्टपुष्ट आणि मजबूत होईल.

केळी

मुलाचे वजन वाढवायचे असेल तर त्याला आवर्जून केळी खायला द्या. पोटॅशियम, जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व ब6 आणि कर्बोदकांनी केळी समृद्ध असतात. यात कॅलरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते ज्यामुळे लहन मुलांचे वजन वाढण्यास मदत मिळते. जर मुल केळी खाण्यास कंटाळा करत असेल तर त्याला ती स्मॅश करून स्मूथीसह सुद्धा तुम्ही देऊ शकता. बाळ लहान असले अर्थात 3 वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल तर त्याला थेट केळी भरावू नयेत. मुल 3 वर्षांपेक्षा मोठे असेल तर त्याला थेट केळी तुम्ही भरवू शकता.

(वाचा :- बाळाने कोणत्या महिन्यात गुडघ्यावर रांगणं गरजेचं असतं?)

रताळी

रताळी उकडून स्मॅश करून मुलांना भरवावीत. रताळी खूप पौष्टिक असतात आणि सहज पचली सुद्धा जातात. यात जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व ब6, कॉपर, फॉस्फरस, पोटॅशियम, आणि मँगनीज मोठ्या प्रमाणावर असते. रताळ्यांमध्ये डायट्री फायबर सुद्धा असतात. तुम्ही याची प्युरी किंवा सूप बनवून सुद्धा बाळाला देऊ शकता. रताळ्यातील पौष्टिकता शरीराला आवश्यक तत्वे प्रदान करते आणि साहजिक वजन वाढण्यास सहाय्यता मिळते.

(वाचा :- मुलांच्या चेह-यावर सफेद चट्टे दिसू लागल्यास अजिबात करु नका दुर्लक्ष!)

डाळी व कडधान्य

कडधान्य तर पौष्टिकतेची खाण आहे हे तुम्हाला माहित आहेच. म्हणून सांगितले जाते की लहानपणापासूनच मुलाला कडधान्ये खाण्याची सवय लावावी. कडधान्यांमध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, फायबर आणि पोटॅशियम असते. सहा महिन्यांच्या बाळाला ठोस आहार देता येत नाही. म्हणून तुम्ही सूप किंवा पातळ डाळ बनवून त्याला खाऊ घालू शकता. मुल मोठे असेल तर त्याला डाळ खिचडी देणे उत्तम! डाळ भात किंवा भाजी सोबत खाऊ घातल्याने मुलाला अधिक पोषण मिळू शकते. 7 ते 9 महिन्यांच्या बाळाला तुम्ही ठोस आहारात दलिया बनवून देऊ शकता.

(वाचा :- बाळाला असलेली न्युमोनियाची लक्षणं वेळेत कशी ओळखाल?)

तूप आणि नाचणी

तुपामध्ये पोषक तत्वे मोठे प्रमाणात असत्ता. आठ महिन्यांच्या बाळाला तूप भरवायला सुरुवात करावी. कडधान्य किंवा खिचडी व डाळीमध्ये तूप मिक्स करून बाळाला द्यावे. यामुळे बाळाचे वजन वाढेल आणि तो निरोगी सुद्धा राहील. याशिवाय नाचणी सुद्धा एक पौष्टिक पदार्थ असून त्यामुळे सुद्धा वजन वाढीला चालना मिळते. डायट्री फाइबर, कॅल्शियम, लोह, प्रोटीन आणि अन्य अनेक जीवनसत्त्व वा खनिज पदार्थांनी नाचणी युक्त असते. मुलाला नाचणीची इडली, डोसा बनवून सुद्धा खाऊ घालू शकता.

(वाचा :- बाळाला बेबी पावडर लावण्याचे फायदे आणि नुकसान!)

अंडी आणि अ‍ॅव्होकॅडो

अंडी हि प्रोटीनने संपन्न असतात. मुल एक वर्षांचे झाल्यावर तुम्ही त्याला अंडी खाऊ घालू शकता. यात सॅच्युरेटेड फॅट, प्रोटीन, जीवनसत्त्व आणि खनिज असतात. तुम्ही अंडी उकडून किंवा त्यांचे ऑमलेट बनवून बाळाला खाऊ घालू शकता. याशिवाय अ‍ॅव्होकॅडो हे एक उत्तम पौष्टिक फळ आहे जे वजन वाढण्यात मदत करू शकते. यात जीवनसत्त्व ई, क, के आणि फोलेट, कॉपर, डायट्री फाइबर यांसारखी तत्वे असतात. यात मोठ्या प्रमाणात फॅट असल्याने वजन वाढीसाठी हा उत्तम पदार्थ आहे. तर हे पदार्थ आवर्जून बाळाला खाऊ घाला आणि त्याला धष्टपुष्ट बनवा. हा लेख इतरांसोबतही शेअर करा आणि त्यांना सुद्धा ही अमुल्य माहिती द्या.

(वाचा :- उलटी आणि अतिसार झाल्यास मुलांना ओआरएस पावडर देणं योग्य की अयोग्य?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *