मुलांच्या मेंदूचा विकास व्हावा व बुद्धी तल्लख व्हावी म्हणून घरच्या घरी बनवा हेल्दी व टेस्टी ड्रिंक्स!

Spread the love

आपल्या मुलाचं आरोग्य अतिशय निरोगी असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं आणि म्हणून ते आपल्या मुलाला शक्य तितकं चांगलं खाऊ घालतात. विविध रेसिपी ट्राय करतात आणि त्याला पोषण देण्याचा प्रयत्न करतात. पण आहारशैली बाबत जास्त माहित नसल्याने आपल्या मुलाच्या शारीरिक स्थितीनुसार त्याला नेमकं काय द्यावं हे अनेक पालकांना कळत नाही. अनेक पालक लहान वयात आपल्या मुलाला व्यायामाची सवय सुद्धा लावतात पण त्याचाही जास्त फायदा दिसून येत नाही.

अशावेळी पालकांनी खास करून योग्य आहारावर (healthy food) आणि पौष्टिक डिशेसवर भर द्यायाला हवा. आज आम्ही या लेखातून तुम्हाला एका अशा हेल्थी ड्रिंक बद्दल (healthy drinks) सांगणार आहोत जे शरीराला अत्यंत पोषक ठरते. त्यात अनेक महत्त्वपूर्ण तत्त्वे असतात जी शरीराला फायदेशीर ठरतात. हे ड्रिंक प्यायल्याने मुलाच्या शरीरात दिवसभर एनर्जी सुद्धा राखली जाईल. चला तर जाणून घेऊया या ड्रिंकबद्दल सर्व माहिती!

साहित्य

हे हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण साहित्याची गरज असते. हे साहित्य तुमच्या घरातच तुम्हाला सहज उपलब्ध होईल. एक चमचा खरबूजाच्या बिया, अक्रोडचे किमान 16 तुकडे, 16 बदाम, काळ्या मिरीचे 3 ते 4 दाणे, एक छोटी वेलची, एक चमचा बडीशेप, एक चमचा खस खस आणि एक कप दुध हेसाहित्य सर्वप्रथम जमा करावे. एवढ्या साहित्यामध्ये 4 लोकं पिऊ शकतील एवढे हेल्थी ड्रिंक सहज तयार होईल.

(वाचा :- कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करतानाही सोनाली बेंद्रेने असा केला आपल्या मुलाचा सांभाळ!)

ड्रिंक कसे बनवाल?

एकदा का तुमचे सर्व साहित्य जमा झाले की सर्वात प्रथम एका मोठे भांडे घ्या आणि त्यात खरबूजाच्या बिया टाका. आता त्या भांड्यात अक्रोड, बदाम आणि वेलची सुद्धा टाका. वेलची टाकून झाल्यावर तुम्ही त्यात बडीशेप मिक्स करा. हे मिश्रण एकत्र झाल्यावर त्यात खसखस टाका. आता या भांड्यात पाणी टाकून सर्व गोष्टी रात्रभर झाकून पाण्यात भिजवत ठेवाव्यात. ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्याशिवाय आपले हेल्थी ड्रिंक अधुरे आहे.

(वाचा :- लहान मुलांसाठी अत्यंत लाभदायक असतं ‘हे’ खास तेल, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत!)

पुढील प्रक्रिया

सकाळी उठल्यावर भिजत ठेवलेल्या सुक्या मेव्यातून बदाम काढून त्याची साल काढून टाका. नंतर बदामासह सुका मेवा वेगळा करून मिक्सर मध्ये वाटून घ्या. भिजलेले खस खसचे दाणे सुद्धा वेगळे करून मिक्सर मध्ये वाटून घ्या. ड्राय फ्रुट्सच्या या मिश्रणात थोडेसे अजून पाणी टाकून मिक्सर मध्ये वाटून याची पेस्ट तयार करा. अशाप्रकारे तुम्ही 90% कृती पूर्ण केलेली असते आणि आता पुढील महत्त्वाची प्रक्रिया असते याचे ड्रिंक बनवण्याची!

(वाचा :- तुषार कपूरला मुलासाठी बनावं लागलं ‘आई’, ‘ही’ असतात एका सिंगल फादरची आव्हानं!)

मिल्क शेक बनवण्याची पद्धत

आता एक ग्लास दूध घ्या आणि त्यात तुम्ही मिक्सर मध्ये वाटून तयार केलेली पेस्ट टाका. यानंतर ग्लासमध्ये दूध टाका. तुम्ही तुमच्या सोयीनुसार दूध थंड वा गरम घेऊ शकता. आता हे दूध आणि मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्या. जास्त वेळ तुम्ही मिसळल्यास ते चांगल्या प्रकारे मिक्स होईल. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यात साखर ससुद्धा टाकू शकता आणि अशा प्रकारे तयार झाले आहे तुमचे हेल्थी ड्रिंक जे तुमच्या मुलाला देईल खूप सारे पोषण आणि त्याच्या शारीरिक वाढीत खूप योगदान देईल.

(वाचा :- तुमचं मुल सतत आजारी पडतं किंवा कमजोर आहे? मग सेलिब्रेटी डाएटेशियन ऋजुताच्या ‘या’ टिप्स करा फॉलो!)

मुलांना ड्राय फ्रुट्सचे फायदे

या ड्रिंक मध्ये मोठ्या प्रमाणावर सुक्या मेवायचा वापर करण्यात आला आहे आणि हा वापर याचसाठी करण्यात आला आहे कारण या सुक्या मेव्याचे शरीराला खूप फायदे होतात. सुक्या मेव्यामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. अमुले रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि हिमोग्लोबिन वाढल्याने एनीमियाचा धोका अत्यंत कमी होतो. ड्राय फ्रुट्समध्ये फायबर, प्रोटीन, झिंक, लोह आणि इतर खनिज पदार्थ असतात जे मुलाच्या शरीराला उर्जा देतात. यात मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने बद्धकोष्ठता सारखा विकार सुद्धा नष्ट होतो आणि पचन चांगले होते. सुक्या मेव्यामध्ये व्हिटॅमिन ‘ए’ आणि कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए मुलाची दृष्टी सुधारतात आणि कॅल्शियम हाडे मजबूत करण्यात योगदान देते. अक्रोड सारख्या सुक्या मेव्यामध्ये ओमेगा 3 फेटी एसिड असते जे मेंदूच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते.

(वाचा :- गेल्या चार वर्षांपासून आमिर खानची मुलगी आहे डिप्रेशनमध्ये, ‘ही’ असतात तरूण मुलांमधील डिप्रशनची लक्षणे!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *