मुलांच्या वाईट सवयी सोडवण्यासाठी कामी येणा-या काही भारी ट्रिक्स!

Spread the love

वाईट सवयीचे मूळ शोधा

सर्वात प्रथम हे जाणून घ्या की मुलाला ही वाईट सवयी लागली कुठून? जर याचे उत्तर तुम्हाला सापडले तर त्याची वाईट सवय तुम्ही सहज सोडवू शकता. उदाहरण म्हणून आपण नखं खाण्याचा सवयीकडे पाहूया. अनेक मुलांना नखं खाण्याची सवय असते. ते एकदम टेन्शन मध्ये असले वा तणावात असले की नखं खाऊ लागतात आणि इथून त्यांना ती सवय लागते. तुमच्या मुलाच्या बाबतीत सुद्धा हीच बाब लागू होते का ते शोधून काढा. जर त्याला त्याच गोष्टीमुळे हि वाईट सवय लागली असेल तर त्याला ज्या गोष्टींचा तणाव वाटतो त्या दूर करण्याचा प्रयत्न करा.

(वाचा :- वडिलांशिवाय का अपूर्ण असतं मुलीचं संगोपन?)

समजवण्याचा प्रयत्न करा

अनेकदा आपल्याला वाटते की मुलाची वाईट सवय तो मोठा होत जाईल तशी सुटत जाईल पण मुल मोठे झाल्यावर कळते की हा निव्वळ आपला एक गैरसमज होता. म्हणून वेळ हातात असतानाच मुलांना समजवण्यावर भर द्या. जेवढ्या लहान वयात तुम्ही त्याला समजवाल तितका जास्त प्रभाव त्याच्या बालमनावर होईल. एकदा का मुलामध्ये स्वत:ची समज आली की तो तुमचं ऐकण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे मुलांना बाजूला बसवून त्यांची सवय वाईट का आहे आणि अशामुळे त्यांना कोणीच जवळ का करणार नाही आणि सगळे का हसतील ते समजावून सांगा. याचा त्यांच्या मनावर नक्की परिणाम होईल.

(वाचा :- ‘या’ तेलाने मालिश केल्यास बाळाची हाडे होतील मजबूत!)

प्रोत्साहित करा

“तू ही वाईट सवय सोडायला हवी.” केवळ एवढेच मुलाला सांगून चालत नाही. त्याने मनापासून ती सवय सोडण्याचा प्रयत्न सुरु केला वा त्याने खरोखर त्या सवयीवर नियंत्रण मिळवले की तुम्ही त्याचे कौतुक करा. त्याला त्यासाठी बक्षीस द्या. यामुळे आपले प्रयत्न आपल्या आई बाबांना आवडत आहेत याचा त्यालाही अभिमान वाटेल. आपल्याला वाईट सवय होती तेव्हा आपल्याला ओरडा पडायचा पण आता आपण ती सोडत आहोत तर आपले कौतुक होते आहे हि गोष्ट मुलांना ती सवय कायमची सोडून देण्यासाठी प्रेरणा देऊ शकते.

(वाचा :- मुलांसाठी बनवा ‘या’ पदार्थापाासून झटपट नाश्ता, आरोग्यास होतील लाभच लाभ!)

शिक्षा देऊ नका

मुलाची वाईट सवय सोडवण्याचा एकच मार्ग पालकांना दिसतो तो म्हणजे त्यांना शिक्षा म्हणून मार देणे किंवा ओरडणे किंवा अद्दल घडवणे. पण असा मार्ग हा त्या मुलाला बंडखोर बनवू शकतो. अशा प्रकारच्या शिक्षा या अल्पकाळाच्या असू शकतात. काही वेळा मुल घाबरून ती सवय सोडतो पण शेवटी पुन्हा त्याची वाईट सवय सुरु होते. म्हणून शिक्षा करण्यापेक्षा वा मार देण्यापेक्षा तो स्वत:हून आपली सवय सोडायला तयार होईल या प्रकारे उपाय अंमलात आणा.

(वाचा :- आईच्या गर्भात असताना बाळ कोणत्या गोष्टी सर्वात जास्त एन्जॉय करतं?)

घाई करू नका

सवय कोणतीही असो ती सुटायला काही वेळ जातो. त्यामुळे तुमच्या मुलाला वेळ द्या. तो एका दिवसांत आपली सवय सोडेल हा विचार तर अजिबातच करू नका. त्याला त्याच्या परीने आपली वाईट सवय सोडू द्या. तुम्ही सततचा दबाव आणला तर असेही होऊ शकते की त्या दबावामुळे त्याची सवय कधीच सुटणार नाही. किंवा असेही होऊ शकते की तुमच्या समोर तो ती सवय दाखवणार नाही पण तुमच्या मागे इतरत्र बिनधास्त वाईट सवय सुरु ठेवेल. यासाठी त्याला वेळ द्या आणि स्वत:हून त्यांची वाईट सवय सोडवू द्या. तेव्हाच ती वाईट सवय कायमची सुटेल.

(वाचा :- बाळाला ‘हा’ पदार्थ खाऊ घातल्यास बुद्धी होईल तल्लख!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *