मुलांना आहारात आवर्जून द्या ‘हे’ पदार्थ, रोगप्रतिकारक शक्तीसोबतच पचनक्रियाही सुधारेल!

Spread the love

आहार एकप्रकारे एखाद्या अनुभवाप्रमाणे असतो आणि जेव्हा आपलं बाळ १२ महिन्यांचे म्हणजेच एक वर्षांचे होते तोपर्यंत त्याच्या खाण्यापिण्याच्या ब-याच आवडीनिवडी पालकांच्या लक्षात आलेल्या असतात. या वयातील मुलांना विविध प्रकारचे पदार्थ चाखण्याची इच्छा असते. पण समस्या ही आहे की आपले भारतीय पदार्थ पचनक्रियेचा विचार करुन कसे त्यांना खाऊ घालावेत. कारण तुम्हाला तर माहितच आहे मुलं रोजच्या चवीपेक्षा काही वेगळं तोंडात गेलं की एकतर नाक तरी मुरडतात किंवा सरळ तो पदार्थ तोंडातून बाहेर काढतात.

त्यामुळे सात्विक, पौष्टिक पदार्थ मुलांसमोर अशाप्रकारे सादर करा ज्यामुळे त्यांना लगेचच ते खाऊ वाटतील. आज आम्ही अशाच काही पौष्टिक, सात्विक पण तितक्याच स्वादिष्ट आणि मुलांच्या पसंतीस उतरतील अशा पदार्थांची माहिती देणार आहोत जे पदार्थ १ वर्षाची मुलं अगदी सहजा सहजी खाऊही शकतील आणि पचवतील सुद्धा! इथे आम्ही तुम्हाला भारतीय पद्धतीचा नाश्ता त्यामध्ये खास बेबी साऊथ इंडियन पदार्थांच्या रेसिपी सांगणार आहोत. ज्या मुलांच्या विशेष पसंतीस उतरतील. चला तर जाणून घेऊया स्वादिष्ट आणि चमचमीत पाककृतींची माहिती.

रव्याचा शिरा

तुमचं बाळ दररोज तेच ते दुधाचे पदार्थ, दलिया, ओट्स खाऊन बोअर झालंय? मग रव्याचा शिरा त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. रव्याचा शिरा गोड असतो, स्वादिष्ट असतो, आरोग्यासाठी पौष्टिक असतो आणि सोबतच हा शिरा पचण्यास अतिशय चांगला असतो.

 • रव्याच्या शि-यासाठी लागणारी सामग्री
 1. रवा – २ मोठे चमचे
 2. पाणी – १/२ कप
 3. साजूक तूप – १ किंवा २ चमचे
 4. गुळ – स्वादानुसार
 5. दूध – आवश्यकतेनुसार
 • रव्याचा शिरा बनवण्याची पद्धत
 1. एका कढईमध्ये २ चमचे साजूक तूप घेऊन मंद आचेवर रवा लालसर होईपर्यंत भाजून घ्या. जेव्हा रव्याचा खमंग सुगंध सुटू लागेल तेव्हा गॅस बंद करा.
 2. आता पाणी उकळून त्यामध्ये भाजलेला रवा घाला. त्यामध्ये दूध आणि गुळ घालून १० मिनिटे शिजवून मिश्रण घट्ट होऊ द्या. जेव्हा शिरा घट्ट होईल तेव्हा तो गॅसवरुन उतरवा.
 3. आपला चविष्ट आणि पौष्टिक रव्याचा शिरा तयार आहे. गरमा गरम रव्याचा शिरा बाळाला खाऊ घाला.

(वाचा :- ‘या’ कारणांमुळे कमजोर होते मुलांची रोगप्रतिकारक शक्ती, काळजी घ्या!)

स्टिकी बनाना राईस

हा पदार्थ मुलं सहजा सहजी आणि पटकन गिळू शकतात. बाळाने काही मिनिटांतच त्याचा नाश्ता संपवला आहे हे पाहून तुम्हीच आश्चर्यचकित व्हाल.

 • स्टिकी बनाना राईससाठी लागणारी सामग्री –
 1. तांदूळ – १ कप
 2. पातळ नारळाचे दूध – २ कप
 3. साखर – १ चमचा
 4. केळी – २ लहान केळी
 5. घट्ट नारळ दूध – २ मोठे चमचे
 • स्टिकी बनाना राईस बनवण्याची पद्धत –
 1. पातळ नारळ दूधात तांदूळ रात्रभर भिजत ठेवा
 2. सकाळी उठून यामध्ये पाणी मिसळून तांदूळ चांगले शिजवून घ्या
 3. आता घट्ट नारळ दूध साखर टाकून गरम करा आणि त्यामध्ये शिजवलेले तांदूळ घाला
 4. एका बाऊलमध्ये स्मॅश केलेले केळे घेऊन त्यावर हा गरमा गरम आणि गोड गोड भात बाळाला सर्व्ह करा.

(वाचा :- मुलांना देताय व्हिटॅमिनयुक्त आहार? मग ही माहिती जाणून घ्याच!)

टॉमेटो आणि गाजराचे सूप

जर तुम्हाला आपल्या बाळाला स्वादिष्ट पण तितकंच पौष्टिक असं सूप खाऊ घालायचं असेल तर व्हिटॅमिनने संपूर्ण असे टॉमेटो आणि गाजराचे सूप हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुमच्या बाळाला सर्दी-पडसं झालं किंवा त्याची तब्येत बरी नसेल तर तुम्ही त्याला हे पौष्टिक असं टॉमेटो आणि गाजराचे सूप बनवून खाऊ घालू शकता.

टॉमेटो आणि गाजराचे सूप बनवण्यासाठी लागणारी सामग्री –

 1. गाजर – १
 2. टॉमेटो – १
 3. कांदे – २ (बारीक चिरलेले)
 4. लसूण पाकळ्या – बारीक चिरलेल्या
 5. लोणी – १ चमचा
 6. जीरे – १/४ छोटा चमचा
 7. काळी मिरी पावडर – एक चिमुटभर
 8. पाणी – १.५ कप
 9. मीठ – स्वादानुसार

(वाचा :- बाळाला सर्दी-पडसं झाल्यास करा ‘हे’ घरगुती रामबाण उपाय!)

टॉमेटो आणि गाजराचे सूप बनवण्याची पद्धत

 1. सर्व भाज्या व्यवस्थित धुवून घेऊन बारीक चिरुन घ्या
 2. प्रेशर कुकरमध्ये लोणी गरम करुन त्यात जीरे घाला
 3. त्यामध्ये कांदा आणि लसूण परतून घ्या
 4. त्यामध्ये गाजर आणि टॉमेटो परतून घ्या आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला.
 5. आता स्वादानुसार मीठ आणि काळी मिरी पावडर घाला
 6. कुकरचं झाकण बंद करुन ३ शिट्ट्या होऊ द्या
 7. सर्व भाज्या व्यवस्थित शिजल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकून वाटून घ्या
 8. त्यानंतर एखाद्या चाळणीच्या किंवा गाळणीच्या मदतीने भाज्यांमधील रस गाळून घ्या
 9. आता त्या पाण्यामध्ये काळी मिरी पावडर (मिरपूड) आणि लोणी घालून बाळाला सर्व्ह करा

(वाचा :- लहान मुलांसाठी अशा पद्धतीने बनवा ओट्सची चविष्ट आणि पौष्टिक खिचडी!)

बाळाला खाऊ घालताना ही काळजी घ्या

 1. बाळाला जबरदस्ती जेवण भरवू नका
 2. कायम असा पदार्थ बाळासाठी निवडा जो त्याला अगदी सहजा सहजी चावता येऊ शकेल
 3. जेवण खाऊ घालण्याआधी थंड किंवा कोमट करा
 4. अतिप्रमाणात साखर, मीठ आणि मसाले टाकणं टाळा
 5. जेवण भरवताना घाई करु नका हळू हळू आणि छोटे छोटे घास भरवा
 6. खाताना त्याला मोबाईल दाखण्याची सवय लावू नका, त्याजागी गोष्टी सांगा

(वाचा :- अशी बनवा बाळासाठी सफरचंदाची स्वादिष्ट व पौष्टिक प्युरी!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *