मुलांना जंक फुड खाऊ घालण्याआधी जाणून घ्या त्याचे गंभीर दुष्परिणाम!

Spread the love

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान (kareena kapoor khan) आपल्या मुलाला तैमुर अली खानच्या (taimur ali khan diet) डाएटबाबत खूप कॉन्शियस असते. करीना या गोष्टीची पूर्ण काळजी घेते की तैमुरला पौषक तत्वांनी परिपूर्ण असलेलेच पदार्थ खाऊ घालणे आणि याबाबतीत ती एक कडक आई देखील आहे. इतकंच नाही तर करीनाने तैमुरसाठी काही डाएट रुल्स बनवले आहेत जे ती तैमुरकडून कटाक्षाने पाळून घेते. दुकानात मिळणारे स्वादिष्ट, रंगीबेरंगी, पाकिटबंद खाद्यपदार्थ पाहिले की हमखास लहान मुलं ते घेण्यासाठी हट्ट धरतात पण त्या डोळ्यांना सुरेख दिसणा-या पदार्थांमुळे लहान मुलांच्या आरोग्याला भरपूर नुकसान पोहचू शकते.

हे लहान मुलांना समजत नाही पण मुलांना शांत करण्यासाठी आई-वडिल त्यांचा हट्ट बहुतांश वेळा नाईलाजाने पुरवतात. तुम्हीही असं करत असाल तर थांबा! असं करुन तुम्ही आपल्या मुलाचं आरोग्य व भविष्य दोन्ही धोक्यात घालताय. त्यापेक्षा त्यांना नावडत्या पदार्थांपासून काहीतरी वेगळी डिश बनवून घाऊ घाला जी त्यांना बघायलाही आवडेल व टेस्टीही असेल.

तैमुरचं डाएट प्लान

करीना तैमुरचं डाएट प्लान दर महिन्याला बदलते आणि हे डाएट प्लान ती स्वत: लक्ष देऊन बनवते. तैमुरच्या आहारात ती पालेभाज्या, कडधान्य व फळे आवर्जून समावेश करते. तसंच ती आपल्या तैमुरला घरात बनवलेलं पौष्टिक व सात्विक जेवणच खाऊ घालते. ज्यामध्ये खिचडी, इडली व डोसा अशा स्वादिष्ट रेसिपींचाही समावेश असतो. जसं पहिलंच सांगितलं की करीनाने तैमुरसाठी नियम बनवले आहेत त्यातीलच एक नियम म्हणजे ती तैमुरच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही जंक फुड ठेवत नाही व खाऊही देत नाही.

(वाचा :- काही मुलं आईच्या गर्भातच पडतात ‘या’ हृदय रोगाला बळी! बचावासाठी काय काळजी घ्यावी?)

करीना तैमुरला जंक फुडपासून ठेवते दूर

करीना तैमुरला जंक किंवा फास्ट फुड देणं कटाक्षाने टाळते. बर्गर, पिझ्झा, फ्राइज, न्युडल्स अजिबात खाऊ देत नाही. वयस्कर लोकांपेक्षा लहान मुलांसाठी जंक फुड खूपच हानीकारक असते. कारण लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमजोर असते व ती हळू हळू विकसित होत असते. इतकंच काय त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी पूर्ण क्षमतेने काम करणं सुरुही केलेलं नसतं. अशा परिस्थितीत जंक फुड त्यांच्या शरीराला अधिक कमजोर बनवू शकतात. चला तर जाणून घेऊया जंक फुड खाल्ल्याने मुलांना काय दुष्परिणाम होऊ शकतात.

(वाचा :- मुलांना प्लास्टिकच्या भांड्यात खाऊ घालताय जेवण? मग आरोग्यास होतील ‘हे’ दुष्परिणाम!)

जंक फुड खाण्याचे दुष्परिणाम

सतत किंवा दररोज जंक फुड खाल्ल्याने मुलांना कोणतीतरी दीर्घ व गंभीर आरोग्याची समस्या जडू शकते. तसंच जंक फुड खाल्ल्याने खूप लहान वयात ते लठ्ठपणाने ग्रासले जाऊ शकतात. एक सिंगल फास्ट फुड खाल्ल्याने रोज शरीराला मिळणा-या कॅलरीमध्ये १६० ते ३१० किलो कॅलरीज जास्त शरीरात जातात. व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘सी’ सारखे पोषक तत्व तसंच कॅल्शियम व मॅग्नेशियम सारख्या खनिज पदार्थांची कमतरता असल्यामुळे जंक फुड लहान मुलांमध्ये ऑस्टियोओपोरोसिस आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे जडणारे आजार सहजपणे विळखा घालतात.

(वाचा :- मुलांच्या मोबाईल व कम्प्युटर ‘स्क्रीन टाइम’चा समतोल साधण्यासाठी साध्यासोप्या टिप्स!)

एटोपीचा धोका

आठवड्यातून तीन पेक्षा जास्त वेळा फास्ट किंवा जक फुड खाल्ल्याने एटोपिक सारखे आजार जसं की अस्थमा, एक्जिमा किंवा राइनाइटिसचा धोका खूप जास्त वाढतो. आठवड्यातून ४ ते ६ वेळा जंक फुड खाणा-या मुलांचे गणित, अभ्यासातील हुशारी व कलाकौशल्य बाकी मुलांच्या तुलनेत कमजोर असतं. याव्यतिरिक्त जंक फुड खाणा-या मुलांना बद्धकोष्ठताही होते. कॅलरी, फॅट, शुगर आणि कार्बोहायड्रेट जास्त सेवन केल्यानेही मुलांना बद्धकोष्ठता होऊ शकते.

(वाचा :- ब्रेस्ट मिल्क कमी असल्याने बाळाची भूक भागत नाही? जाणून घ्या ५ सामान्य कारणे व उपाय!)

अभ्यासावर वाईट परिणाम

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की जंक फुड खाण्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो. जेवणात साखर अधिक झाल्यास मुलांची एकाग्रता विचलित होते. ब्लड शुगर मध्ये उतार-चढाव झाल्याने मूड स्विंग्स आणि सावधनेतेमध्ये कमी अशा समस्याही होऊ शकतात. फास्ट फुडमध्ये एनर्जी कमी असल्यामुळे मुलांना मैदानी खेळ व अभ्यासासाठी उर्जाच मिळू शकत नाही. तर मंडळी, मुलांनी कितीही हट्ट धरला तरीही त्यांना रस्त्यावरील पदार्थ किंवा पाकिटबंद पदार्थ अजिबात देऊ नका. त्यापेक्षा त्यांना वेगळा प्रयोग करुन एखादा नवीन पदार्थ खाऊ घाला.

(वाचा :- चारचौघात मुलांवर हात उगारताय? मग थांबा, नाहीतर मुलांवर होतील ‘हे’ वाईट परिणाम!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *