मुलांना टायफॉइड झाल्यास ही आहेत त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार!

Spread the love

का होतो टायफॉइड?

सर्वात प्रथम तुम्हाला ही गोष्ट माहीत असायला हवी की टायफॉइड नक्की होतो कसा आणि का हा आजार पावसाळ्यात सर्वाधिक प्रमाणात पसरतो. तर टायफाईड का होतो याचे उत्तर आहे दुषित आहार घेतल्याने व दुषित पाण्याचे सेवन केल्याने टायफॉइड पसरतो. पावसाळ्याच्या दिवसांत हवेतील ओलावा शिजलेल्या अन्नाला लवकर नासवण्याचे व दुषित करण्याचे काम करतो. यामुळे अन्न आणि पाण्यात साल्मोनेला टायफी नावाचे पेथोजेन्स विकसीत होतात. जेव्हा कोणी रोगी व्यक्ती अशा अन्न वा पाण्याचे सेवन करतो तर साल्मोनेला त्या व्यक्तीच्या आतड्याला संक्रमित करतो आणि तो व्यक्ती टायफाईडला बळी पडतो.

(वाचा :- बाळाला बिस्किट खाऊ घालण्याचे ‘हे’ आहेत दुष्परिणाम!)

लहान मुलांमधील टायफॉइडची लक्षणे

लहान मुलांमधील टायफॉइडचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे खूप ताप येणे. सर्वप्रथम ताप हा अगदी हलका असतो पण हळूहळू हा ताप वाढत जातो आणि हीच अतिशय चिंतेची गोष्ट असते. तापासोबत मुलांमध्ये अतिसार, जुलाब यांसारखी लक्षणे दिसू शकतात. मुलांची भूक कमी झालेली असते. टायफॉइड झालेल्या मुलांन सतत थकवा जाणवतो. त्यांच्या शरीरावर गुलाबी रंगाचे डाग दिसतात खासकरून छातीच्या खालील भागामध्ये हा बदल दिसून येतो. वेळीच उपचार केले नाही आणि टायफॉइड वाढू लागला तर वजन झपाट्याने कमी होते.

(वाचा :- या ५ लसी नवजात बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी असतात अत्यंत आवश्यक!)

टायफॉइडवर घरगुती उपचार

टायफॉइडवर कोणताही विशिष्ट घरगुती उपाय नाही. परंतु असे काही उपाय आहेत जे मुलांच्या शरीराला पोषण देतात आणि शरीरातील उर्जा टिकवून ठेवतात. टायफॉइडमध्ये डिहायड्रेशन दिसून येते अशावेळी पौष्टिक द्रव पदार्थ जसं की फळाचे ज्यूस, नारळ पाणी मुलाला प्यायला द्यावे. तुळशीचा वापर सुद्धा अशावेळी केला जाऊ शकतो. तुळशीमध्ये अँटीबायोटीक गुणधर्म असतात. म्हणून टायफॉइड झाल्यावर तुळशीचा काढा प्यायला द्यावा. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. जाणकारांच्या मते अशावेळी केळी खाऊ घातल्यास सुद्धा शरीराला पोषण मिळते. केळ्यामध्ये कॅल्शियम, खनिज पदार्थ आणि जीवनसत्त्वे असतात.

(वाचा :- सोहा अली खान आपल्या लाडक्या लेकीसोबत अशी लुटते आहे गणेशोत्सवाचा आनंद!)

टायफॉइडचा प्रभाव

टायफॉइड झाल्यावर मुलाच्या शरीराचे तापमान 102 अंश सेल्सिअसच्या आसपास असते. ताप वाढल्यास हे तापमान 104 पर्यंत सुद्धा पोहचू शकते. यामुळेच मुलाच्या शरीरात वेदना आणि कमजोरी जाणवते. सामान्यत: टायफॉइड हा 4 ते 6 आठवड्यांत पूर्णपणे ठीक होतो. परंतु या गोष्टींची काळजी घ्यायला हवी की लक्षणे दिसू लागल्यावर आणि टायफॉइड असल्याचे सिद्ध झाल्यास लवकरात लवकर त्यावर उपचार करणे गरजेचे असते. जर उपचारात उशीर झाला तर रुग्णाचा जीव सुद्धा जाऊ शकतो.

(वाचा :- पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर घाबरलेल्या मुलीला याविषयी अशी द्या योग्य माहिती!)

डॉक्टरकडे कधी घेऊन जावे?

मुळात टायफॉइडची लक्षणे दिसू लागल्यास जास्त वेळ न दवडता मुलाला डॉक्टरकडे वा हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे. जोवर लक्षणे हलकी दिसतील तोवर घरगुती उपचार म्हणून पौष्टिक आहार देऊन त्याच्या शरीरातील उर्जा टिकवण्याचा प्रयत्न करावा. जर त्याचा सकारात्मक परिणाम झाल्यास टायफॉइड जाण्याची शक्यता असते. पण ही गोष्ट फार क्वचितच घडते. जर लक्षणे वाढत असल्याचे दिसल्यास वा घरगुती उपचारांचा काहीच परिणाम होत नाही असे दिसल्यास मात्र वेळ न घालवता त्वरीत वैद्यकीय उपचार घ्यावेत.

(वाचा :- मुलांच्या बारीकपणामुळे आहात चिंताग्रस्त? मग त्यांच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *