मुलांना दिवसभर ठेवायचं आहे एनर्जेटिक? मग खाऊ घाला ‘ही’ खास डिश!

Spread the love

असं म्हटलं जातं की आहारात उन्नीस बीस झालं तरी चालेल पण नाश्त्यात होऊ देऊ नये. दिवसभरातील पहिला नाश्ता हा कायम भरपेट व हेल्दीच असावा, मग तो लहान मुलांचा असो वा मोठ्या माणसांचा. जर नाश्त्यात तुम्ही आपल्या मुलांना हेल्दी व सात्विक पदार्थ खाऊ घातले तर ते दिवसभर एनर्जेटिक राहतात व आरोग्याच्या दृष्टीनेही हे लाभदायक असते.

तसंच नियमित पौष्टिक नाश्ता केला तर त्यांच्या शरीराच्या विकासासाठी आवश्यक असलेले पोषक तत्वे त्यांना सहज मिळतील. आज आम्ही तुम्हाला रव्यापासून बनवला जाणारा चीला याची रेसिपी सांगणार आहोत. जी तुम्ही मुलांना सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात दुधासोबत देऊ शकता. ही आगळी वेगळी टेस्टी डिश लहान मुलं आवडीने खातील. जाणून घेऊया रव्याच्या चीलाची रेसिपी व फायदे!

रव्याचा चीला कसा बनवावा?

रव्याचा चीला बनवण्यासाठी आपल्याला २ चमचे रवा, १ वाटी दही, चवीनुसार मीठ, चिमुटभर हिंग, १०० ग्रॅम पनीर, अर्धा बटाटा, अर्धा कांदा, अर्धी शिमला मिरची, अर्धा टोमॅटो, १ चमचा जिरे, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लाल तिखट पावडर, १ कप पाणी आणि साजूक तूप हे साहित्य आवश्यक आहे.

(वाचा :- मुलांना टिव्ही व मोबाईलपासून ठेवायचं आहे दूर? मग खालील टिप्स नक्की ट्राय करा!)

कुरकुरीत रव्याचा चीला बनवण्याची कृती

 1. सर्वात आधी १ वाटी दही घ्या
 2. १ चमचे भिजवलेला रवा दह्यात मिक्स करा
 3. आता या मिश्रणात पनीर किंवा शिजवून घेतलेले बटाटे मॅश करुन घाला
 4. पुढे, १ चमचा जिरे, १ चमचा लाल तिखट पावडर, हिरव्या मिरच्या, हिंग आणि २ चमचे मीठ (स्वादानुसार) घाला
 5. आवडत असल्यास कांदा मिक्स करु शकता
 6. थोडसं पाणी घालून त्याची पातळ पेस्ट करा
 7. आता १० मिनिटे मिश्रण बाजूला ठेवा

(वाचा :- मुलांना कोणत्या वयात व कशा पद्धतीने खाऊ घालावेत कांद्याचे पदार्थ?)

पुढील पाककृती

 1. आता त्यामध्ये अर्धा चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धी चिरलेली शिमला मिरची घाला (तुम्ही मुलांच्या आवडीनुसार इतर भाज्याही घालू शकता)
 2. आता पुन्हा मिश्रणात पाणी घालून सर्व सामग्री चांगली एकजीव करा व पातळ पेस्ट बनवा. (पेस्ट जास्त पातळ बनवू नका)
 3. गॅसवर तवा ठेऊन हलका गरम करुन घ्या
 4. आता तव्यात १ चमचा साजूक तूप घाला
 5. तूप गरम झाल्यानंतर पेस्ट तव्यावर घालून डोसा बनवताना फिरवतात तशी गोलाकार आकारात पसरा
 6. मंद आचेवर चीला गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत शेकवून घ्या आणि सेम कृती दुस-या बाजूनेही करा
 7. तयार झाला आहे आपला हेल्दी, टेस्टी व कुरकुरीत रव्याचा चिला!
 8. हा गरमा गरम चीला तुम्ही आपल्या मुलांना सॉस, हिरव्या पुदीना-कोथिंबीर चटणीसोबत देऊ शकता.

(वाचा :- मुलांना हेल्दी सवयी कशा लावाव्यात याविषयी ऋजूता दिवेकरने दिला सल्ला!)

रव्याचे फायदे

रव्यामध्ये लोह आणि पोटॅशियम असते. जे शरीरातील हिमोग्लोबिनचा स्तर सुधारते आणि हृदय सुद्धा निरोगी ठेवते. रव्याचा चीला ही डिश १२१ कॅलरी शरीराला प्रदान करते. शिवाय रव्यामध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई देखील असते. लहान बाळाचे पचन तंत्र अधिक सक्षम नसल्यामुळे बाळाला कोणताही आहार सहज पचत नाही. म्हणून या वयात त्याच्या आहारात अगदी मोजक्या आणि पचणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा. त्या पदार्थां पैकीच एक आहे रव्याचा चीला! त्यामुळेच या वयात बाळाला रव्याचे पदार्थ खाऊ घालणे सर्वच दृष्टीने फायदेशीर ठरते.

(वाचा :- हिवाळ्यात मुलांना चुकूनही देऊ नका ‘हे’ पदार्थ, नाहीतर येईल पश्चातापाची वेळ!)

रव्याची अ‍ॅलर्जी झाल्यास

काही मुलांना रवा खाल्यानंतर शारीरिक त्रास सुरु होतात. असे झाल्यास त्या बाळास रव्याची अ‍ॅलर्जी असल्याचं समजून जा. मुलांना अ‍ॅलर्जी होत असल्याचे निदर्शनास आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याला खाऊ घालायचा की नाही ते ठरवा. मुलांना अ‍लर्जी होते आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याला पहिल्यांदा रव्याचा पदार्थ खाऊ घातल्यावर 3 दिवस वाट पहा. जर त्या 3 दिवसांत कोणताच वाईट परिणाम न दिसल्यास तुम्ही मुलांना रोज रव्याचे विविध पदार्थ जसं की रव्याची लापशी, रव्याचा शिरा, रव्याचा उपमा, रव्याचा डोसा खाऊ घालू शकता.

(वाचा :- मुलांसाठी घरच्या घरी बनवा ‘या’ ५ प्रकारच्या हेल्दी व टेस्टी खिचडी!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *