मुलांना ‘या’ वयाआधी चुकूनही देऊ नका चॉकलेट्स नाहीतर येईल पश्चातापाची वेळ!

Spread the love

मुलांनी चॉकलेट खावे का?

हे तर आपण जाणतोच की मुले चॉकलेट खायला कधी नाही म्हणत नाही. तुम्ही कधीही त्यांना चॉकलेट द्या ते आवर्जून ते चॉकलेट खाणारच. मात्र मुलांना एका मर्यादित प्रमाणातच चॉकलेट खाण्याची मुभा द्यावी कारण चॉकलेट मध्ये कॅफिन असते जे बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. हे जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास रक्तदाब आणि हृदयाची धडधड वाढणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. चॉकलेट मध्ये साखर, थियोब्रोमाइन आणि फेनाइलेथेलामाइन यांसारखे उत्तेजक पदार्थ सुद्धा असतात हे बाळाच्या नर्व्हस सिस्टमला धोका पोहचवू शकतात. याशिवाय चॉकलेट मध्ये एन्डामाइड एसिड सुद्धा असते ज्याच्यामुळे मेंदूच्या कार्यप्रणाली वर परिणाम होऊ शकतो.

(वाचा :- फेसबुक सीईओ व मोठ मोठ्या कलाकरांनी सुद्धा घेतली होती पॅटर्निटी लिव्ह! का गरजेची असते ही गोष्ट?)

मुलांना चॉकलेट कधीपासून खायला द्यावे?

जोवर मुल एक वर्षाचे होत नाही तोवर त्याला चॉकलेट पासून दूर ठेवावे. त्याला अजिबात एक वर्षाच्या आधी चॉकलेट देऊ नये. जेव्हा तुम्ही त्याला चॉकलेट खाऊ घालाल तेव्हा याची सुद्धा खात्री करून घ्या की बाळाला त्याची एलर्जी तर होत नाहीये ना. शिवाय तुम्ही जे चॉकलेट बाळाला भरवत आहात त्याची वैधता तपासा. ते कोणत्या कंपनीचे आहे ते देखील एकदा चेक करून घ्या. एक वर्षाच्या बाळाचे शरीर अत्यंत संवेदनशील असते. एका चुकीच्या घटकामुळे सुद्धा त्याचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

(वाचा :- मुलीला पहिल्यांदा पिरीयड्स येण्याआधी आईला मिळतात ‘हे’ संकेत व मुलीमध्ये दिसून येतात काही बदल!)

चॉकलेटचे काही फायदे आहेत का?

सहसा आपण चॉकलेटकडे एक टाईमपास म्हणून खाण्याचा पदार्थ या दृष्टीने पाहतो. अनेकांना त्याचे काही फायदे आहेत हे माहित सुद्धा नसते. जर तुम्हालाही माहित नसतील तर तुम्ही नक्कीच चॉकलेटचे फायदे जाणून घेतले पाहिजे. चॉकलेट खाल्ल्याने शरीराला खरंच खूप फायदा होतो. चला आज आपण या लेखात ते फायदे सुद्धा जाणून घेऊया. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच! त्यामुळे जर तुम्ही जास्त फायदा व्हावा म्हणून जास्त चॉकलेट खाल तर मात्र त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतील.

(वाचा :- मुलांच्या मेंदूचा विकास व्हावा व बुद्धी तल्लख व्हावी म्हणून घरच्या घरी बनवा हेल्दी व टेस्टी ड्रिंक्स!)

मेंदूचा विकास

चॉकलेट मध्ये फ्लेवोनोल्स नावाचे एक तत्व असते जे चॉकलेट मध्ये निसर्गत: असते. हे तत्व बाळाच्या मेंदूचा संज्ञानात्मक विकास करण्यासाठी मदत करते आणि यामुळे बुद्धी अधिक तल्लख होते. चॉकलेट खाल्ल्याने हृदय आणि रक्त वाहिन्यांचे काय देखील सुधारते. यात असलेल्या फ्लेवोनोल्स तत्वामुळे शरीरात रक्त साचून राहत नाही आणि रक्ताभिसरण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुधारते. चॉकलेट मध्ये अॅंटीऑक्सीडेंट सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते जे भाज्या आणि फळे यांत आढळते. हे अॅंटीऑक्सीडेंट पेशींना पूर्ववत करण्याचे काम करतात.

(वाचा :- कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करतानाही सोनाली बेंद्रेने असा केला आपल्या मुलाचा सांभाळ!)

मूड चांगला होतो

चॉकलेट हे मूड चांगला करण्यास मदत करते. चॉकलेट खाल्ल्याने फ्रेश वाटते. चॉकलेट मध्ये एंडोर्फिन नावाचे न्यूरोट्रांसमीटर आढळते, जे व्यक्तीच्या शरीरात आनंदाची भावना उत्पन्न करण्यास मदत करते. म्हणूनच चॉकलेटला स्ट्रेस बस्टर सुद्धा म्हटले जाते. लहान मुलांमध्ये कोलेस्ट्रॉलची जास्त समस्या नसते. मात्र हे माहित असायला हवे की चॉकलेट खाल्ल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉलचा (बॅड कोलेस्ट्रॉल) स्तर कमी होतो आणि एचडीएल कोलेस्ट्रॉलचा (गुड कोलेस्ट्रॉल) स्तर वाढतो. तर एकंदरीत सांगायचे झाले तर तुम्ही मुलांना एक वर्षाच्या आधी चॉकलेट खायला देऊ नका आणि जास्तीत जास्त करून त्यांना डार्क चॉकलेट खाऊ घाला कारण तेच शरीरासाठी अधिक फायद्याचे असते.

(वाचा :- लहान मुलांसाठी अत्यंत लाभदायक असतं ‘हे’ खास तेल, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *