मुलांना सतत लघुशंका होणं असू शकतात ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे, काय काळजी घ्यावी?

Spread the love

पोलाकिरीयाची लक्षणे

मुलाला जर सतत लघुशंका होत असेल तर तो एक आजार आहे व त्याला पोलाकिरीया असे म्हणतात. 3 वर्षांनंतर मुले दिवसातून जवळपास 12 वेळा लघुशंकेला जातात. वय वाढल्यावर त्यांचे मूत्राशय सुद्धा विकसित होते. मुले दिवसातून कोणत्याही वेळेस 6 वेळा लघुशंका करतात. पोलाकिरीयाचे सर्वात स्पष्ट लक्षण हेच आहे की यात मुलाला अचानक कधीही लघुशंकेला होते. कधी कधी तर मुले दर अर्ध्या तासाला सुद्धा लघुशंकेला जातात. अशीही काही प्रकरणे दिसून आली आहेत ज्यात मुलाला एका दिवसाला 40 वेळा लघुशंकेला जावे लागले. या आजारात दरवेळी अतिशय कमी प्रमाणात लघुशंका होते.

(वाचा :- हिवाळ्यात लहान मुलांसाठी घरच्या घरी असं बनवा गाजर-बीटचं सूप!)

वारंवार लघुशंका होण्याचे कारण?

याबाबतीत जाणकारांचे मत आहे की मानसिक किंवा शारीरिक दोन्ही प्रकारची कारणे वारंवार लघुशंकेची समस्या उद्भवण्यास कारणीभूत असू शकतात. काही प्रकरणांमध्ये शाळा, घर किंवा कुटुंबातील काही ताण तणावामुळे मुलांमध्ये हि समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. जास्त दूध प्यायल्याने, कॅफिन सेवन केल्याने, बद्धकोष्ठतेमुळे, मूत्राशयात सूज आल्याने, मुत्रनळीमध्ये सूज आल्याने, ,मूत्राशय अतिशय जास्त सक्रीय असल्याने, मुत्रामध्ये कॅल्शियम अधिक प्रमाणात असल्याने किंवा टॉरेट सिंड्रोम मुळे लहान मुलांमध्ये पोलाकिरीया हा आजार दिसून येतो.

(वाचा :- पहिल्यांदा आई होणा-या महिलांना अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने दिल्यात ‘या’ खास टिप्स!)

यावर उपाय काय?

योग्य कारणाचा तपास लागताच डॉक्टर लगेच उपचार सुरु करतात. सामान्यत: लहान मुलांमध्ये या स्थितीवर उपचार करण्यासाठी विशिष्ट औषधाची गरज भासत नाही. सर्वात प्रथम तर या गोष्टीचा मागोवा घ्यावा लागतो की हि स्थिती दीर्घकालीन आहे की तात्पुरती आहे. जर ताण तणावामुळे हि स्थिती उद्भवली असेल तर मानसोपचारतज्ञाकडून उपचार घेऊन यापासून सुटका केली जाऊ शकते. मुत्रामध्ये कॅल्शियमचे अधिक प्रमाण आणि अॅसिडिक तसेच ऑक्‍सलेट युक्‍त पेय प्यायल्याने पोलाकिरीया होत असल्याचे आढळून आले आहे. म्हणून या स्थितीत डॉक्टर ऑक्‍सलेट युक्‍त पेये, कॅफिन आणि दूध न पिण्याचा सल्ला देतात. या ऐवजी पौष्टिक पेय आणि शुद्ध पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मूत्राशय अधिक सक्रीय असल्यास अँटीकोलिनेर्जिक तत्‍व असलेले औषध दिले जाते, पण हे औषध जास्त प्रभावी नाही असे मानणारा एक गट आहे.

(वाचा :- लहान वयात आई झालेली मीरा राजपूत मुलांना सांभाळताना येणा-या अडथळ्यांवर अशी करते आहे मात!)

डॉक्टरांना कधी सांगावे?

पोलाकिरीया हा जरी आजार असला तरी तो जास्त घातक नाही. जर मुलाला लघुशंका करताना अचानक वेदना होत असतील किंवा झोपेत मुल अनावधानाने लघुशंका करत असेल वा त्याला सतत खूप तहान लागत असेल तर डॉक्टरांची एकदा भेट नक्की घ्यावी. जर कोणत्या गंभीर स्थितीमध्ये मधुमेहामुळे मुलाला वारंवार लघुशंका होत असेल तर त्यावर त्वरित उपचार करावेत. मधुमेहाचा वेळीच उपचार केला नाही तर मूत्राशय आणि किडनी मध्ये संक्रमण होऊन मुलाच्या शरीराला मोठे नुकसान भोगावे लागू शकते.

(वाचा :- मुलांना हेल्दी बनवण्यासाठी डाएटिशियन ऋजुता दिवेकरचे ‘हे’ ५ नियम करा आवर्जून फॉलो!)

मानसिक आधार

जर हि समस्या मुलामध्ये मानसिक ताण तणावामुळे निर्माण झाली असेल तर पालक म्हणून तुम्ही याचे मूळ नक्की शोधायला हवे. बऱ्याचदा अनेक गोष्टींचा धसका मुले घेतात व ती गोष्ट वारंवार दिसल्यास त्यांना भीतीमुळे लघुशंका होते. कधीकधी ताण तणावामुळे सुद्धा मुले या आजाराला बळी पडतात. शक्यतो अशावेळी मुलांना मानसिक आधार द्यावा. याचे कारण जाणून घेण्यासाठी तगादा लावू नये. अत्यंत प्रेमाये, मायेने त्यांच्याकडून या गोष्टीचे कारण जाणून घ्यावे आणि त्यांची भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करावे.

(वाचा :- तीन वर्ष झाल्यानंतरही बाळाने बोलण्यास सुरुवात न केल्यास असू शकतो ‘हा’ आजार!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *