मुलांना हेल्दी बनवण्यासाठी डाएटिशियन ऋजुता दिवेकरचे ‘हे’ ५ नियम करा आवर्जून फॉलो!

Spread the love

करीना कपूर खानने (kareena kapoor) आपल्या पहिल्या प्रेग्नेंसी वेळी मराठमोठी सेलिब्रेटी डाएटिशियन ऋजुता दिवेकरने दिलेलाच डाएट चार्ट (pregnancy diet chart) फॉलो केला होता. इतकंच नाही तर डिलिव्हरी नंतर करीनाचा मुलगा तैमुल अली खान याच्याही डाएटची संपूर्ण काळजी ही ऋजुताच घेते. जर तुम्हालाही आपल्या मुलाला तैमुरसारखं बालपणातच हेल्दी व एकदम फिट बनवायचं असेल तर ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या या ५ नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. असं म्हणतात की, लहानपणात दिलेला आहार मुलांचं भविष्य सुरक्षित करतो.

कोवळ्या वयातील आहार मुलांची हाडे मजबूत करतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, शरीराच्या आतील अवयवांमध्ये लवचिकता प्रदान करतो आणि लहान वयातच त्यांना फिट बनवतो. म्हणून लहान मुलांच्या खानपानाकडे लक्ष देणं प्रत्येक आई-वडिलांचं सर्वात पहिलं कर्तव्य असतं. हल्लीच्या मुलांचा कल पौष्टिक अन्नापेक्षा जंक व फास्ट फुडकडे अधिक असल्यामुळे त्यांच्या शरीराला सात्विक पदार्थ व पोषक तत्वांची कशी पूर्ती करायची हे ब-याच पालकांना समजत नाही. म्हणूनच डाएटिशियन ऋजुताने मुलांना त्रासही होणार नाही व शरीराला हेल्दी फुडही मिळेल असे उपाय सांगितले आहेत. चला तर जाणून घेऊया त्या ५ नियमांची माहिती.

पाकिटबंद पदार्थ

आपल्या मुलाला नाश्त्या मध्ये कोणतेही पाकिटबंद पदार्थ जसं की, ज्यूस, ब्रेड्स, नूडल्स देऊ नका. या पाकिटबंद पदार्थांमध्ये पोषक तत्वांची मात्रा नसल्यासारखीच असते व हे पदार्थ आरोग्यासाठी देखील घातक असतात. यामध्ये कमी प्रतीच्या साखरेची उच्च मात्रा असते व केमिकल प्रिजर्वेटिव्हचाही वापर केला जातो. हे घटक मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासात बाधा उत्पन्न करु शकतात. मुलांना असं काहीतरी खाऊ घाला जे पदार्थ हेल्दी सोबतच टेस्टी देखील असतील. तुम्ही मुलांना नाश्त्यात पोहे, उपमा, इडली, डोसा, वडा, ठेपले, खाखरा, पराठा, मिसळ असे पदार्थ देऊ शकता.

(वाचा :- तीन वर्ष झाल्यानंतरही बाळाने बोलण्यास सुरुवात न केल्यास असू शकतो ‘हा’ आजार!)

प्लास्टिक बॉटल व डब्ब्यांचा वापर टाळा

मुलांना शाळेत प्लास्टिकच्या डब्ब्यांत जेवण दिले जाते व वॉटर बॉटल तर त्यांची दुसरी मैत्रीणच असते. पण ऋजुता दिवेकरच्या म्हणण्यानुसार प्लास्टिकच्या वस्तू मध्ये मुलांना खाऊ देणं अत्यंत चूकीचं आहे. प्लास्टिक मध्ये असलेले केमिकल्स खाण्याद्वारे आपल्या शरीरात जातात. या कारणामुळे आपलं मुल अजून कमजोर बनू शकतं व त्याचा शारीरिक विकास खुंटू शकतो. त्यामुळे मुलांना प्लास्टिकच्या डब्ब्यांत खाऊ देण्याऐवजी स्टिल्या डब्ब्यांत द्या व पाणी मातीच्या किंवा पितळेच्या बॉटलमध्ये देणं उत्तम!

(वाचा :- Celebrating diwali with babies : लहान मुलांची पहिली दिवाळी अशी बनवा स्पेशल!)

जेवताना गॅजेट्स ठेवा दूर

जेवताना हातात फोन, खेळणी किंंवा समोर लॅपटॉप व टिव्ही सुरु असेल तर पोटाला योग्य संकेत मिळत नाहीत. हातात काही न ठेवता फक्त जेवण केल्यास मुल योग्य प्रमाणात आहार घेऊ शकते. पोट व्यवस्थित भरल्यास लेप्टिन नामक हार्मोन शरीरात रिलीज होतो. जर जेवताना मुलांचं चित्त विचलित झालं तर मुल लेप्टिनच्या सिग्नलवर लक्ष देऊ शकत नाही. यामुळे एकतर मुल कमी खातं किंवा जास्त खातं.

(वाचा :- बाळाचे केस नैसर्गिकरित्या घनदाट करण्यासाठी ट्राय करा ‘हे’ रामबाण घरगुती उपाय!)

डिनरनंतर आयस्क्रिम किंवा चॉकलेट

संध्याकाळ नंतर पचनक्रिया स्लो होते आणि डिनरनंतर जड व अनहेल्दी फुड खाणं टाळावं. कोल्ड ड्रिंक्स, आयस्क्रिम किंवा चॉकलेट खास करुन डिनर नंतर खाल्ल्यास शरीरास कोणतेही पोषण देत नाही. डिनरनंतर मुलांना पिझ्झा व बर्गरसारखे पदार्थही देऊ नयेत. रात्रीच्या जेवनाचा प्रभाव आपल्या झोपेवर देखील होतो त्यामुळे मुलांच्या रात्रीच्या जेवनाची विशेष काळजी घ्यावी. झोप पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम शरीरावर, भावनांवर व मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. रात्री मुलांना डाळ-भात, दाल खिचडी किंवा भाजी-चपाती खाऊ घाला. रात्रीचं जेवण हलकंच असावं याने झोप चांगली लागते.

(वाचा :- लहान मुलांना झालेली डिहायड्रेशनची समस्या कशी ओळखावी व त्यावर उपाय काय?)

चहा-कॉफीऐवजी हळदीचं दूध

लहान मुलांना कोणते पदार्थ पौष्टिक व कोणते अनहेल्दी हे कळत नाही. त्यामुळे मोठ्या माणसांना खाताना बघून मुलं त्याचा हट्ट धरतात पण त्यांचा कोणता हट्ट पुरवावा व कोणता नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. जसं की चहा व कॉफीमध्ये कॅफिन असतं जे शरीरासाठी व मेंदूसाठी घातक असतं. त्यामुळे मुलांना चहा किंवा कॉफी देऊ नये. त्या बदल्यात मुलांना हळद व मध घातलेलं गरमा गरम दूध प्यायला द्यावं. यामुळे त्यांची हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, झोप चांगली लागते, भूक वाढते असे बरेच लाभ होतात.

(वाचा :- १०० वर्षे जुन्या ‘या’ रेसिपीने वाढवा मुलांची ताकद, वजन व रोगप्रतिकारक शक्ती!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *