मुलांना हेल्दी सवयी कशा लावाव्यात याविषयी ऋजूता दिवेकरने दिला सल्ला!

Spread the love

खेळांची आवड लावा

अनेक पालकांचा असा गैरसमज असतो की मुलांना खेळायला पाठवले तर मुल बिघडेल. त्यामुळे पालक मुलांना केवळ घरातच खेळू देतात. पण मुलांना घराच्या चार भिंतीमध्ये खेळायला लावण्यापेक्षा मैदानी खेळाची आवड लावायला हवी. यामुळे त्यांच्या शारीरिक क्रिया मोठ्या प्रमाणावर होतात आणि मुल उत्स्फूर्त बनते. घरगुती खेळाने मुलाच्या शरीराची हालचाल होत नाही. त्याचे शरीर सुदृढ बनत नाही. त्यामुळे मुलांना चांगल्या आहारा सोबतच खेळाची आवड आवर्जून लावा.

(वाचा :- हिवाळ्यात मुलांना चुकूनही देऊ नका ‘हे’ पदार्थ, नाहीतर येईल पश्चातापाची वेळ!)

स्वयंपाकघरात मदत

मुलांना लहानपणापासूनच स्वयंपाक घरात मदत करण्याची सवय लावायला हवी. यामुळे होते काय तर मुलांना अनेक पदार्थांबद्दल कळते. मुलांना अनेक गोष्टी शिकवण्यासह तुम्ही त्यांना विविध पदार्थांचे शरीराला होणारे फायदे सुद्धा समजावू शकता. यामुळे जे पदार्थ मुलांना आवडत नाही ते पदार्थ सुद्धा ते खाऊ लागतील. या व्यतिरिक्त जेवण बनवण्यासाठी किती मेहनत घेतली जाते हे पाहून ते कधी अन्नाचा अपमान करणार नाहीत आणि नेहमी निरोगी आहारालाच प्राधान्य देतील.

(वाचा :- मुलांसाठी घरच्या घरी बनवा ‘या’ ५ प्रकारच्या हेल्दी व टेस्टी खिचडी!)

फास्ट फूड कमी खाणे

लहान मुलांना चटर पटर आणि मसालेदार पदार्थ खूप आवडतात. पण हे पदार्थ मुलांना शक्य तितके कमी खाऊ द्यावेत. जर तुम्ही मुलाला चांगला पोषण आहार देत आहात पण सोबत जर हे पदार्थ सुद्धा मुल मोठ्या प्रमाणात खात असेल तर तुमच्या चांगल्या पोषण आहाराचा काही उपयोग होणार नाही. मुल जेवढे कमी फास्ट फूड खाईल तेवढे ते जास्त निरोगी राहील. त्यामुळे फास्ट फूड पेक्षा मुलांना जास्त जास्त घरचे खाणे खाऊ घाला.

(वाचा :- ‘या’ वयाआधी लहान मुलांना आहारात चुकूनही देऊ नयेत ब्रेड!)

टीव्ही बघण्याचा टाईम

मुलांना दिवसभर टीव्ही पाहण्याची सवय असेल तर तुम्ही शक्य तितकी हि सवय कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण एकदा का मुलाला टीव्हीची सवय लागली की त्यांचे अनेक गोष्टींमधून लक्ष उडते. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर सुद्धा दिसून येतो. टीव्हीच्या नादात अनेकदा मुले वेळेवर जेवत नाही आणि साहजिकच पुरेसे पोषण शरीराला मिळत नाही. सतत टीव्ही समोर बसून राहिल्याने शारिरीक हालचाल मुलांची होत नाही आणि त्याचे शरीर अकार्यक्षम बनते.

(वाचा :- बाळाला कोणत्या वयापासून पाजावं बाटलीने दूध? जेणे करुन पोषक तत्वांशी करावी लागणार नाही तडजोड!)

व्यायाम शिकवा

मुल थोडे फार सुजाण झाले की तुम्ही त्याला आवर्जून व्यायाम शिकवायला हवा. मात्र यासाठी पालकांना स्वत:ला सुद्धा व्यायामची आवड असायला हवी. जर पालक रोज मुलांसमोर व्यायाम करत असतील तर साहजिक त्यांना पाहून मुले सुद्धा व्यायाम करू लागतील. जे आई वडील करतात त्याचेच अनुकरण सामान्यत: मुले करतात. यामुळे मुलांना लहानपणापासूनच व्यायामाची आवड लागेल. म्हणजेच उत्तम आहारासोबतच व्यायामुळे त्यांचे शरीर अधिक सक्षम आणि निरोगी होईल.तर या सवयी नक्की आपल्या मुलांना लावा आणि त्यांना अधिक निरोगी बनवा. हि माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा ज्नेकारून त्यांना सुद्धा याबद्दल कळेल आणि चांगल्या पोषण आहारा सोबत ते मुलांना आरोग्यदायी सवयी लावून अधिक सक्षम बनवू शकतील.

(वाचा :- मुलांना सतत उचकी लागते? मग जाणून घ्या त्यामागील कारणं व घरगुती उपाय!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *