मुलांसाठी घरच्या घरी बनवा ‘या’ ५ प्रकारच्या हेल्दी व टेस्टी खिचडी!

Spread the love

जन्माला आलेल्या बाळाची काळजी घेण्यासोबत सर्वाधिक लक्ष द्यावं लागतं ते त्यांच्या आहारावर कारण नवजात बाळाची शारीरिक स्थिती कमजोर होत असते. हाच काळ असतो जिथून त्याचे शरीर सुदृढ व्हायला सुरुवात होते. म्हणून बाळ जेव्हापासून थोडा आहार घ्यायला सुरुवात करेल तेव्हापासूनच त्याला पौष्टिक आहार देण्याचा सल्ला दिला जातो. पहिले 6 महिने बाळ हे आईंच्या दुधावरच असते. या काळात त्याला अन्य कोणता पदार्थ भरवला जात नाही कारण तो त्याला पचू शकत नाही.

6 महिन्या नंतर बाळाला हळूहळू एक एक करून थोड आहार खाऊ घालतात आणि बाळ 1 वर्षे झाल्यावर त्याला चांगला आहार खाऊ घातला जातो. बाळाला अधिक पौष्टिकता मिळावी म्हणून या आहारात तुम्ही आवर्जून खिचडीचा वापर केला पाहिजे. खिचडी खूप पौष्टिक असते कारण यातून बाळाला अत्यंत जास्त प्रमाणात पोषण तत्वे मिळतात. आज या लेखातून आम्ही तुम्हाला 4 प्रकारच्या खिचड्यांबद्दल माहित देणार आहोत.

मुग डाळीची खिचडी

या खिचडी मधून बाळाला डाळ आणि तांदूळ दोन्हींचे गुण आणि फायदे मिळतील बाळासाठी मुग डाळीची खिचडी बनवण्यासाठी तुम्हाला अर्धा वाडगा डाळ, अर्धा वाडगा तांदूळ आणि अर्धा चमचा हळदची गरज आहे. या दोन्ही वस्तू सर्वप्रथम अर्धा तास कोमट पाण्यात भिजवत ठेवा. यानंतर प्रेशर कुकर मध्ये अडीच कप पाणी व सोबत डाळ आणि तांदूळ टाकून त्याच्या तीन शिट्या करा, जर शिटी झाल्यावर सुद्धा खिचडी जास्त जाड झाली असेल तर त्यात थोडे पाणी टाका. बाळाला पातळ आणि गरमागरम खिचडी खाऊ घाला.

(वाचा :- ‘या’ वयाआधी लहान मुलांना आहारात चुकूनही देऊ नयेत ब्रेड!)

व्हेजिटेबल खिचडी

या खिचडी मध्ये तुम्ही तुमच्या बाळाच्या आवडत्या भाज्यांचा समावेश करू शकता आणि त्याच्या आहारात निरोगी, पौष्टिक आणि व्हिटॅमिन युक्त भाज्या टाकू शकता. यासाठी एक चमचा मुग डाळ, एक चमचा तांदूळ, एक कप पाणी, अर्धा चमचा जिरे, एक चमचा तूप, अर्धा कप भाज्या आणि चिमुटभर मीठ व हळदीची गरज असते. डाळ आणि तांदूळ धुवून घ्या आणि त्यात तूप टाका आणि त्यानंतर जीरे टाकून परतून घ्या. आता कुकर मध्ये बाकीचे साहित्य टाकून चार शिट्या करा. नंतर झाकण उघडून खिचडी थंड होऊ द्या आणि ब्लेंडरच्या मदतीने ती मॅश करा.

(वाचा :- बाळाला कोणत्या वयापासून पाजावं बाटलीने दूध? जेणे करुन पोषक तत्वांशी करावी लागणार नाही तडजोड!)

पालक खिचडी

पालक हे लहान मुलांसाठी अत्यंत पोषक असते. यात अनेक पोषक तत्व आणि खनिज पदार्थ असतात जे बाळाच्या शारीरिक विकासासाठी अत्यंत फायदेशीर असतात. पालकची खिचडी बनवण्यासाठी तुम्हाला अर्धा कप तांदूळ, एक कप तूर डाळ, अर्धा कप बारीक चिरलेले पालक, एक चमचा तूप, अर्धा चमचा जिरे, लसणाच्या दोन पाकळ्या आणि चिमुटभर हळदीची गरज असते. अर्ध्या तासासाठी डाळ आणि तांदूळ धुवून भिजवत ठेवा आणि त्यानंतर प्रेशर कुकर मध्ये हळदी सोबत पाच शिट्या लावा आणि मग काढून ठेवा. आता कुकर मध्ये तूप गरम करा आणि जीरा भाजून घ्या आणि मग लसूण टाका. यानंतर त्यात पालक टाका आणि काही वेळ भाजून घ्या. जेव्हा पालक शिजेल तेव्हा त्यात तांदूळ टाका. काही मिनिटे हे सर्व शिजू द्या आणि तयार झाली तुमची खिचडी!

(वाचा :- मुलांना सतत उचकी लागते? मग जाणून घ्या त्यामागील कारणं व घरगुती उपाय!)

दलिया खिचडी

दलियाची खिचडी सुद्धा बाळासाठी एक उत्तम पोषण पदार्थ ठरू शकतो. यात मोठ्या प्रमाणात फायबर असते आणि यामुळे पोटाच्या समस्यांपासून बाळाची सुटका होते. तीन कप दलिया, एक कप मुग डाळ, एक चमचा जिरे, चिमुटभर हळद आणि हिंग पावडर, एक कांदा, बारीक केलेले लसणाचे तुकडे आणि आले व हवं असल्यास बटाटा वा गाजर याचा वापर करावा. दलिया धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. आता प्रेशर कुकर मध्य तूप टाका. मग हिंग आणि जीरा परतून घ्या. त्यानंतर यामध्ये कांदा आणि आले सोबत भाज्या सुद्धा टाका. एक मिनिटे फ्राय करा आणि मग मुग व दलिया टाका. 4 कप पाणी टाकून 4 शिट्या लावा आणि बाळाला नंतर खाऊ घाला.

(वाचा :- लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवण भरवल्याने ‘या’ गंभीर आजारांपासून मिळते सुरक्षा!)

खिचडीचे फायदे

खिचडी बाळासाठी पोषणाचा प्रकार असतोच. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खिचडी झटपट तयार होते. बाळाला भूक लागल्यावर आई लगेच खिचडी बनवू शकते किंवा सकाळीच खिचडी बनवून मग ती गरम करून दिवसभरात बाळाला खायला देऊ शकते. यात सर्व घरगुती पदार्थ असल्याने कोणतेही घातक घटक बाळाच्या शरीरात जाण्याचा धोका नसतो. त्यामुळे बाळाला नक्की खिचडी खाऊ घाला जेणेकरून बाळ सुरक्षित राहील व त्याला पोषण सुद्धा मिळेल.

(वाचा :- लहान मुलांना अशा पद्धतीने खाऊ घाला खजूर, मिळतील दुप्पट लाभ!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *