मुलांसाठी नाश्त्यात बनवा ‘हा’ पौष्टिक पदार्थ, आहे पचण्यास हलका व आरोग्यास लाभदायी!

Spread the love

प्रत्येक पालकाला आपलं बाळ अगदी सुदृढ असावं असं वाटत असतं. बाळाला सुदृढ करायचं असेल तर त्याला तसाच सकस आणि पौष्टिक आहार देण गरजेचं आहे. पण बऱ्याच पालकांना या वयात बाळाला नेमका काय आहार द्यावा हे माहित नसतं यामुळे कधी कधी बाळाच्या पोषणात कमतरता राहते. पण आज या लेखात आम्ही तुम्हाला एका विशेष डिश बद्दल सांगणार आहोत जी तुम्ही बाळाला दिलीत तर बाळाला सर्व प्रकारची पोषक तत्वे मिळतील आणि बाळ सुदृढ सुद्धा होईल. अनेकदा बाळाच्या आहारात फळे, भाजीपाला किंवा तत्सम प्रकारच्या पदार्थांचा समावेश केला जातो.

पण ही डिश काहीशी वेगळी आहे. बाळाला सुद्धा यामुळे एक वेगळी नवीन चव मिळेल आणि बाळ सुद्धा हा पदार्थ खाताना कंटाळा करणार नाही. तर मंडळी त्या पौष्टिक पदार्थांचे नाव आहे हेल्दी मसाला पोहा! तुमच्यापैकी अनेकांनी याबद्दल ऐकलं असले तर अनेकांना असं वाटत असले की लहान बाळाला पोहे द्यायचे? ते सुद्धा मसाला पोहे? त्याला ते पचतील का? पोह्याने काय फायदा होणार आहे? तर मंडळी चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया.

पाककृती

सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊया की बाळासाठी हे पौष्टिक मसाला पोहे कसे बनवावेत. तर यासाठी तुमच्याकडे काही साहित्य असणे गरजेचे आहे. 1 कप पोहे, 2 बारीक चिरलेले कांदे, 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या, 1 कडीपत्ता, 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे तेल, ¼ राई, ¼ चमचा जीरे, ¼ छोटा चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा साखर आणि स्वादानुसार मीठ हे सर्व साहित्य सर्वप्रथम मांडून घ्या.

(वाचा :- प्रत्येक नवजात बाळाच्या केसांत फरक असण्यामागील कारणं? बाळाच्या केसांची कशी निगा राखावी?)

बाळासाठी पोहे बनवण्याची पद्धत

सर्वात प्रथम पाहे 5 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा आणि मग ते पाणी गाळून भिजलेले पोहे एका भांड्यात काढा. आता एका कढई मध्ये तेल गरम करून घ्या आणि त्यात वर सांगितलेल्या प्रमाणात मोहरी टाका. जेव्हा मोहरी तडतडून तेलात वेगळी होऊ लागेल तेव्हा जीरे आणि मग कडीपत्ता व त्या मागोमाग मिरची घाला. शेवटी शेंगदाणे टाकून हे सगळे मिश्रण दोन मिनिटे परतून घ्या. आता यामध्ये हिंग आणि त्यानंतर हळद पावडर टाका. सोबतच कांद्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्या. आता यात तुम्ही भिजवलेले पोहे टाका आणि 1-2 मिनिटे हे मिश्रण सुद्धा परतून घ्या. सर्व साहित्य योग्य प्रकारे मिक्स होत आहे यावर लक्ष द्या. कढई झाकून घ्या आणि आता मंद आचेवर 1 मिनिटे वाफेवर शिजू द्या. आच बंद करा आणि पोह्यावर मस्तपैकी लिंबू पिळा. अशा प्रकारे तयार झाले तुमचे पौष्टिक आणि रुचकर मसाले पोहे!

(वाचा :-मुलांना आहारात आवर्जून द्या ‘हे’ पदार्थ, रोगप्रतिकारक शक्तीसोबतच पचनक्रियाही सुधारेल!)

सहज पचतात

आता आपण जाणून घेऊया की या पोह्यांचा बाळाला नेमका फायदा काय होतो. तर मंडळी पोहे हे बाळाला सहज पचतात. बाळाला 1 वर्ष पूर्ण झाले तरी तुम्ही थेट कोणतीही गोष्ट खायला देऊ शकत नाही कारण त्याची पचन यंत्रणा तितकी सक्षम नसते. पण या काळात पोहे मात्र बाळाचे पोट सहज पचवू शकतात. पोहे खाल्ल्याने बाळाला कोणताही अपचनाचा त्रास सुद्धा होत नाही. शिवाय भूक कमी लागते आणि बाळ उर्जावान राहते.

(वाचा :- ‘या’ कारणांमुळे कमजोर होते मुलांची रोगप्रतिकारक शक्ती, काळजी घ्या!)

मोठ्या प्रमाणात लोह असते

बाळाला पोहे खाऊ घालण्यामागचा हा सर्वात मोठा फायदा आहे. बाळाच्या शरीरासाठी लोह हे अत्यंत गरजेचे असते आणि त्याची पूर्तता पोह्यांमधून होऊ शकते. म्हणूनच मसाला पोहे बाळासाठी एक उत्तम आहार ठरतो. जर बाळाच्या शरीरात लोहाची कमी निर्माण झाली तर त्याला एनीमिया सारखा गंभीर आजार होऊ शकतो. पण लोह योग्य प्रमाणात मिळाले तर या आजाराचा धोका टाळतो आणि हिमोग्लोबिनचा स्तर सुद्धा संतुलित राहतो.

(वाचा :- मुलांना देताय व्हिटॅमिनयुक्त आहार? मग ही माहिती जाणून घ्याच!)

ग्लूटेनची कमी मात्रा

लहान बाळाला आहार भरवताना एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते की त्याला तोच आहार भरवावा ज्यामध्ये ग्लुटेनची मात्रा कमी असते. कारण ग्लुटेनची मात्रा जास्त असल्यास त्याचा विपरीत परिणाम बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो आणि तो फूड अॅलर्जीला बळी पडू शकतो. पण याबाबतीत पोहे अपवाद ठरतात. पोह्यांमध्ये ग्लुटेन आढळत नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त आपल्या बाळाला पोहे खायला देऊ शकता आणि त्याला निरोगी व सुदृढ बनवू शकता.

(वाचा :- बाळाला सर्दी-पडसं झाल्यास करा ‘हे’ घरगुती रामबाण उपाय!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *