मुलांसाठी बनवा ‘या’ पदार्थापाासून झटपट नाश्ता, आरोग्यास होतील लाभच लाभ!

Spread the love

बाळ जितकं पौष्टिक अन्न खातं तितकं ते जास्त निरोगी राहतं. म्हणून बाळाला चमचमीत पदार्थ देण्यापेक्षा शक्य तितके पौष्टिक पदार्थ द्यायला हवेत. पण बाळाला पौष्टिक पदार्थ म्हणजे नेमकं काय द्यावं हे पालकांना माहित नसतं, शिवाय ते पदार्थ बनवतात कसे हे सुद्धा माहित नसतं. तुम्ही सुद्धा अजून याच प्रश्नावर अडकला असाल तर आता काळजी करू नका. आम्ही तुम्हाला एका अशा पदार्था बद्दल सांगणार आहोत ज्यापासून बनवलेला आहार बाळाला खूप पौष्टिकता प्रदान करेल आणि निरोगी बनवेल.

तो पदार्थ म्हणजे रवा होय. तुम्ही बाळाला रव्यापासून बनवणारे पदार्थ खाऊ घातलेत तर त्याचे मोठे फायदे बाळाला होतील. यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढेल, पचनासाठी सुद्धा रवा खूप चांगला पदार्थ असतो. चला तर जाणून घेऊया रवा कधी, केव्हा आणि कसा बाळाला खाऊ घालावा?

रव्याचे फायदे

रव्यामध्ये लोह आणि पोटॅशियम असते. जे शरीरातील हिमोग्लोबिनचा स्तर सुधारते आणि हृदयाला सुद्धा निरोगी ठेवते. शिवाय रव्यामध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई देखील असते. लहान बाळाचे पचन तंत्र अधिक सक्षम नसते. अशावेळी बाळाला कोणताही आहार सहज पचत नाही. म्हणून या वयात त्याच्या आहारात अगदी मोजक्या आणि पचणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा. त्या पदार्थांपैकीच एक आहे रवा! त्यामुळेच या वयात बाळाला रवा खाऊ घालणे सर्वच दृष्टीने फायदेशीर ठरते.

(वाचा :- आईच्या गर्भात असताना बाळ कोणत्या गोष्टी सर्वात जास्त एन्जॉय करतं?)

मुलांना रवा खाऊ घालायला कधी सुरुवात करावी?

बाळ जन्माला आले की पहिले सहा महिने त्याला केवळ आईचेच दूध द्यावे. इतर कोणताही आहार बाळाला देऊ नये कारण त्याचे पचनतंत्र सशक्त नसल्याने तो आहार त्याला पचणार नाही. बाळाला कोणताही ठोस आहार हा 7 व्या महिन्यापासून भरवायला सुरुवात करावा. या आहारात तुम्ही हळूहळू रव्यापासून तयार होणारे पदार्थ समाविष्ट करू शकता. जेव्हा पहिल्यादा बाळाला तुम्ही रव्याचा पदार्थ भरवाल तेव्हा तीन दिवस वाट पहा. या काळात त्याला कोणी अ‍ॅलर्जी होते का ते पहा. जर अ‍ॅलर्जी नाही झाली तर तुम्ही रव्याचे पदार्थ बाळाला भरवणे सुरु ठेवू शकता.

(वाचा :- बाळाला ‘हा’ पदार्थ खाऊ घातल्यास बुद्धी होईल तल्लख!)

रव्याचा उपमा

बाळाला तुम्ही रव्याचा उपमा खाऊ घालू शकता. हा पदार्थ बनवणे अतिशय सोपे आहे. यासाठी तुम्हाला रवा, जीरा, मोहरीचे तेल, हिंग, हळद, तूप, मीठ आणि गरम पाणी या साहित्याची गरज असते. हे साहित्य जमा झाल्यावर एक पॅन घ्या. त्यात थोडे तूप टाकून गरम करा. त्यानंतर त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडू लागली की त्यात जिरे टाका आणि हलका करडा रंग आल्यावर रव्याच्या प्रमाणानुसार त्यात पाणी टाका आणि उकळी येऊ द्या. मिश्रण उकळू लागल्यावर त्यात हळूहळू रवा टाका आणि सतत मिश्रण ढवळत रहा. या गोष्टीवर लक्ष ठेवा की यात गुठळ्या पडणार नाहीत. आता हळद, हिंग आणि मीठ टाकून भांडे झाकून ठेवा. मध्यम आचेवर पाच मिनिटे हे मिश्रण शिजू द्या. मग पॅन गॅस वरून उतरवून तयार झालेला उपमा थंड होऊ द्या. मग तो बाळाला खाऊ द्या.

(वाचा :- शिस्त लागावी म्हणून मुलांवर हात उचलताय? मग परिणाम जाणून घ्याच!)

रव्याची लापशी

उपमा हा तिखट पदार्थ आहे जर तुम्हाला बाळासाठी गोड काहीतरी बनवायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही रव्याची लापशी बनवू शकता. यात चव आणि पौष्टिकता दोन्ही असते. यासाठी तुम्हाला दीड चमचा रवा, दीड चमचा वाटलेला गुळ, अर्धा चमचा तूप, अर्धा चमचा गरम पाणी, एक कप गायीचे दूध या साहित्याची गरज आहे. जर बाळ वर्षाचे झाले नसले तर गायीचे दूध टाकू नका. आता एक पॅन घ्या. त्यात दोन चमचा रवा टाकून तो भाजून घ्या. आता गरजेनुसार यात पाणी आणि तूप टाका. हळूहळू सगळे मिश्रण मिक्स करा. मिश्रण अगदी सुटसुटीत राहील याची खात्री करून घ्या. मध्यम आचेवर लापशी शिजवून घ्या. आता यात वाटलेला गुळ टाका. 3 मिनिट शिजायला ठेवा आणि मग गॅस बंद करा. लापशी तयार झाल्यावर ती थंड होऊ द्या आणि मग बाळाला भरवा.

(वाचा :- या कारणासाठी बाळाला ड्राय फ्रुट पावडर खाऊ घालाच!)

रव्याची अ‍ॅलर्जी झाल्यास

अनेकदा असे होते की काही मुलांना रवा खाल्यानंतर शारीरिक त्रास सुरु होतात. असे झाल्यास त्या बाळास रव्याची अ‍ॅलर्जी झाली असे म्हणतात. असे काही निदर्शनास आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच बाळाला रवा भरवायचा की नाही ते ठरवा. बाळाला अ‍लर्जी होते आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याला पहिल्यांदा रव्याचा पदार्थ खाऊ घातल्यावर 3 दिवस वाट पहा. जर त्या 3 दिवसांत कोणताच वाईट परिणाम बाळावर न दिसल्यास तुम्ही बाळाला रोज रव्याचे पदार्थ खाऊ घालू शकता.

(वाचा :- मुलीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सोहा अली खान फॉलो करते ‘हा’ डायट प्लान!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *