मुलींच्या ‘या’ ५ सवयींमुळे मुलांचं डोकं होतं खराब, पळू लागतात नात्यापासून दूर!

Spread the love

मुलं आणि मुलींची अनेक गोष्टींत वेगवेगळी मतं असतात. मग या मतांचे परिणाम रिलेशनशीपमध्येही दिसून येतात. या मतभेदामुळे किंवा मतांमधील अंतरामुळे नात्यात कमीत कमी समस्या याव्यात यासाठी प्रत्येक जोडपं आपल्यापेक्षा विरुद्ध स्वभावाच्या व्यक्तीला स्वीकारुन किंवा त्या व्यक्तीचा स्वभाव स्विकारुन ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करतं. पण काही गोष्टी अशा असतात ज्या मुलंही बदलू शकत नाहीत आणि मुलीही देखील,

अशावेळी ख-या समस्या सुरू होतात. आज आम्ही मुलींच्या अशाच काही सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या कळत-नकळत नात्यात किंवा त्यांच्या प्रेमात असलेल्या मुलाचं डोकं खराब करतात. मुलींना जर त्या सवयींची माहिती असेल तर त्या काही प्रमाणात आपल्या या सवयींवर नियंत्रण ठेऊ शकतील जेणे करुन रिलेशनशीप हेल्दी राहण्यास मदत होईल.

न बोलता भावना समजण्याची अपेक्षा

ही कदाचित नात्याशी जोडलेली सर्वात सामान्य समस्या आहे. मुली रागावल्या की आपल्या भावना किंवा मतं मनातल्या मनात दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्या आपल्या जोडीदाराविषयी कुठेतरी बोलणं बंद करतात व शांत शांत राहू लागतात. मुली असं जेव्हा वागू लागतात तेव्हा त्यांच्या अशा वागणुकीमागे नेमकं कारण काय आहे? हेच समजत नाही. ते थेट मुलीला प्रश्न विचारतात, पण कित्येक मुली अपेक्षा करतात की त्यांच्या मनातील इच्छा न बोलताच मुलांना समजाव्यात. जे की खूपच अनप्रॅक्टिकल आहे. त्यामुळे तुम्हाला अशी कित्येक मुलं पाहायला मिळतील ज्यांना माहितच नसतं की त्यांची पत्नी किंवा प्रेयसी का नाराज आहे? ही गोष्ट त्यांना खूप मनस्ताप देते.

(वाचा :- ‘या’ ४ गोष्टी सांगतात की तुमचा जोडीदार का करत नाही तुम्हाला स्वत:हून पहिला मेसेज!)

पर्सनल स्पेसचा सन्मान न करणं

साधारणत: असं मानलं जातं की, मुलं मुलींच्या पर्सनल स्पेसमध्ये खूपच ढवळा ढवळ करतात, पण खरं तर मुलीही याबाबतीत कमी नसतात. आपला बॉयफ्रेंड कुठे जातो आहे? फोनवर कोणाशी बोलतो आहे? कोणासोबत चॅटिंग करतो आहे? याबद्दल सतत विचारणा करत राहणं, न विचारता त्याच्या वस्तू वापरणं, मित्रांसोबत कमी वेळ व्यतीत करु देणं, ट्रिपवर जाण्यास परवानगी न देणं किंवा मी पण येणार हा हट्ट धरणं या गोष्टी अशा आहेत ज्या एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल स्पेवर आघात करतात. त्यामुळे मुली असो वा मुलगे, प्रत्येकाने नात्यात असतानाही एकमेकांच्या पर्सनल स्पेसचा सन्मान केला पाहिजे.

(वाचा :- माधुरीसोबत नाव जोडलं गेल्यानंतर अनिल कपूरने केलं ‘हे’ ह्रदयस्पर्शी वक्तव्य!)

डॉमिनेट करण्याचा प्रयत्न

असं करु नको, तिथे जाऊ नकोस, असंच का केलंस? या गोष्टी आई-वडिलांच्या तोंडी तर शोभून दिसतात पण नात्यात असताना एखादी मुलगी आपल्या जोडीदाराशी असं वागू लागते तेव्हा या गोष्टी त्याला सफोकेट करू लागतात. हा एकप्रकारे डॉमिनेट स्वभाव झाला आणि कोणत्याही अडल्ट व्यक्तीला हे पचवणं किंवा स्वीकारणं अवघडच वाटू लागतं. त्यामुळे मुलींनी हे कायम लक्षात ठेवावं की जोडीदार जर तुमचं म्हणणं ऐकत असेल तर ते पूर्णपणे प्रेम आणि आदर असल्यामुळेच ऐकतो. जर तुम्ही अति केलं तर तोही सहन करणार नाही.

(वाचा :- बिपाशा बासूला सोडून ‘या’ कारणामुळे जॉन अब्राहमने केलं एका साधारण मुलीशी लग्न!)

स्वत:कडे लक्ष न देणं

अशा आपण कितीतरी मुली पाहतो ज्या वर्षानुवर्षे रिलेशनशीपमध्ये असताना देखील स्वत:वर अजिबात लक्ष देत नाहीत. यावरुन भलेही मुलं काही बोलत नसतील किंवा व्यक्त होत नसतील पण त्यांना आपल्या प्रेयसीची ही गोष्ट अजिबात आवडत नाही. मुलींनी स्वत:ची सोशल लाइफ खराब करणं हे त्यांना अस्वस्थ करतं. कारण जेव्हा असं होतं तेव्हा मुली आपल्या जोडीदाराकडून जास्त वेळ व अटेंशनची मागणी करु लागतात, जे मुलांच्या सोशल लाइफवरही नकारात्मक परिणाम करु लागतं. त्यामुळे ही गोष्ट त्यांना चिड आणते. त्यांचं म्हणणं असतं मुलींना स्वत:चं मन आपल्या आवडत्या गोष्टी करण्यात किंवा छंद जोपासण्यात गुंतवावं.

(वाचा :- एकटं राहूनही आनंदी व सुखी आयुष्य जगता येतं! जाणून घ्या कसं?)

वाद घालणं

छोट्या छोट्या गोष्टीवरुन वाद घालणं आणि नात्यातील वातावरण अस्वस्थ करणं ही मुलींची सवय देखील मुलांसाठी एक प्रकारे डोकेदुखी असते. अगदी क्षुल्लक गोष्टीवरुन हट्ट करणं, रुसून बसणं, समजूत घातल्यानंतरही मूड ठिक न करणं, शिवीगाळ करणं आणि प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने पाहणं या गोष्टी मुलांना अजिबात आवडत नाहीत. मुलं काहीसे प्रॅक्टिल असतात तर मुली इमोशनल, स्वभावातील या अंतराचा प्रभाव कुठेतरी नात्यावर पडताना दिसतो. त्यामुळे एकाने एक पाउल मागे घेऊन नातं सुखी व आनंदी बनवण्यासाठी प्रयत्नीशील राहावं जेणे करुन एकमेकांचा कंटाळा येण्याऐवजी आदर बनून राहतो.

(वाचा :- ‘या’ ५ सवयी जाणून घेतल्यानंतर डोळे बंद करुन द्या लग्नाला होकार!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *