मुलीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सोहा अली खान फॉलो करते ‘हा’ डायट प्लान!

Spread the love

या करोना काळात (corona virus) रोगप्रतिकार शक्ती (immunity power) उत्तम असणे हाच सुरक्षित राहण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. तुम्हालाही माहित असेलच की ज्या व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती कमी असते त्यांनाच करोना विषाणू सर्वाधिक लक्ष्य करतो. अशावेळी लहान मुलांची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते कारण लहान मुलांचे शरीर विकसीत होत असते आणि त्यांची रोगप्रतिकार शक्ती अतिशय कमी असते. करोनाने या जगात शिरकाव केल्यापासून तज्ञ सांगत आहेत की लहान मुलांची सर्वाधिक काळजी घ्यायला हवी कारण त्यांना करोना होण्याचा सर्वाधिक धोका आहे.

म्हणूनच प्रत्येक पालक हे चिंतेत आहेत. अशीच चिंता लागली होती प्रसिद्ध अभिनेत्री सोहा अली खान (soha ali khan) हिला! आपल्या गोंडस मुलीची तिने या करोना काळात खूप काळजी घेतली आणि तिची रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून अनेक उपाय केले, विविध प्रकारचे मार्ग अवलंबले. तुम्ही सुद्धा तिच्याकडून काही टिप्स घेऊन आपल्या मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकता आणि त्याला करोनापासून दूर ठेवू शकता.

पौष्टिक आहाराची सवय

सोहा अली खान सांगते की, “मी माझ्या मुलीला जंक फूड पासून शक्य तितके दूर ठेवते आणि तिला जास्तीत जास्त चांगले पौष्टिक आहार खाऊ घालते. आपल्याला वाटते की पौष्टिक आहार म्हणजे बेचव पदार्थ पण असे नाही. पौष्टिक आहारामध्येही अनेक असे पदार्थ आहेत जे चवीला उत्तम असतात. मी मुलीला तेच खाण्याची सवय लावली आहे आणि तिलाही ते आवडतात. असे पौष्टिक खाण्याची सवय मला माझ्या आईकडून मिळाली आहे आणि आता तो वारसा मी माझ्या मुलीला देत आहे.” तर मंडळी रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर पौष्टिक आहाराला प्राधान्य द्यायलाच हवं.

(वाचा :- ही पोषक तत्वे करतात लहान मुलांची हाडे मजबूत!)

रोज खाऊ घालते बदाम

सोहा अली खानच्या आईने लहानपणापासून आपल्या मुलांना बदाम खाऊ घालण्याची सवय लावली होती आणि तिच सवय सोहाने आपल्या मुलीला सुद्धा लावली आहे. बदाम खाल्ल्याने केवळ बुद्धी वाढते वा मेंदूचा विकास होतो असे आपल्याला वाटते पण त्यापेक्षाही बदामात असे काही उत्तम घटक असतात जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करतात. म्हणूनच विशेषत: लहान मुलांना बदाम हे जरूर खाऊ घालावेत. मुलांना सुद्धा ते आवडतात. तुम्ही मुलांना बदाम दुध देखील बनवून देऊ शकता.

(वाचा :- बहुतांश वेळा नवजात बाळाच्या रडण्यामागे ‘ही’ कारणं असतात!)

बदाम खाण्याचे इतर फायदे

बदामात पाच महत्त्वाचे पोषक घटक असतात जसे की जीवनसत्त्व ई, मॅग्नेशियम, प्रोटीन, रायबोफ्लेवीन, झिंक इत्यादी! बदाम खाल्ल्याने वजन संतुलित राहते आणि त्वचा सुद्धा स्वस्थ बनते. शिवाय बदामाच्या सेवनाने मधुमेह देखील दूर होतो. बदामाचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे बदाम खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते यामुळे भूक कमी लागते. बदामामध्ये चांगले फॅट आणि फायबरचा समावेश सुद्धा असतो. सोहा म्हणूनच आपल्या मुलीला बदाम खाऊ घालते. जेणेकरून तिचे पोट भरलेले राहील, तिला सारखी भूक लागणार नाही आणि ती जंक फूड खाण्याचा हट्ट धरणार नाही.

(वाचा :- नवजात बाळाच्या डोक्याला गोल आकार द्यायचा आहे? मग ट्राय करा ‘या’ टिप्स!)

सोहा बनवते पौष्टिक डायट

आपल्या मुलीसाठी सोहा नेहमीच पौष्टिक आहारालाचा प्राधान्य देते. यामागे तिचा उद्देश एकच आहे की तिच्या मुलीचे आरोग्य उत्तम राहावे. मुलांना जास्त पोषणाची गरज असते जर त्यांना योग्य वयात योग्य पोषण मिळाले तर त्याचे आरोग्य सक्षम राहते व रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजार त्यांच्या जवळपास सुद्धा फिरकत नाही. सोहाने आपल्या मुलीच्या आहारात ताजी फळे, स्मुदी, ओट्स, दही, डाळ भात, भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश करते. यातून तिला हवी असलेली योग्य पोषक तत्वे मिळतात व ती निरोगी राहते.

(वाचा :- मुलांना टायफॉइड झाल्यास ही आहेत त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार!)

कसे आहे इनायाचे रुटीन

सोहाने आपली मुलगी इनायाचे रुटीन सुद्धा अगदी ठरवून ठेवले आहे आणि ते कोणत्याही लहान मुलासाठी आदर्श असेच आहे. सकाळी उठल्यावर तिला नाश्त्याला ती बदाम खायला देते आणि काही वेळाने केली व सफरचंद सुद्धा देते. सोबत अन्य पौष्टिक आहार देखील असतोच. सकाळचा नाश्ता भरपेट खावा हा तज्ज्ञांचा सल्ला सोहा अगदी योग्य प्रकारे पळते. त्यानंतर दुपारचे जेवण आणि संध्याकाळी तिला एक ग्लास ताजे लिंबू पाणी प्यायला देते. शेवटी रोज बरोबर 6:30 वाजता ती इनायाल रात्रीचे जेवण भरवते. तर मंडळी यातून काही टिप्स तुम्ही आपल्या मुलासाठी वापरल्या तर तो सुद्धा नक्कीच निरोगी राहील.

(वाचा :- बाळाला बिस्किट खाऊ घालण्याचे ‘हे’ आहेत दुष्परिणाम!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *