मैत्री जपण्यासाठी या ८ गोष्टी आहेत महत्त्वाच्या

Spread the love

मुंबई टाइम्स टीम
आयुष्यामध्ये आपण अनेक लोकांच्या सहवासामध्ये येत असतो. त्यातून कळत-नकळतपणे अनेक गोष्टी शिकत असतो. तुमचं प्रेम आणि मनात असलेल्या मैत्रीपूर्ण भावना दोस्तापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं.

विश्वास महत्त्वाचा

जर एखादा मित्र त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींची माहिती तुमच्याशी शेअर करत असेल. त्या गोष्टी तुमच्या इतर मित्रांना सांगून गॉसिप करत असाल, तर तुमच्या मैत्रीवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही इतरांची वैयक्तिक माहिती तुमच्याकडेच ठेवू शकता का? असा प्रश्न स्वतःला विचारा.

शंकेला जागा नको

तुमचा मित्रा कोणते कपडे घालतो, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, याबद्दल तुम्ही सतत चिंता व्यक्त करता का? जर तुम्ही सतत चिंता व्यक्त करत असाल तर ते तुमच्या मैत्रीसाठी योग्य नाही. तुमच्या मित्राने विचारल्याशिवाय त्याला सल्ला देणं, हे आपण टाळायला हवं. तुमच्यात जरी मतभेद असले तरी तुम्ही मित्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात, ही भावना आधार देणारी असते.

चांगले श्रोते व्हा

तुमच्या मैत्रीचा धागा घट्ट करण्यासाठी एक अतिशय सोपी गोष्ट खूप उपयुक्त ठरू शकते, ती म्हणजे मित्राचं म्हणणं ऐकून घेणं. मात्र, ही गोष्ट सोपी असली तरी तिचं कृतीत रुपांतर होताना दिसत नाही. कारण समोरच्याचं ऐकून घेण्याची इच्छा नसते. मित्रालासुद्धा बोलण्याची संधी देणं गरजेचं आहे.

अतिकाळजी धोकादायक

तुमच्या मित्राची काळजी करणं अगदीच नैसर्गिक आहे. पण, तुमच्या मित्राच्या वेळेवर अधिकार गाजवणं किंवा तुमच्याशिवाय त्यांना त्यांच्या आवडीची कामं करू न देणं हे चुकीचं आहे. आपल्या मित्राची अतिकाळजी करणं, त्याने त्याच्या इतर मित्रांसोबत वेळ घालवल्यास त्याच्यावर वैतागणं यासारख्या गोष्टींमुळे मैत्रीपूर्ण नाती बिघडल्याची अनेक उदाहरणं आहेत.
(‘स्लो टेक्स्टिंग’मधून काय साधतो?)

महत्त्वाच्या क्षणांचे सोबती


मित्राच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये अनुपस्थित राहणारे काही जण असतात. तुम्ही तुमच्या कामांमध्ये कितीही व्यग्र असलात तरी तुमच्या मित्राच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांच्या वेळी तुम्ही उपस्थित राहणं गरजेचं आहे.

स्पर्धेला करा बायबाय


स्पर्धेमुळे तुमच्या मैत्रीच्या नात्यामध्ये दरी निर्माण होऊ शकते. मित्रांसोबत स्पर्धा केल्यानं नात्यातील गोडवा संपून जातो. मैत्री म्हणजे मित्रासोबत आपली सुख-दुःखं शेअर करणं, एकमेकांना मदत करणं, प्रोत्साहन देणं आणि एकमेकांचं यश साजरं करणं. जर तुम्ही प्रत्येकवेळी तुमच्या मित्रांसोबत स्पर्धा करत असाल, तर ते तुमच्या मैत्रीसाठी धोकादायक ठरु शकतं.
(टिकमार्क महत्त्वाचा, की खरा आनंद?)

अनावश्यक गोष्टींचं मोजमाप नको


लहानपणी आपण आपल्या मित्राच्या घरी किती वेळा गेलो आणि तो आपल्या घरी किती वेळा आला, हे आपण मोजत असतो. आता मोठेपणी मात्र आपण हे थांबवायला हवं. एखाद्या सोशल मीडिया साइटवर तुम्ही तुमच्या मित्राच्या किती पोस्ट लाइक केल्या आणि तुमच्या मित्राने तुमच्या पोस्ट्स वर किती इमोजी पाठवल्या याचं मोजमाप करु नका. जर तुम्हाला मैत्रीचा खरा अर्थ समजला असेल, तर तुमच्या मैत्रीपुढे या सर्व बाबी क्षुल्लक असल्याचं तुमच्या लक्षात येईल.
(साजरा करू नात्यांचा उत्सव)

वरचढ होण्याचा प्रयत्न कशासाठी?


तुम्ही जर सातत्याने तुमच्या मित्रावर वरचढ होण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्याचा तुमच्या मैत्रीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमची जी इच्छा आहे तेच तुमच्या मित्राने करावे, अशी जर तुमची अपेक्षा असेल तर ते तुमच्या मैत्रीच्या नात्यामध्ये दरी निर्माण करु शकतं. त्यामुळे असं करणं प्रकर्षानं टाळा.

संकलन- राहुल पोखरकर, ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *