मोहरी-कढीपत्त्याची फोडणी देऊन केलेली सफरचंदाची खमंग कोशिंबीर

Spread the love

How to make: मोहरी-कढीपत्त्याची फोडणी देऊन केलेली सफरचंदाची खमंग कोशिंबीर

Step 1: मोहरी-कढीपत्त्याची फोडणी

पॅनमध्ये तूप गरम करत ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात चिमूटभर हिंग, एक चमचा मोहरी, एक चमचा जिरे फ्राय करून घ्या. मोहरी तडकू लागल्याबरोबर त्यात एक चमचा चण्याची डाळ, एक चमचा उडदाची डाळ आणि काजूचे कापही परतून घ्या. यानंतर कढीपत्ता, चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या आणि चिमूटभर मीठ देखील मिक्स करावं.

Step 2: सर्व सामग्री मिक्स करून घ्या

दुसऱ्या बाउलमध्ये बारीक कापलेले सफरचंद, डाळिंबाचे दाणे, किसलेले ओलं खोबरं एकत्र घ्या आणि मिक्स करा. यानंतर तयार केलेली मोहरीची फोडणीही त्यात मिक्स करावी. चिमूटभर मीठ, दोन ते तीन चमचे लिंबाचा रसही मिश्रणात घालावा.

सर्व सामग्री मिक्स करून घ्या

Step 3: पौष्टिक कोशिंबिरीचा आस्वाद घ्या

सर्व सामग्री योग्य पद्धतीने एकजीव करून घ्या. गार्निशिंगसाठी कोथिंबिरीचा वापर करावा. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये या हेल्दी रेसिपीचा आस्वाद नक्की घ्या.

सफरचंदाची कोशिंबीर

Step 4: अ‍ॅपल सॅलेड : पाहा संपूर्ण पाककृती

वेट लॉस डाएट अ‍ॅपल सॅलेड | सफरचंदाची कोशिंबीर


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *