… म्हणून Samsung Galaxy M51 ठरतो 25 हजारांच्या आत बेस्ट फोन

Spread the love

मिड रेंज स्मार्टफोनची व्याख्या दिवसेंदिवस नवीन फोनच्या लाँचिंगमुळे बदलत आहे. यामुळे ग्राहकांनाही एक नवी संधी उपलब्ध होते आणि स्मार्टफोन मार्केटमधील अनेक समीकरणे बदलतात. तुम्हीही फोन घेण्याच्या विचारात असाल तर मिड रेंजर फोनसाठी हीच योग्य वेळ आहे. ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेत Samsung ने गेल्या आठवड्यात इंटरनेटवर धुमाकूळ घालत #MeanestMonsterEver Samsung Galaxy M51 हा फोन लाँच केला. पहिल्यांदाच 7000mAh क्षमतेची बॅटरी, अत्यंत वेगवान असं Qualcomm Snapdragon 730G processor, आघाडीचा 64MP Quad Camera सेटअप आणि 6.7”(16.95 cm) sAMOLED Plus Infinity-O Display यामुळे Galaxy M51 खऱ्या अर्थाने #MeanestMonsterEver ठरतो. तुम्ही नवा फोन घेत असाल तर ही तुमची निवड नक्कीच ठरू शकते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे किंमत. 24,999 रुपयात तुम्ही Galaxy M51 चं 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट खरेदी करू शकता. तर 26,999 रुपयात आणखी 2GB म्हणजेच 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट खरेदी करता येईल. या किंमतीसह Galaxy M51 खऱ्या अर्थाने #MeanestMonsterEver का ठरतो तेही पाहा.

#MeanestBatteryEver

Samsung Galaxy M51 मध्ये प्रचंड मोठी बॅटरी क्षमता असल्यामुळे चार्जिंग हे आता आठवड्यातून दोन वेळा करण्याचं काम उरणार आहे. या फोनच्या रुपाने जे मिळालंय, ते एका तंत्रज्ञान अविष्कारापेक्षा कमी नाही. फक्त 9.5 mm थिकनेस आणि 213g वजनात Samsung Galaxy M51 हा अत्यंत स्लिम फोन आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 25W Type C Super Fast Charger यासाठी दिलेलं आहे. दररोजचा वापर लक्षात घेत Samsung तुम्हाला कित्येक तास हा फोन वापरण्याची संधी देत आहे. फुल चार्जिंगसह 64 तासांचा टॉक टाइम किंवा 24 तास इंटरनेट वापर किंवा 34 तास व्हिडीओ प्लेबॅक किंवा 182 तासांचा म्युझिक प्लेटाइम मिळतो. या दमदार बॅटरीसह हा फोन आरामात दोन दिवस तुम्ही वापरू शकता.

या एवढ्या मोठ्या बॅटरीला तुम्ही पॉवर बँक म्हणूनही वापरू शकता आणि मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांना तुमच्या फोनची चार्जिंग शेअर करता येईल. Galaxy M51 तुम्हाला रिव्हर्स चार्जिंगचाही पर्याय देतो, ज्यासाठी Type-C to Type-C केबल देण्यात आली आहे. या फोनची चार्जिंग तुम्ही दुसऱ्या फोनलाही यामुळे देऊ शकता.

#MeanestProcessorEver

Processor

Galaxy M Series मध्ये पहिल्यांदाच अत्यंत वेगवान असं Qualcomm® Snapdragon™ 730G Processor वापरण्यात आलं आहे. हे 2.2 GHz Octa-Core Processor M-Series मधील पहिलंच Snapdragon processor आहे. या 730G processor ने अगोदरच खास गेमिंग अनुभवासह युझर्सची मनं जिंकली आहेत. यातील LPDDR4xRAM मुळे मल्टीटास्किंगलाही मदत होते. Adreno 618 GPU मुळे तुम्हाला AI Game Booster मिळतं.

#MeanestDisplayEver

Display

स्पर्धकांपेक्षा एक पाऊल पुढे जात Samsung ने Galaxy M51 मध्ये 6.7″ FHD+ Super AMOLED Plus Infinity-O Display हा 20:9 रेशोसह दिला आहे. हा सुंदर अनुभव देणारा डिस्प्ले M-Series Monster चं वैशिष्ट्य आहे. FHD+ sAMOLED पॅनल काम आणखी सोपं करतो. Galaxy M51 NTSC Color Gamut (100-110%) आणि Contrast Ratio: 78960:1 सह संपूर्ण स्पेक्ट्रम कव्हर करतो.

#MeanestCameraEver

Camera

Galaxy M Series च्या फोनची खास कॅमेरा फोन म्हणून ओळख आहे आणि हीच परंपरा #MeanestMonsterEver Samsung Galaxy M51 कायम ठेवण्यात आली आहे. Galaxy M51 च्या Quad-Cam सेटअपमध्ये 64MP (Main Sony IMX 682 sensor) + 12MP (Ultrawide sensor) मुळे 123-degree field of view + 5MP (depth sensor) आणि पोर्ट्रेटसाठी Live focus + 5MP (Macro sensor) आहे, ज्याने फोटोचा सब्जेक्ट आणखी चांगल्या पद्धतीने कैद केला जातो. पण Galaxy M51 चा 64MP Quad-camera सेटअप खास कशामुळे ठरतो? 64MP Sony IMX 682 sensor मुळे Single Take शॉट्स घेता येतात. ज्यामुळे तुम्ही विविध प्रकारचे 10 फोटो आणि व्हिडीओ एकाच क्लिकमध्ये घेऊ शकता. Single Take फीचर 32MP कॅमेऱ्यासाठीही वापरू शकता. Single Take शिवाय, 32MP सेल्फी कॅमेरा दमदार फोटो देतो.

व्हिडीओच्या बाबतीतही Galaxy M51 एक पाऊल पुढे आहे. यात Super Slo-Mo Mode, Hyperlapse Mode आणि स्वतंत्र Night Mode आहे. तुम्ही अल्ट्रावाइड व्हिडीओ, अल्ट्रावाइड Night Mode यासह विविध क्लिकसाठी Ultrawide Lens वापरू शकता. प्रोफेशनल व्हिडीओंसाठी तुम्हाला Super Steady Mode देखील मिळतो.

कमी प्रकाशातही फोटो काढण्यासाठी Night Mode यात दिलेला आहे. Ultrawide Lens सह तुम्ही पॅनोरमा काढू शकता.

Hitting the high notes!

टॉप फीचर्ससह Samsung Galaxy M51 मध्ये बरंच काही आहे. Samsung ने 18th ते 20th सप्टेंबर 2020 या काळात Amazon.in वर खास लाँचिंग ऑफर्स दिल्या आहेत. HDFC क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरुन तुम्ही 2000 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक मिळवू शकता, जो EMI आणि Non-EMI वर Galaxy M51 खरेदी करताना मिळेल.

तुम्ही Galaxy M51 खरेदी करायला हवा का? तुम्ही विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. तुमचं बजेट कमी असेल तरीही यात EMI पर्याय देण्यात आले आहेत. तुम्हाला आवश्यक असलेलं प्रत्येक फीचर या किंमतीत तुम्हाला देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे 7000 mAh क्षमतेची बॅटरी उल्लेखनीय आहे. त्यामुळे Samsung Galaxy M51 खरेदी करा – सेल 18 सप्टेंबरला सुरू होत आहे.

डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाईट टीमने प्रकाशित केली आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *