‘या’ अभिनेत्रीने असं मिळवलं अस्थमासारख्या त्रासदायक आजारावर नियंत्रण!

Spread the love

अस्थमाचा सुनिश्चित काळ नाही

अस्थमा हा एक असा आजार आहे जो काही जणांना बालपणापासूनच आपल्या विळख्यात घेतो आणि त्या लोकांना पुढे या आजारासोबत संपूर्ण जीवन व्यतीत करावं लागतं. तर काही लोक मोठेपणी या आजाराच्या विळख्यात सापडतात. पण हे पूर्णत: आपल्यावर आहे की आपण या आजाराला कसे सामोरे जातो. कारण व्यवस्थित उपचार घेऊन आणि काही नियम पाळून जगल्यास असं कोणतंच काम नाही ज्यामध्ये आपला आजार मध्ये येईल.

(वाचा :- शरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन!)

अस्थमा म्हणजे काय व याची कारणं?

अस्थमा श्वासाशी जोडलेला एक आजार आहे. जेव्हा फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात पोहचत नाही तेव्हा माणूस जोरजोरात श्वास घेऊ लागतो. यामुळे धाप लागणे आणि खोकला येणे यासारख्या समस्या येतात. यालाच अस्थमा म्हणतात. काही लोकांना ही समस्या बालपणापासून असते तर काही लोकांना मोठेपणी होते. अस्थमाच्या समस्येमागे वेगवेगळी कारणं असू शकतात.

  1. पाळीव प्राण्यांच्या केसांतून अ‍ॅलर्जी होणं
  2. कोणत्यातरी केमिकलमुळे किंवा एखाद्या तीव्र सुगंधामुळे
  3. तंबाखूच्या सेवनाने
  4. फुलांच्या पराग कणांची अ‍ॅलर्जी

(वाचा :- फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही खाल्ले जातात पापड, हे सत्य आहे का?)

प्रियांका चोप्रालाही आहे अस्थमा

काही लोकांनाच हे माहित आहे की पूर्व मिस वर्ल्ड आणि बॉलीवूड-हॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला देखील अस्थमा आहे. पण हा आजार तिच्या कोणत्याच स्वपनांच्या आड येऊ शकला नाही. प्रियांका ५ वर्षांची असतानाच तिला अस्थमा असल्याचं तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आलं. पण तिच्या आई-वडिलांना तिला या आजाराबद्दल भीती न घालता आणि कमजोर न करता तिला मजबूत बनवलं. आम्हाला हेच सांगायचं आहे की आपला आत्मविश्वास ढळू न देता धैर्याने सामोरं गेलं तर कोणताही आजार हा त्यापुढे कमीच असतो.

(वाचा :- दंडाचे स्नायू मजबूत करण्यासाठी खेळा ‘हे’ लहान मुलांचे खेळ, मिळतील टोन्ड व आकर्षक आर्म्स!)

प्रियांकाने दिल्या खास टिप्स

प्रियांकाने आजवर अनेक मुलाखतीत सांगितलं आहे की तिने आपला आजार कधी स्वत:वर हावी होऊ नाही दिलं. आजाराने आपल्याला नियंत्रित करावं हे तिला कधीच मान्य नव्हतं म्हणून तिने आपल्या आजाराला नियंत्रित केलं. तसंच आपला आजार कंट्रोल करण्यासाठी तिने याबद्दल जितकं शक्य आहे तितका रिसर्च केला. कारण आपल्याला माहित असावं की कोणत्या कठीण प्रसंगी काय पाऊल उचलावं किंवा प्राथमिक स्तरावर काय उपाय करावेत.

(वाचा :- जाणून घ्या चालण्याची योग्य पद्धत कोणती? किती वेळ चालावं? कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी?)

अस्थमावर उपचार

अस्थमा आयुष्यभर सोबत राहणारा आजार आहे. त्यामुळे हा पूर्णपणे कधीच बरा होत नाही पण संतुलित आहार आणि योग्य औषधांच्या सेवनाने हा आजार नियंत्रित केला जाऊ शकतो आणि माणूस सामान्य आयुष्य जगू शकतं. अस्थमा असणा-या व्यक्तींनी थंड पदार्थ खाणं किंवा थंड वातावरणात जास्त काळ राहणं टाळावं. दही, दूध, ताक आणि मिठाई यासारखे पदार्थ टाळावेत. थंडीमध्ये या रुग्णांनी कोमट पाणी प्यावं. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर छातीला तीळाचं तेल लावून शेकल्याने आराम मिळतो. झोपण्यापूर्वी तुळस व अडुळश्याचा काढा घ्यावा. प्राणायाम व कपालभाती यासारखे व्यायाम अस्थमाच्या रुग्णांनी करावेत.

(वाचा :- लग्नादिवशी दिसायचं आहे आकर्षक? मग एक महिना आधीपासूनच सुरु करा ‘हा’ स्पेशल डायट!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *