‘या’ कारणामुळेच आजची तरुण मंडळी अरेंज्ड मॅरेजपेक्षा प्रेमविवाहावर ठेवतात विश्वास!

Spread the love

विश्वास

लव्ह मॅरेज मागचे पाहिले कारण हे विश्वास असते. दोन व्यक्तींमध्ये जर विश्वास असले तर आयुष्यभर एकमेकांना साथ देऊ शकतात. जेव्हा अरेंज्ड मॅरेज केले जाते तेव्हा विश्वासाला जागाच नसते. कारण आपण आयुष्यात पहिल्यांदा ज्या व्यक्तीला भेटतो त्याच्या सोबत थेट आयुष्य काढण्यासाठी मनाची तयारी करावी लागते आणि असे नाते कितपत सुखी राहील याची शाश्वती नसते. पण या ऐवजी लव्ह मॅरेज मध्ये आपण आपल्या जोडीदाराला आधीपासूनच ओळखत असल्याने या व्यक्तीशी आपले पटेल की नाही हे आधीपासूनच आपल्याला माहित करून घेणे सोपे जाते आणि एक विश्वास तयार होतो की हा व्यक्ती आयुष्यभर आपली साथ देईल.

(वाचा :- ‘या’ कारणामुळे पसरली होती अभिषेक-ऐश्वर्या बच्चनच्या घटस्फोटची अफवा!)

पंसत

अरेंज्ड मॅरेज मध्ये व्यक्तीला आपल्या पसंतीची वा आवडीची व्यक्ती सहसा निवडता येत नाही. फार कमी समाज असे आहेत जेथे ज्या व्यक्तीला लग्न करायचे आहे त्याचे मत विचारात घेतले जाते. नाहीतर सहसा आपल्या तोलामोलाचे स्थळ बघून थेट लग्न लावून दिले जाते. ना मुलाला त्याची पसंत विचारली जाते, ना मुलीला! पण लव्ह मॅरेज मध्ये आपल्या आवडीच्या व्यक्ती सोबत आणि आपले ज्याच्यावर प्रेम आहे अशा व्यक्तीचीच निवड करण्याचे स्वातंत्र्य असते आणि एकंदर सुखी संसाराच्या दृष्टीने ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते.

(वाचा :- नाती तुटतात पण प्रेम अतुट राहतं, आशा नेगीचं वक्तव्य का ठरतं खास?)

पहिल्या रात्रीची भीती

ही भीती खास करून मुलींना असते. आपण ज्या व्यक्तीला आजवर कधीच भेटलो नाही, ज्याची आणि आपली 2 दिवसांचीही धड ओळख नाही तो त्या रात्री आपल्याशी कसा वागेल? आपल्याला समजून घेईल का? आपल्या मनावरचे दडपण समजून घेईल का? असे नानाविध प्रश्न मुलींच्या मनात असते. लव्ह मॅरेज मध्ये आधीच रिलेशनशिप मध्ये असल्याने आपल्या जोडीदाराचा स्वभाव मुलीला माहित असतो. साहजिकच पहिल्या रात्रीबद्दल अनेक चर्चा झालेल्या असतात. स्वप्ने रंगवलेली असतात. शिवाय लैंगिक संबंधांबाबत त्या मुलाचा दृष्टीकोन समंजसपणाचा आहे हे कळले असल्याने लव्ह मॅरेज बाबत मुली निश्चिंत असतात.

(वाचा :- राशि का कुकर षड्यंत्र सोशल मीडिया पे व्हायरल करनेवाला ‘वो’ कौन है?)

स्वप्नांना पाठींबा

मुलगा असो वा मुलगी दोघांनाही असा जोडीदार हवा असतो जो त्यांच्या स्वप्नांना समजून घेईल आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी मागे ठामपणे उभा राहील. अरेंज्ड मॅरेज मध्ये आपला जोडीदार आपल्याला समजून घेईलच याची खात्री नसते. त्यामुळे सहसा अरेंज्ड मॅरेज मध्ये थेट संसारालाच लागावे लागते. मात्र लव्ह मॅरेज मध्ये दोघांनाही आपापल्या स्वप्नांची माहिती असते आणि त्यासाठी कोणत्याही खस्ता खाण्याची आणि एकमेकांच्या मागे उभे राहण्याची तयारी असते. आजच्या तरुण पिढीने लव्ह मॅरेज मागे धावण्याचे हे एक मुख्य कारण आहे.

(वाचा :- साऊथ कोरियातील जोडप्यांची डेटिंग स्टाईल पाहून सारेच होतात थक्क!)

स्वभाव

हा एक असा घटक आहे जो अरेंज्ड मॅरेजमध्ये ना मुलाला समजून घेता येत ना मुलीला, जर मने आणि स्वभाव जुळलेच नाहीत तर ते नाते किती रटाळ असेल! हेच मत लव्ह मॅरेजला पाठींबा देणाऱ्यांकडून मांडले जाते. त्यांच्या मते ज्या व्यक्तीचा आपल्याला स्वभवाच माहित नाही तर त्यासोबत आयुष्य कसे घालवणार? त्यापेक्षा इतर कोणत्याही व्यक्तीला जाणून घेऊन व त्याचा स्वभाव पाहून मग त्यची जोडीदार म्हणून निवड करणे योग्य आहे. तर मंडळी ही आहेत काही कारणे ज्यामुळे आजच्या तरुण पिढीचा कल हा लव्ह मॅरेजकडे जास्त आहे.

(वाचा :- प्रेमविवाह करणा-या जोडप्यांनाच का असते नातं तुटण्याची जास्त भीती?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *