‘या’ गोष्टींमुळे पती-पत्नीमध्ये होतात वाद!

Spread the love

पुरुष आपल्या लग्नाची तारीख सर्रास विसरतात ज्यामुळे त्यांना बायकोच्या रागाचा सामना करावा लागतो. इतकंच काय तर काही पुरुष लग्नाचा वाढदिवस किंवा बायकोचा वाढदिवसच विसरतात ज्यामुळे नात्यात मोठा पेचप्रसंग उभा राहतो. पत्नीच्या मनात असे प्रश्न उभे राहतात ज्यामुळे वाद चिघळला जातो. पुरुष महत्त्वाचे दिवस व तारखा विसरतात हे आपण समजू शकतो पण महिलांच्या हे दिवस चांगले लक्षात असल्यामुळे ते कधी कधी संकटात सापडतात.

असाच काजोलच्या (kajol) रागाचा सामना अजयला (ajay devgan) करावा लागला होता, जेव्हा ते ‘कॉफी विथ करण’ (cofee with karan) या चॅट शो मध्ये गेले होते. रॅपिड फायर राऊंडमध्ये करणने अजयला लग्नाची तारीख विचारली ज्याचं उत्तर तो देऊ शकला नाही. ज्यामुळे काजलचे डोळे रागाने लाल-लाल झाले होते. त्यावेळी करणने परिस्थिती सांभाळली. पण असं तुमच्यासोबत झालं तर तुम्ही यातून कसे बाहेर पडाल?

मोठे दिवस विसरु नयेत

आपण हे समजू शकतो की व्यस्त जीवनशैली आणि कामाच्या व्यापात प्रत्येक खास दिवस लक्षात ठेवणं सोपी गोष्ट नक्कीच नाही. पण तुम्ही असे खास दिवस ऑफिस डायरी किंवा फोनमध्ये नोट करु शकता. फोन किंवा ऑफिसची डायरी आपण ब-याचदा तपासत राहतो. त्यामुळे तुम्ही त्यात लग्नाची तारीख लिहून ठेवली तर ती सतत तुमच्या नजरेखालून जात राहिल आणि तुम्ही आपल्या जोडीदाराचा खास दिवस अजून स्पेशल करु शकाल.

(वाचा :- पहिल्या भेटीत ‘या’ चुका करणा-या मुलांवर मुली होतात नाराज!)

लाजू नका

तुम्ही असे पहिले व्यक्ती नक्कीच नसाल जे लग्नाची तारीख विसरले आहेत. जगात अशी अनेक लोक असतात जी अशा महत्त्वाच्या गोष्टी विसरतात. समजू शकतो लग्न हा आपल्या आयुष्यातील महत्तवाचा क्षण आणि आठवण असते, पण कोणत्या कारणामुळे तुम्ही ती तारीख विसरलात तर तो काही अपराध नाही. फक्त अशी चूक झाल्यास जोडीदाराची माफी मागून सेलिब्रेशन करा. सोबतच त्यांना याची जाणीव करुन द्या की तुम्हाला या चूकीचा पश्चाताप होतो आहे.

(वाचा :- पती-पत्नीचे हे गुण एकमेकांसाठी असतात चांगली शिकवण!)

राग मानू नका

वरील घटनेवरुन तुम्ही काजोलला आदर्श मानू शकता. ती या गोष्टीवरुन खूप गोंधळ घालू शकत होती पण तीने समजून घेतलं की, अजय अनेक महत्त्वाच्या गोष्टी नेहमीच विसरतो कारण तो इतर कामांमध्ये व्यस्त असतो. त्यामुळे तुम्हीही ही गोष्ट लक्षात ठेवा की, जर तुमचा नवरा लग्नाची तारीख किंवा महत्त्वाचा दिवस विसरला तर दुस-या लोकांशी तुलना करत त्याला सुनावू नका. याउलट बोलण्या बोलण्यातून त्याला आठवण करुन द्या की आजचा दिवस आपल्यासाठी किती खास आहे.

(वाचा :- ईशा देओल म्हणते, लग्नानंतरही ‘या’ ३ गोष्टींचा करु नये मुलींनी त्याग!)

बायकोचं रागावणं आहे सहाजिक

सर्वप्रथम तुम्ही हे लक्षात घ्या की नवरा असो वा बायको, दोघांपैकी कोणीही लग्नाचा वाढदिवस किंवा खास दिवस विसरणं खूप चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे पत्नीचं नाराज होणं किंवा रागावणं सहाजिकच आहे. त्यामुळे तिला मनवण्यासाठी तुम्ही मेहनत घेणं आवश्यकच असतं. जर तुम्हाला खरंच झालेल्या चुकीची जाणीव झाली असेल तर तुम्ही तिचा दिवस स्पेशल बनवण्यासाठी प्रयत्न करु शकता व तिला खुश करु शकता.

(वाचा :- नात्यातील ‘या’ ५ गोष्टी डोकेदुखीपेक्षा कमी नाहीत!)

गिफ्टची निवड करा जपून

मुलींना सरप्राईज किंवा गिफ्ट फार आवडतात. लहान लहान गोष्टीत देखील त्या खुश होतात जर तुम्ही ते प्रेमाने दिलं असेल. पण कधी कधी चुकीचं गिफ्ट दिल्यामुळे त्या नाराज होऊ शकतात. यासाठी संवादातून त्यांच्या मनातील आवड-निवड जाणून घ्यावी किंवा तिच्या मैत्रीणींच्या मदतीने गिफ्टची निवड करावी. जेणे करुन पैसेही उगाच वाया जाणार नाहीत आणि बायको देखील खुश होईल. गिफ्ट न देता फक्त शुभेच्छा देणं कदाचित तिला नाराज करु शकतं. म्हणूनच छोटं का होईना पण एक सुंदर गिफ्ट बायकोला खास दिनी नक्की द्यावं.

(वाचा :- रुबीना दिलैक घेणार होती नव-याकडून घटस्फोट, टोकाला गेलेल्या वादातून नातं कसं वाचवावं?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *