‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश अन्यथा भोगावे लागतील दुष्परिणाम!

Spread the love

सुकामेवा

उन्हाळा आणि पावसाळ्यात सुकामेवा खाण्याचा सल्ला अनेकांना विचित्र वाटेल. कारण सुकामेवा खास करून हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर खाण्याचा सल्ला दिला जातो. पण मंडळी यंदाचा उन्हाळा वेगळा होता आणि पावसाळा सुद्धा वेगळा आहे आणि त्याला कारण आहे करोना विषाणूचे संक्रमण! म्हणूनच तज्ञ सुद्धा या काळात दरोरोज दुध आणि सुकामेवा सेवन करण्याचा सल्ला देत आहेत. दिवसाला जर तुम्ही 35 ग्राम सुकामेवा आणि सोबत दुध प्यायलात तर तुमचे हृदय खूप निरोगी राहील.

(वाचा :- अवयव दान कसं करतात आणि कोणत्या अवस्थेतील अवयव दुस-याच्या कामी येऊ शकतात?)

सोया प्रोटीन

अनेक वेगवेगळ्या संशोधनातून एक गोष्ट पुढे आली आहे की जर एखादा व्यक्ती दिवसाला 15 ग्राम सोया प्रोटीनचे सेवन करत असेल तर त्यामुळे त्याच्या शरीरात तयार होणारा कोलेस्ट्रॉल चा स्तर 6 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. म्हणूनच सध्या जगभरातील लोक स्वत: फिट राहण्यासाठी आणि हृदय सुद्धा निरोगी राखण्यासाठी सोया प्रोटीनचा आहारात जास्तीत जास्त वापर करत आहे. तुम्ही सुद्धा आवर्जून सोया प्रोटीनचे सेवन करा आणि निरोगी राहा.

(वाचा :- जाणून घ्या नाश्त्यापासून डिनरपर्यंतच्या योग्य वेळा, अवेळी जेवत असाल तर लठ्ठ होणारच!)

ओट्स आणि बार्ले

ओट्स आणि बार्ले हे आधुनिक युगातील सर्वोच्च पौष्टिक खाद्यपदार्थांपैकी आहे आहेत. ज्यांच्या सेवनाने शरीराच्या आत एक जेल फॉर्मचे लिक्विड तयार होते. हे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करते आणि आपले पोट जास्त काळ भरलेले राहते. जाणकारांच्या सल्ल्यानुसार दिवसातून किमान 3 ग्राम बीटा ग्लुकन खाल्ले पाहिजे. बीटा ग्लूकन एक सॉल्यूबल फाइबर आहे. हे फायबर ओट्स आणि बार्ले दोन्हीत आढळते आणि म्हणून कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी ओट्स आणि बार्ले खाण्याचा सल्ला दिला जातो.

(वाचा :- संजय दत्त ग्रस्त असलेल्या फुफ्फुसाच्या कर्करोगाची 3 री स्टेज आयुष्यासाठी किती धोकादायक?)

अ‍ॅव्होकॅडो

अ‍ॅव्होकॅडो शरीरासाठी अतिशय उपयुक्त फळ आहे. हे फळ शुगर असणाऱ्या रूग्णांसाठी तर अमृता समान आहे. शिवाय लिव्हरच्या समस्यांपासून सुद्धा आपला बचाव करते. पण सगळ्यात जास्त हे प्रभावी ठरते हृद्याला निरोगी राखण्यासाठी! अ‍ॅव्होकॅडोमध्ये मोनोसेच्युरेटेड फॅटी अॅसीड आणि इतर आवश्यक पोषक तत्वे आढळतात. अ‍ॅव्होकॅडो आपल्या शरीराला पोषण देण्यासोबतच कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यास सुद्धा हातभार लावतो. तुम्ही हे फळ सलाडच्या रुपात सुद्धा खाऊ शकता.

(वाचा :- मध आणि लिंबूचे एकत्रित सेवन केल्यास…)

कडधान्य

कडधान्य सुद्धा हृदयाला स्वस्त राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. राजमा, उडद डाळ, चणे, हिरवे वाटणे आणि अशी कित्येक कडधान्ये फायबरचा अतिशय संपन्न स्त्रोत असतात. पचन यंत्रणेला यांचे पचन करण्यासाठी खूप वेळ सुद्धा लागतो. त्यामुळेच यांच्या सेवनाने पोट जास्त काळ भरलेले राहते आणि सारखी भूक लागत नाही. ही कडधान्ये कोलेस्ट्रॉलचा स्तर सुद्धा नियंत्रित ठेवतात. म्हणून तज्ञ सल्ला देतात की आहारात एक तरी कडधान्य असलेच पाहिजे. तर मंडळी जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी राखायचे असेल आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर संतुलित ठेवून कोणत्याही गंभीर आजाराला बळी पडायचे नसेल तर आवर्जून या प्रकारच्या पदार्थांचा आहारात समावेश करा आणि सुदृढ राहा.

(वाचा :- दिवसभर एका जागेवर बसून काम करणारेही आता वजन करु शकतात कमी, फक्त करा या गोष्टी!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *