‘या’ वयाआधी लहान मुलांना आहारात चुकूनही देऊ नयेत ब्रेड!

Spread the love

बाळाला काय खाऊ घालावे हा प्रश्न नेहमीच पालकांना सतावत असतो कारण आहार हा बाळाच्या पोषणासाठी आणि शारीरिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. जर बाळाचा आहार योग्य नसेल तर साहजिकच त्याचा परिणाम त्याच्या शारीरिक विकासावर होऊ शकतो. बाळाच्या आहारामध्ये चव सुद्धा एक महत्त्वाची बाब असते. बाळाला खाऊ घातले जाणारे बहुतांश पदार्थ हे चांगल्या चवीचे नसतात. जरी त्यात मोठ्या प्रमाणावर पोषकतत्वे असली तरी त्याची चव चांगली नसल्याने बाळ ते पदार्थ खायला बघत नाही.

असाच एक पदार्थ म्हणजे ब्रेड (bread recipes) होय. बाळाला ब्रेड खाऊ घालावे की नाही हा प्रश्न पालकांना नेहमी सतावत असतो. ब्रेड खाऊ घातल्याने बाळाला खरंच फायदे होतील का? फायदे झाले तर काय होतील? आणि नुकसान होणार असेल तर काय असेल? या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरेच आज आम्ही तुम्हाला सर्व माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

मुलांना ब्रेड खाऊ घालू शकतो का?

ब्रेड मध्ये ग्लुटेन असते जे अ‍ॅलर्जी निर्माण करू शकते. तुम्ही 6 महिन्यांच्या नंतर बाळाला ब्रेड खायला देऊ शकता. मात्र शक्य तितक्या कमी प्रमाणातच बाळाला ब्रेड भरवावा. याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 6 महिन्यांनंतर बाळाला कोणताही नवीन पदार्थ खाऊ घातल्यावर 2-3 दिवस वाट पहावी. त्या पदार्थांमुळे बाळाला काही त्रास होत नाही ना ते पाहावे. त्रास होत नसेल तर तुम्ही तो पदार्थ बाळाला भारावू शकता. जर त्रास झाला तर मात्र तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. ही गोष्ट ब्रेडला सुद्धा लागू होऊ शकते. जाणकारांच्या मते 100 टक्के होलव्‍हीट ब्रेड मध्ये पुरेश्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, डायट्री फायबर आणि आयरन, झिंक व थाइमिन सारखे खनिज पदार्थ असतात.

(वाचा :- बाळाला कोणत्या वयापासून पाजावं बाटलीने दूध? जेणे करुन पोषक तत्वांशी करावी लागणार नाही तडजोड!)

बाळाला ब्रेड भरवायला सुरुवात कधी करावी?

तुम्ही सुद्धा हे जाणताच की नवजात बालकाला लगेच ठोस आहार दिला जात नाही. सुरुवातीचे 6 महिने बाळ हे आईच्याच दुधावर पोषण घेत असते. या काळात त्याची पचनसंस्था मजबूत नसल्याने त्याला इतर कोणताही पदार्थ खाऊ घालू नये. 6 महिन्यांनी बाळाची पचनसंस्था मजबूत होते आणि तेव्हा तुम्ही बाळाला ठोस आहार भरवायला सुरुवात करू शकता. त्यामुळे ब्रेड देखील तुम्ही 6 महिन्यांच्या नंतरच बाळाला भरवू शकता.

(वाचा :-मुलांना सतत उचकी लागते? मग जाणून घ्या त्यामागील कारणं व घरगुती उपाय!)

बाळाला कोणते ब्रेड भरवावेत?

मार्केट मध्ये अनेक प्रकारचे ब्रेड्स मिळतात परंतु तुम्ही बाळाला व्हाईट ब्रेडच खाऊ घालायला हवा. ब्राऊन ब्रेड मध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात मात्र ब्राऊन ब्रेड मध्ये फायबरची मात्रा जास्त प्रमाणात असते आणि एवढी मात्रा बाळासाठी धोक्याची ठरू शकते. यामुळे बाळाचे पोट लवकर भरेल, त्याला भूक लागणार नाही आणि त्याचा परिणाम बाळाच्या शारीरिक विकासावर होईल. जास्त फायबर हे शरीरातील झिंक आणि लोहाच्या अवशोषणावर प्रभाव टाकू शकते. त्यामुळे बाळाला ब्राऊन ब्रेड पेक्षा व्हाईट ब्रेडच द्यावा.

(वाचा :- लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवण भरवल्याने ‘या’ गंभीर आजारांपासून मिळते सुरक्षा!)

किती प्रमाणात ब्रेड खाऊ घालावा?

व्हाईट ब्रेड मध्ये बाळाच्या शरीरासाठी अधिक पोषक तत्वे नसतात म्हणून व्हाईट ब्रेड सुद्धा कमी प्रमाणातच बाळाला खाऊ घालावा. ब्रेड मध्ये सोडियम आणि मीठ सुद्धा जास्त असते जे बाळासाठी धोकादायक ठरू शकते. म्हणून आपल्या बाळाला जास्त ब्रेड खाऊ घालू नये. तुम्ही बाळाला आठवड्यातून जास्तीत जास्त 3-4 वेळच ब्रेड द्यावा. अधिक ब्रेड खाऊ घातल्याने बाळाला त्रास होऊ लागल्याची सुद्धा उदाहरणे आहेत. त्यामुळे सुरक्षितता म्हणून शक्य तितका कमी ब्रेडच बाळाला द्यावा.

(वाचा :- लहान मुलांना अशा पद्धतीने खाऊ घाला खजूर, मिळतील दुप्पट लाभ!)

ब्रेडच्या जागी काय द्यावे?

आता तुम्हाला वाटत असले की आपण बाळाला ब्रेड भरवू शकता. पण मंडळी वर सांगितल्याप्रमाणे ब्रेड हा पोषणाचा अधिक समृद्ध स्त्रोत नाही. त्याऐवजी असे अनेक पदार्थ आहेत जे तुम्ही बाळाला खाऊ घालू शकता. होल-व्हीट पॅनकेक, ओट्स पॅनकेक, चपाती यांसारखे पदार्थ बाळासाठी ब्रेडपेक्षा अधिक उपयुक्त ठरू शकतात. हे ते पदार्थ आहे जे तुम्ही बाळाला थोड्या जास्त प्रमाणात खाऊ घातले तरी त्यामुळे धोका निर्माण होणार नाही.

(वाचा :- असं करा ओव्याच्या पुरचुंडीने ० ते ५ वर्षांच्या मुलांचं सर्दी-पडसं दूर!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *