या २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका!

Spread the love

हृदय म्हणजे आपल्या शरीराचं एक इंजिन असतं. जशी गाडी इंजिनवर चालते तसं आपलं शरीर सुद्धा हृदय नावाच्या इंजिनावर चालतं आणि म्हणूनच या हृदयाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. जितके कमजोर हृदय तितका जीवाला जास्त धोका आणि जितके निरोगी हृदय तितका जीव सुरक्षित! पण सध्या झालंय असं की या धकाधकीच्या आयुष्यात माणसाला आपल्या आरोग्याकडे आणि खास करून आहाराकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये. या धावपळीच्या आयुष्यात ताण तणाव सुद्धा इतका आहे की विचारायची सोय नाही.

या सर्वांचा थेट परिणाम सर्वाधिक करून आपल्या हृदयावर होतो. पूर्वी अगदी जेष्ठ असणाऱ्या लोकांना हृदयाचे रोग जडायचे पण आता लहान वयात सुद्धा तरुणांना हृदयाच्या त्रासाला सामोरे जावे लागते. अगदी तिशी सुद्धा न गाठलेले कित्येक तरुण हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्युमुखी पावल्याची उदाहरणे आहेत. जर तुम्हाला हे सर्व सहन करायचे नसेल तर तुम्ही आतापासूनच आपल्या हृदयाची काळजी घेण्यास सुरुवात केली पाहिजे. आपण आपण जाणून घेऊया कि कोणत्या 2 प्रकारामुळे हृदय कमजोर होते आणि त्यावर काय उपाय आहेत!

मानसिक आणि शारीरिक परिणाम

तर हेच ते 2 प्रकार आहेत ज्यामुळे आपले हृदय कमजोर होते. ताण तणाव, चिंता, नैराश्य, सतत विचार करत राहणे या गोष्टी जरी कल्पनात्मक असल्या तरी त्या खऱ्या आहेत आणि त्या आपल्या शरीराच्या अवयवांवर खूप मोठे दुष्परिणाम करतात. त्यापैकी सर्वाधिक जास्त परिणाम हा हृदयावर होत असल्याचे दिसून आले आहे. जर मानसिक परिणाम हृदयावर होऊ द्यायचे नसतील तर सर्वात सोप्पा उपाय आहे आनंदी राहणे आणि मनाला शांत ठेवणे. जर तुम्ही चिंता, नैराश्य, ताण, तणाव यांना जवळ येऊ दिलेच नाही तर तुमच्या हृदयावर त्याचा परिणाम होणार नाही. यासाठी खूप व्यायाम करा. योग करा आणि निरोगी राहा. दुसरा प्रकार म्हणजे शारीरिक होय, जो की चुकीची जीवनशैली आणि आहार यांमुळे हृदयावर परिणाम करतो. यासाठी शक्य तितका चांगला आहार घेणे आणि उत्तम जीवन जगणे क्रमप्राप्त आहे.

(वाचा :- सांधेदुखीने त्रस्त आहात? मग आजच ट्राय करा ‘हा’ घरगुती उपाय!)

हे 5 पदार्थ खा

-5-

जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी राखायचे असेल तर असे काही पदार्थ आहे जे तुम्ही खाणे गरजेचे आहे. जाणकारांनी सुद्धा हे पदार्थ हृदयासाठी अतिशय चांगले असल्याचे कबूल केले आहे. जे व्यक्ती ह्या 5 पदार्थांचे सेवन करतात त्यांना क्वचितच हृदयाचा त्रास होतो, परंतु त्यासाठी नियमित रूपाने हे पदार्थ खाणे गरजेचे आहे. चला आपण हे 5 पदार्थ नेमके कोणते आहेत आणि ते आपल्या शरीराला कशा प्रकारे मदत करतात ते जाणून घेऊया.

(वाचा :- Fiber Rich Fruits : ‘या’ फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!)

दही

उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वाधिक सेवन केले जाणारे दही तुम्ही नियमितपणे खाल्ले तरी त्याचे तुम्हाला मोठे लाभ दिसून येतील. दही शरीराच्या आतील नसांना पोषण देण्याचे काम करते. शिवाय आपली त्वचा सुद्धा निरोगी आणि मुलायम राखते. दह्यात असणारे बॅक्टेरिया आतड्यांमधील गुड बॅक्टेरियांना पोषण देतात आणि शरीरात त्यांची संख्या वाढवतात. यामुळे तुम्ही जे काही पदार्थ खाता ते योग्य प्रकारे पचतात. शिवाय शरीराला पोषण सुद्धा पुरेश्या प्रमाणात मिळते. याचा एकंदर परिणाम म्हणून रक्त प्रवाह सुरळीत होतो व हृदयावरचा ताण कमी होतो.

(वाचा :- पोटाचा घेर कमी करण्यासाठी साध्यासोप्या टिप्स!)

ड्राय फ्रुट्स आणि डेअरी प्रॉडक्ट्स

कार्डियोवस्कुलर हेल्थसाठी नट्स अर्थात ड्राय फ्रुट्स अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि म्हणूनच जाणकार सुद्धा उत्तम आरोग्यासाठी नियमितपणे ड्राय फ्रुट्स खाण्याचा सल्ला देतात. काजू, मणुके, बदाम, अक्रोड, खजूर यांसारखे ड्राय फ्रुट्स हृदयाला पोषण देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे दुधापासून तयार केले जाणारे प्रॉडक्ट्स होय. दुध, तूप, पनीर, ताक यांसारखे डेअरी प्रॉडक्ट्स हृदयाच्या कार्य प्रणालीला सुरळीत राखतात. सामान्यत: तुमचे सेवन हे हृदयासाठी चांगले मानले जाते. पण त्यांचे सुद्धा एक मर्यादित प्रमाण आहे. अतिप्रमाणात तुपाचे सेवन करू नये खास करून देशी तुपाचे सेवन कमी करावे.

(वाचा :- बॉलीवूडमध्ये का आहे ड्रग्सचं इतकं वेड? ड्रग्स शरीरावर नेमका काय परिणाम करतात?)

डाळींब आणि अननस

हृद्य निरोगी राखण्यासाठी फळांचे सेवन करणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे आणि खास करून डाळींब आणि अननस यांचे सेवन तुम्ही आवर्जून करायला हवे. ही फळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात आणि हृदयाच्या उत्तम आरोग्याला हातभार लावतात. तर मंडळी म्हणून हे 5 पदार्थ तुम्ही आवर्जून व नियमित खा आणि तुमच्या हृदयाला निरोगी राखा. कारण हृदय निरोगी असले तर तुम्ही सुद्धा उत्तम आणि आरोग्यवर्धक आयुष्य जगाल.

(वाचा :- ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय? मग घ्या ‘ही’ काळजी!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *