‘या’ ५ गोष्टी सांगतात की तुमचा जोडीदार का करत नाही तुम्हाला स्वत:हून पहिला मेसेज!

Spread the love

तो कधीच मला पहिला मेसेज करत नाही किंवा स्वत:हून पहिला संवाद सुरु करत नाही पण मी जेव्हा बोलायला सुरुवात करते तेव्हा मात्र अगदी वेळेवर त्याचे रिप्लाय येऊ लागतात असं का? तुमच्याही मनात अशा प्रश्नांनी गोंधळ निर्माण केला असेल तर जास्त चिंता करण्याची गरज नाही. असं यासाठी कारण आजच्या अनेक महिला या परिस्थितीचा सामना करत आहेत. एका नात्यात असताना संवाद ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. पण कधी कधी कम्युनिकेशन गॅपमुळे काही नाती अगदी योग्य रुळावर चालत असताना अचानक तुटण्याच्या मार्गावर जातात.

याचं मुख्य कारण म्हणजे बहुतांश मुलींना वाटतं की, आपला जोडीदार कोणा दुस-या कोणत्यातरी महिलेशी चॅटिंग करतो आहे. आजचा काळ मेसेजवर नातं जिवंत ठेवण्याचा असला तरी काही लोकांना अशा पद्धतीने नातं पुढे घेऊन जायला आवडत नाही. अशा लोकांना मेसेजपेक्षा कॉलवर बोलणं जास्त सोयीस्कर वाटतं, त्यामुळे ही लोक मेसेज करण्याचं कष्टच घेत नाहीत. असं करण्यामागे त्यांचा एगो व लाजवीट स्वभावही कारणीभूत असू शकतो. तरीही महिलांपेक्षा पुरुषांचं मन समजणं सोपं आहे. हेच नाही तर अशी अनेक कारणं आहेत जी सिद्ध करतात की, तुम्हाला ते इग्नोर करत नसून त्यामागे काही वेगळीच कारणं आहेत.

लाजवीटपणा

जर तुमचा होणारा जोडीदार किंवा बॉयफ्रेंड तुम्हाला लगेच किंवा वेळेवर मेसेजचं उत्तर देत नसेल तर याचा अर्थ असा मुळीच नाही की, तो दुस-या कोणत्यातरी मुलीकडे आकर्षित झाला आहे व तिच्याशी चॅटिंग करतो आहे. तर त्याचं असं करण्याचं कारण लाजवीटपणा देखील असू शकतो. हो, हे तुम्हाला ऐकायला थोडं विचित्र वाटत असेल पण बहुतांश मुलांची किंवा पुरुषांची सत्यता हीच आहे की, ते आपल्या मित्रमंडळींसोबतही मनमोकळेपणे संवाद साधत नाहीत. ज्यामुळे त्यांना नेहमीच प्रत्येक नात्यात समस्यांचा सामना करावा लागतो.

(वाचा :- माधुरीसोबत नाव जोडलं गेल्यानंतर अनिल कपूरने केलं ‘हे’ ह्रदयस्पर्शी वक्तव्य!)

भावनांचा खेळ होण्याची भीती

असं होऊ शकतं की, तुमच्या होणा-या जोडीदाराला आधीच एका ब्रेकअपला किंवा प्रेमभंगाला सामोरं जावं लागलं असेल ज्यामुळे नवं नातं सुरु करण्यासाठी तो वेळ घेत असेल. अशावेळी जोडीदारावर संशय घेण्यापेक्षा किंवा जासूसी करण्यापेक्षा त्याला समजून घेणं गरजेचं असतं. शिवाय यामागील कारण समजून घ्या की, तुम्ही आवडत असताना, नातं हवं असतानाही तो पुढचा प्रवास सुरु करण्यासाठी इतका वेळ का घेत आहे? जर त्याच्या मनात प्रेमभंगाची भीती असेल तर ती काढून टाकणं तुमची जबाबदारी आहे.

(वाचा :- बिपाशा बासूला सोडून ‘या’ कारणामुळे जॉन अब्राहमने केलं एका साधारण मुलीशी लग्न!)

व्यस्त जीवनशैली

यात काहीच शंका नाही की पुरुष महिलांसारखे मल्टिटास्किंगमध्ये पारंगत नसतात. ते नेहमीच घर व काम यातील ताळमेळ साधण्यात कच्चे असतात. ज्यामुळे त्यांची पर्सनल लाइफ खराब होते. पण महिलांचं उलट असतं. त्या घरासोबतच ऑफिसमध्येही फ्रंट लाइनवर असतात आणि त्याचा परिणाम कुठेच त्या पर्सनल लाइफवर होऊ देत नाहीत. त्या आपली जबाबदारी चोख पार पाडतात. त्यामुळे जर तुमचा जोडीदार कॉल किंवा मेसेजवर तुम्हाला वेळ देत नसेल तर आधी त्याची लाइफस्टाइल समजून घेण्याचा प्रयत्न करा की, तो नक्की इतका व्यस्त का आहे?

(वाचा :- एकटं राहूनही आनंदी व सुखी आयुष्य जगता येतं! जाणून घ्या कसं?)

मनमोकळेपणे संवाद

ही खूप लोकांची समस्या असते की ते जितका संवाद फोनवर साधू शकतात त्याच्या अर्ध देखील ते मेसेजवर बोलू शकत नाहीत. अशी लोक फोनवर तासनतास कोणताही कंटाळा न करता बोलू शकतात पण मेसेजवर बोलण्याची वेळ आली की नाकं मुरडतात. जर तुमचा जोडीदारही असंच करत असेल तर त्याच्याशी मनमोकळेपणे संवाद साधा. त्याचं तुमच्यावर खरं प्रेम असेल तर फोन काय किंवा मेसेज काय.. तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याशी संवाद साधणारच!

(वाचा :- ‘या’ ५ सवयी जाणून घेतल्यानंतर डोळे बंद करुन द्या लग्नाला होकार!)

मेसेजमुळे गैरसमज

अनेक पुरुष प्रॅक्टिकल असतात त्यामुळे भावनेत अडकणं त्यांना जमत नाही. कधी कधी होतं असं की ते थेट काहीतरी मेसेज करतात ज्याचा अर्थ नीट न समजल्याने समोरचा माणूस दुखावतो, रागावतो, चिडतो. त्या व्यक्तीला नक्की काय झालं हे देखील या पठ्ठ्यांना समजत नाही, कारण त्यांच्या मते त्यांनी योग्य मेसेज केलेला असतो. अशावेळी एका अनुभवानंतर ते मेसेजवर बोलणं टाळतात कारण मेसेजवर गैरसमज होतात असं त्यांचं मत असतं. काही अंशी हे योग्य देखील आहे. कारण मेसेजवर माणसाच्या भावना समजत नाही त्यामुळे तो संवाद ह्रदयाला भिडत नाही. म्हणून कोणताही अंदाज बांधून नातं तोडण्याआधी वरील गोष्टींची शहानिशा नक्की करुन घ्या.

(वाचा :- रितेश-जेनेलियाचा लव्ह फॉर्म्युला वापरल्यास पत्नीशी होणार नाहीत कधीच वाद!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *