या सर्व कारणांमुळे त्यांचं नातं एकाद्या टॉक्सिक रिलेशनशीप सारखं बनतं. एखादं नातं प्रेमाव्यतिरिक्त पुढे नेणं कदापि शक्य नाही. तुम्हाला आपल्या नात्याबद्दल अधिक सतर्क राहिलं पाहिजे आणि जोडीदाराच्या छोट्या मोठ्या वागणुकीकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं. यातून तुम्हाला हे समजेल की, जोडीदाराच्या मनात तुमच्याविषयी प्रेम आहे की ते आटलंय की ती व्यक्ती फक्त तुम्हाला एक चांगला मित्र किंवा मैत्रीण मानते.
भरकटलेलं मन
जर तुम्हाला वारंवार असं दिसून येतंय की, तुमच्या जोडीदाराचं तुमच्या बोलण्याकडे लक्ष नाही किंवा तुमच्यावरुन त्याचं लक्ष भटकू लागलं आहे तर हा चांगला संकेत नक्कीच नाही. जर तुमच्या बोलण्यावर किंवा तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या समस्येवर, क्षणावर जोडीदाराने रिअॅक्ट करणंच सोडून दिलं तर हाच तो क्षण आहे जेव्हा तुम्ही खरंच आपल्या नात्याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा. अशावेळी तुम्ही ज्या नात्यात आहात त्याचं काही भविष्य आहे का? याचा विचार करणं अत्यंत गरजेचं असतं.
(वाचा :- Tips For Single people – लग्नापासून दूर पळण्यापेक्षा ‘या’ ५ गोष्टींवर करा लक्ष केंद्रित!)
नात्यातील बदल

कोणत्याही नात्यात वाद होणं किंवा रुसवे-फुगवे होणं साधारण गोष्ट आहे. पण आपल्या रुसव्या-फुगव्यांना जोडीदार दुय्यम स्थान देत असेल व आपल्याला गृहित धरत असेल तर मात्र दुस-या बाजूने विचार करण्याची वेळ आली आहे हे समजून जा. हो मंडळी, नात्यात भांडणं, रुसणं-फुगणं आणि मग एकमेकांची समजून काढून पुन्हा आनंदाने नात्याची नवी सुरुवात करणं किंवा नव्याने त्याच व्यक्तीच्या प्रेमात पडणं ही एका आनंदी नात्याची व्याख्या आहे.
(वाचा :- अफेयर करणा-या नव-याला ‘या’ अभिनेत्रींनी दिली दुसरी संधी, हे कितपत सुरक्षित आहे?)
चूका मान्य न करणे

या जगात कोणतीच व्यक्ती परफेक्ट नाही. पण जेव्हा तुमच्या जोडीदाराला वाटू लागेल की प्रत्येक वेळी तोच बरोबर असतो तेव्हा असं समजा की ती वेळ आली आहे जेव्हा तुम्हाला नात्याच्या प्रत्येक पैलूविषयी खुलेपणाने व गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. कारण आपल्या जोडीदारासोबत कोणत्याही छोट्याश्या गोष्टीवरुन सतत वाद घालणं योग्य नाही. अशावेळी जर तुम्हाला वाटलं की, जोडीदाराला तुमची अजिबात कदर नाही किंवा स्वत:ची चूक मान्य करावी लागेल म्हणून ते तुमच्याशी बोलणंही टाळतात तर अशावेळी एखाद्या टॉक्सिक रिलेशनशीपमध्ये अडकून पडण्यापेक्षा त्यातून बाहेर पडणं कधीही चांगलं.
(वाचा :- लॉंग डिस्टन्स रिलेशनशीपची वाटते भीती? मग ट्राय करा राधिका आपटे व बेनेडिक्टच्या टिप्स!)
भेटीगाठी टाळणं

जेव्हा आपला जोडीदार मित्रमंडळींमध्ये व कामामध्ये सतत व्यस्त राहू लागतो तेव्हा नात्यात समस्या निर्माण होण्याची ती नांदी असते. जर जोडीदाराला तुम्हाला भेटायला वेळच नसेल तर समजून जा त्याची प्राथमिकता बदलली आहे. पण हो, एखादी व्यक्ती खरंच महत्त्वाच्या कामात व्यस्त असेल तर उगाच वाद घालणं मुर्खाचं लक्षण ठरु शकतं, अशावेळी त्याची परिस्थिती समजून त्याला साथ दिल्यास नातं अधिक घट्ट होऊ शकतं. पण वारंवार अशी वेगवेगळी कारणं देत भेट किंवा बोलणं समोरची व्यक्ती टाळू लागली तर तुम्ही तुमच्या भविष्यासाठी निर्णय घेणं गरजेचं आहे.
(वाचा :- लॉंग डिस्टन्स रिलेशनशीपची वाटते भीती? मग ट्राय करा राधिका आपटे व बेनेडिक्टच्या टिप्स!)
साथ न देणं व कौतुक न करणं

जर तुमच्या लक्षात येऊ लागलं की तुमचा जोडीदार पहिल्यासारखा करियर, जॉब किंवा आवडत्या गोष्टीत साथ देत नाही किंवा एखादी चांगली गोष्ट केल्यानंतरही कौतुक करत नाही, प्रोत्साहन देत नाही तर हा एक वाईट संकेतच असू शकतो. अशावेळी दोघांना संवाद साधणं गरजेचं आहे की, अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या नात्यात अडथळा बनते आहे. खरोखर जोडीदाराच्या मनात आपल्याविषयी प्रेम शिल्लक आहे का? हे पडताळून पाहणं गरजेचं असतं.
(वाचा :- लग्नानंतर १० दिवसांतच श्वेताच्या ‘या’ सवयीने आदित्य झाला हैराण, हे आहे वादाचे सर्वात मोठे कारण!)
Source link
Recent Comments