या ५ लसी नवजात बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी असतात अत्यंत आवश्यक!

Spread the love

हेपेटायटिस ‘बी’

बाळाचा जन्म झाल्यावर त्याला घरी घेऊन जाण्याआधी आवर्जून हेपेटायटिस ‘बी’ चा डोस द्यावा. हेपेटायटिस ‘बी’ हा आजार बाळाच्या लिव्हरला हळूहळू नुकसान पोहचवू शकतो. हा विषाणू रक्तामध्ये आणि शरीरातील इतर द्रव्य घटकांमध्ये आढळून येतो आणि खूप महिने जिवंत असतो. या विषाणूपासून कर्करोग होऊ शकतो वा लिव्हरशी निगडीत एखादा गंभीर आजार बाळाला विळखा घालू शकतो. म्हणूनच यापासून बाळाचा बचाव करण्यासाठी डॉक्टर सुद्धा आवर्जून बाळाला हेपेटायटिस ‘बी’ची लस देण्याचा सल्ला देतात.

(वाचा :- सोहा अली खान आपल्या लाडक्या लेकीसोबत अशी लुटते आहे गणेशोत्सवाचा आनंद!)

रोटावायरस लस

रोटावायरस हा अतिशय संक्रमित होणारा विषाणू आहे ज्यामुळे नवजात बाळाला अति गंभीर स्वरूपातील अतिसाराचा आजार होऊ शकतो. शिवाय भयंकर ताप आणि सततची उलटी बाळाचे आरोग्य धोक्यात आणू शकतात. जर वेळीच या आजारावर उपचार केले नाहीत तर गंभीर डिहाइड्रेशन सुद्धा होऊ शकते. काही प्रकरणात तर बालकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. रोटावायरस इंफेक्‍शन पासून बाळाचा बचाव व्हावा म्हणून त्याला तोंडामध्ये रोटावायर लसीचे दोन वा तीन डोस दिले जातात. पहिला डोस बाळाला पंधरा आठवडे पूर्ण होण्याआधी देणे गरजेचे असते. शेवटचा डोस बाळ आठ महिन्याचे होईपर्यंत द्यावा.

(वाचा :- पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर घाबरलेल्या मुलीला याविषयी अशी द्या योग्य माहिती!)

पोलिओची लस

याबद्दल तुम्हाला वेगळे काही सांगायला नको. या लसीबद्दल प्रशासन सुद्धा जागरूक असून वेळोवेळी नागरिकांना सूचना करत असते. कारण हा आजाराच तितका भयानक आहे आणि म्हणून बाळाला पोलिओची लस देणे बंधनकारक असते. जर वेळीच बाळाला लस दिली नाही तर आयुष्यभरासाठी बाळ अपंग होऊ शकते. याला पीसीवी 13 लस असेही नाव असून न्युमोनिया, रक्तातील संक्रमण आणि बॅक्‍टीरियल मेनिंजाइटिस पासून सुद्धा ही लस बाळाचा बचाव करते.

(वाचा :- मुलांच्या बारीकपणामुळे आहात चिंताग्रस्त? मग त्यांच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश!)

हेपेटाइटिस ‘ए’

हेपेटाइटिस ‘ए’ हा एक गंभीर स्वरूपाचा लिव्हरशी निगडीत आजार आहे ज्यामध्ये सुद्धा हेपेटाइटिस विषाणूच कारणीभूत असतो. या विषाणूची लक्षणे काही आठवडे ते काही महिने सतत दिसू शकतात. थकवा येणे, पोटदुखी, मळमळ आणि कावीळ यांसारखी लक्षणे या विषाणूमुळे दिसून येतात. सहा ते अठरा महिन्यांच्या बाळाला दोन डोस मध्ये ही लस देणे आवश्यक असते. त्यामुळे हि लस अजिबात चुकवू नये आणि वेळीच बाळाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन या आजारापासून त्याला सुरक्षा मिळवून द्यावी.

(वाचा :- बाळाने कोणत्या महिन्यात गुडघ्यावर रांगणं गरजेचं असतं?)

वॅरिसेला लस

बाळाला चिकनपॉक्‍सची लागण होऊ नये म्हणून ही लस देणे बंधनकारक असते. 12 ते 18 महिन्यांपर्यंतच्या सर्व निरोगी बालकांना चिकनपॉक्‍स लसीचे दोन डोस दिले गेलेच पाहिजेत. पाहिला डोस 12 ते 15 महिन्यांच्या कालावधीमध्ये आणि दुसरा 4 ते 6 वर्षे वयादरम्यान द्यावा. याशिवाय बाळाला एमएमआर लस देणे गरजेचे असते. याचा पहिला डोस 9 व्या महिन्यात आणि दुसरा डोस 12ते 15 वर्षांच्या दरम्यान दिला जातो. या लसीमुळे बाळाला गोवरची लागण होत नाही. तर मंडळी या जरी प्रमुख लसी असल्या तरी इतर सर्व लसी सुद्धा तुम्ही वेळीच बाळाला द्यायल्या हव्यात. जेणेकरून बाळ सर्व आजारांपासून सुरक्षित राहील आणि एक निरोगी आयुष्य जगेल.

(वाचा :- मुलांच्या चेह-यावर सफेद चट्टे दिसू लागल्यास अजिबात करु नका दुर्लक्ष!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *