रक्तशुद्धीकरणाचं काम चोख बजावणारा हा ड्राय फ्रुट प्रत्येक वयातील व्यक्तीसाठी आहे लाभदायक!

Spread the love

सुक्यामेवाचा (Dry fruits) विषय निघाला की साहजिकच मनुक्याची आठवण यते. सुका मेव्यात गोडवा वाढवणारा हा पदार्थ कोणाला आवडत नसेल तर नवलच! द्राक्ष सुकवून तयार होणारे मनुके (Raisins) हे खवय्यांच्या अगदी लाडके असतात. कारण यामुळे प्रत्येक गोड पदार्थाला एक वेगळीच चव मिळते आणि मनुके असेही खायला छानच लागतात. पण मनुके केवळ खाण्यासाठीच चांगले आहेत का? की त्यांचे इतर काही फायदे देखील आहेत?

तर नाही मंडळी मनुके खाण्याचे आपल्या आरोग्यास खूप फायदे आहेत आणि मनुक्यात अशी अनेक महत्त्वाची तत्वे आहेत जी आपल्याला पोषण देतात. ज्यांच्या शरीरात रक्ताची कमी आहे त्यांच्यासाठी तर मनुके अतिशय गुणकारी ठरतात. त्यांना आवर्जून मनुके खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय इतर अन्य शारीरिक समस्या व आजारांवर सुद्धा मनुके प्रभावी ठरतात. चला तर जाणून घेऊया मनुक्यांबद्दलची अशी माहिती जी तुम्हाला आजवर कोणी सांगितली नसेल.

कसे तयार होतात मनुके?

मनुके हा एक प्रकारचा सुकामेवा असून ते द्राक्षांपासून तयार होतात. मनुक्याचे तीन प्रकार असतात. लाल मनुके, पिवळे मनुके आणि काळे मनुके! मनुका अशा प्रकारचा सुकामेवा आहे जो खाल्ल्याने शरीराला त्वरित उर्जा प्राप्त होते. तुम्हाला कधी अशक्त वाटत असेल वा थकवा जाणवत असले तर मनुके खाऊन पहा, तुम्हाला तरतरी येईल. हे यामुळे होते कारण मनुके शरीरातील शुगर लेव्हल संतुलित करण्याचे काम करतात. शरीरातील शुगर लेव्हल कमी झाल्यावर आपल्याला थकवा जाणवतो वा अशक्त वाटते.

(वाचा :- हॅंगओव्हर उतरवण्यासोबतच हा ज्यूस ७ दिवसांत करतो आरोग्याच्या समस्यांचा कायापालट!)

या रोगांवर आहे गुणकारी

नियमितपणे जर तुम्ही 5 ते 6 मनुके जरी खाल्ले तरी त्याचा मोठा परिणाम शरीरावर दिसून येतो. यामुळे रक्त स्वच्छ राहते आणि त्वचेवर कोणत्याही प्रकारच्या फोडी व डाग येत नाहीत. खास करून चेहऱ्याची त्वचा शुद्ध राहते व चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे मुरूम येत नाही. शिवाय ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सुद्धा मनुके खाल्ल्यास त्यानाही फायदा मिळतो. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा मनुके गुणकारी सांगितले जातात. या रोगांशी लढण्याची क्षमता मनुक्यांमुळे वाढते आणि हे रोग नियंत्रणात राहतात.

(वाचा :- सांधेदुखी वाढल्यास समजून जा हा आजार घालतोय विळखा, आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश!)

मनुके खाण्याची पद्धत

तुम्हाला रोज टाईमपास म्हणून मनुके खायची सवय असले तर एका वेळेला 2-3 पीस मनुके तुम्ही खाल्ले तर उत्तम! पण जर तुम्ही दिवसातून फक्त एकदाच मनुके खाता तर रात्री झोपण्याआधी 5 ते 6 पीस मनुके पाण्यात भिजवून ठेवावेत आणि सकाळी उठल्यावर उपाशी पोटी हे मनुके खावेत. यामुळे शरीराला जास्त लाभ मिळतील. हिवाळा आल्यावर तुम्ही या प्रमाणात थोडी वाढ करू शकता कारण हिवाळ्यात शरीराला जास्त उर्जेची गरज असते.

(वाचा :- वजन कमी करण्यासाठी ट्राय करा ‘हे’ फूड कॉम्बिनेशन, काही दिवसांतच व्हाल सडपातळ!)

दातांची सुरक्षा

जर तुमची इच्छा असेल की तुमचे दात आयुष्यभर चांगले राहावेत, तुम्हाला दातांची कोणतीही समस्या निर्माण होऊ नये तर तुम्ही नियमितपणे मनुके खाण्याची सवय लावून घेतली पाहिजे. मनुके हे दातांसाठी अतिशय गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. मनुक्यामध्ये फायटोकेमिकल असते जे दातांवरील सुरक्षा कवचाला मजबुती प्रदान करते. यामुळेच तुम्ही मनुके कितीही खाल्लेत तरी त्यामुळे दात किडत नाहीत, ना हिरड्यांना कोणता त्रास होतो. म्हणून जर तुम्हाला तुमच्या दातांचे सौंदर्य आणि आरोग्य टिकवून ठेवायचे असले तर आवर्जून मनुके खा.

(वाचा :- Diet In Arthritis : संधिवाताच्या रुग्णांनी कोणता आहार घ्यावा व कोणता टाळावा?)

बद्धकोष्ठतेपासून आराम

जर तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठतेची समस्या सतावत असेल तर मनुका तुम्हाला त्यामधून आराम मिळवून देऊ शकतो. बद्धकोष्ठतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी रोज 7 ते 8 मनुके एक ग्लास दुधामध्ये उकळवून सकाळी सकाळी ते दुध प्यावे. केवळ 7 दिवसांमध्ये तुम्हाला परिणाम दिसून येईल आणि तुमची समस्या 80 टक्क्यांपर्यंत ठीक होऊन जाईल. यानंतर मनुक्याचे प्रमाण कमी करून रोज अशाच प्रकारे दुधातून मनुक्याचे सेवन करणे सुरु ठेवा. यामुळे शरीराला इतरही अनेक फायदे होतील. चला तर मंडळी हे फायदे लक्षात घेऊन आवर्जून मनुक्याचे सेवन सुरु करा आणि निरोगी राहा. सोबतच इतरांना सुद्धा याबद्दल सांगा आणि त्यांना देखील निरोगी राहण्याचा सल्ला द्या.

(वाचा :- करायची आहे पोट, मांड्या व कंबरेवरील चरबी कमी? मग प्या ‘या’ भाजीचं सूप!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *