रणवीर सिंह विचित्र फॅशनमुळे पुन्हा चर्चेत, गळ्यात मोत्यांची माळ घातलेला फोटो केला शेअर

Spread the love

​रणवीरने गळ्यात घातली मोत्यांची माळ

रणवीर सिंहने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केलेल्या एका फोटोची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. घराच्या बाल्कनीमध्ये उभे राहून त्यानं सेल्फी काढला आहे. या फोटोमध्ये रणवीरनं पांढऱ्या रंगाचा हाफ स्लीव्ह्ज टी-शर्ट घातल्याचे आपण पाहू शकता. त्यानं डायमंड स्टडिड ईअररिंग्स, पांढऱ्या रंगाच्या फ्रेमचा गॉगल आणि डोक्यावर Gucci ब्रँडची कॅप देखील घातली आहे. या लुकमधील हाइलाइटबाबत सांगायचे झाल्यास रणवीरनं गळ्यामध्ये मोत्यांची माळही घातल्याचे दिसत आहे. रणवीर ही माळ कूल पद्धतीनं फ्लॉन्ट करताना दिसतोय. विशेष म्हणजे त्याच्या या लुकवर चाहत्यांकडून लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो.

(प्रसिद्ध अभिनेत्री असतानाही दीपिकाने करीनाची स्टाइल केली कॉपी? फोटो झाले होते व्हायरल)

​महागडी कॅप

रणवीरच्या या मोत्यांच्या माळेची किंमत तर माहिती नाही. पण त्याची कॅप प्रचंड महागडी आहे. अभिनेत्यानं त्याचे आवडतं ब्रँड ‘Gucci’ची बेसबॉल कॅप घातली होती. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर या कॅपमध्ये तुम्हाला दोन प्रकारचे पर्याय दिसतील. एका कॅपमध्ये पुढील बाजूस लेदर पॅच जोडण्यात आलाय तर दुसरी कॅप कॅनव्हास हॅट वेबसह उपलब्ध आहे. अनुक्रमे या कॅपची किंमत जवळपास ३१ हजार ७०३ रुपये आणि २८ हजार ७५४ रुपये एवढी आहे. फोटोमध्ये रणवीरची कॅप स्पष्टपणे दिसत नसल्याने यापैकी नेमकी कोणती टोपी त्यानं घातली आहे, हे सांगणे कठीण आहे.

(अनुष्का शर्मा ‘या’ क्लोदिंग ब्रँडची आहे मालकीण, स्वस्त किंमतीत मिळतात मस्त स्टायलिश कपडे)

​स्कर्ट आणि लेहंगा

रणवीर सिंहला कित्येकदा लेहंगा आणि स्कर्ट अशा वेशभूषेमध्येही पाहिले गेलं आहे. एका कार्यक्रमासाठी रणवीरनं निळ्या रंगाचा प्लीटिड डिझाइनचा स्कर्ट पँटवर घातला होता. यावर त्यानं मँचिंग रंगाचे कॉलर्ड शर्ट परिधान केलं होतं. पण या अवतारातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलं. यानंतरही रणवीर सिंहनं अशा पद्धतीचे आउटफिट्स परिधान करणं सुरूच ठेवलं. या अभिनेत्याने स्वतःच्या रिसेप्शन पार्टीमध्येही शेरवानीसह पायजमाऐवजी स्कर्ट घातला होता. पण त्याचा हा लुक शानदार होता.

(को-स्टारच्या पार्टीमध्ये दीपिका पादुकोणची हजेरी, स्टायलिश पारंपरिक ड्रेस केला होता परिधान)

​या टॉपमुळे रणवीर झाली होती टीका

केवळ स्कर्टमुळेच नव्हे तर रणवीर आपल्या शर्ट आणि टॉपच्या सिलेक्शनमुळेही नेहमीच चर्चेत असतो. एकदा रणवीरनं लाँग लेंथची मेन्स सँडो बॉडी घातली होती, यावर त्यानं ग्लोव्हज देखील घातले होते. साधारणतः असा लुक महिलावर्ग कॅरी करताना दिसतात. तर दुसरीकडे एका कार्यक्रमासाठी या अभिनेत्याने पोल्का डॉट्स रफल डिझाइनचे शर्ट घातले होते. यावर त्यानं लाल आणि पिवळ्या रंगाचे स्ट्राइप डिझाइन असणारी पँट मॅच केली होती आणि कॅप देखील घातली होती.

(दीपिका पादुकोणचा ‘हा’ ग्लॅमरस अवतार पाहुन नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या होत्या अशा प्रतिक्रिया, म्हणाले…)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *