रब ने बना दी जोडी! विराटच्या वाढदिवशी अनुष्काने परिधान केला होता ‘हा’ सर्वात सुंदर ड्रेस

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या प्रेग्नेंसी तसंच स्टायलिश आउटफिटमुळे भरपूर चर्चेत आहे. अनुष्का शर्मा क्रिकेटच्या स्टेडिअमवर पती विराट (Virat Kohli) आणि त्याच्या संपूर्ण टीमला प्रोत्साहन देतानाचे क्षण असोत किंवा स्टायलिश ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लाँट करतानाचे सुंदर फोटो असोत; जिकडे-तिकडे या रोमँटिक कपलचीच चर्चा आहे. चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केल्या दिवसापासून अनुष्काची फॅशन बदलल्याचे दिसत आहे.
(ऐश्वर्या रायपासून ते अनुष्का शर्मापर्यंत, ‘या’ दागिन्यांशिवाय राहू शकत नाहीत हे ५ स्टार्स)

बहुतांश वेळा ओवरसाइझ्ड टी-शर्ट, कम्फर्टेबल ड्रेस, स्ट्राइप डिझाइन मॅक्सी ड्रेस, रोमँटिक ड्रेस, ऑफ-शोल्डर बॉडीकॉन, डिझाइनर सूट आणि साड्यांमध्ये दिसणाऱ्या अनुष्का शर्माची मॅटर्निटी फॅशन देखील हटके आहे. सध्या अनुष्का स्टाइलसह कम्फर्टेबल लुक कॅरी करताना दिसतेय. अनुष्काने पती विराट कोहलीच्या ३२ व्या वाढदिवशीही सुंदर ड्रेस परिधान केला होता.
(अनुष्का शर्मा आणि करीना कपूरच्या मॅटर्निटी फॅशनची रंगली चर्चा)

​गुलाबी ड्रेसमध्ये दिसत होती सुंदर

विराट कोहलीनं (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमसह आपला वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनसाठी अनुष्का शर्माने फिकट गुलाबी रंगाच्या A लाइन रफल डिझाइनर ड्रेसची निवड केली होती. यावरील गडद रंगाच्या फ्लोरल मोटिफ्स डिझाइनमुळे ड्रेसला आकर्षक लुक मिळाला आहे. या लुकसाठीही अनुष्काने लाइट टोन मेकअप केला होता. या पेस्टल ड्रेसमुळे अनुष्काला स्टाइलसह कम्फर्ट लुक मिळाला आहे.

(प्रेग्नेंसीमध्ये अनुष्का शर्मा परिधान करतेय अशा प्रकारचे स्टायलिश आउटफिट)

रब ने बना दी जोडी !

​प्रेग्नेंसी ग्लो

पती विराट कोहलीच्या वाढदिवशी अनुष्का शर्माने सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर श्रुती संचेतीने डिझाइन केलेला प्लंजिंग नेकलाइन असलेला काळ्या रंगाचा मॅक्सी ड्रेस घातला होता. बनी बेल स्लीव्ह्जमुळे या ड्रेसला आकर्षक लुक मिळाला आहे. या ड्रेसच्या स्लीव्ह्जवर रंगीबेरंगी धाग्यांची सुंदर एम्ब्रॉयडरी तुम्ही पाहू शकता. या एम्ब्रॉयडरी वर्कमुळेच ड्रेसला कूल लुक मिळाला आहे. या पॅटर्नचा ड्रेस गर्भवती महिला सहजरित्या परिधान करू शकता.

(देबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न, असा होता वेडिंग लुक)

​अनुष्काच्या ड्रेसची किंमत

अनुष्का शर्माच्या संपूर्ण लुकबाबत सांगायचे झाले तर तिनं नेहमीप्रमाणे लाइट टोन मेकअपसह स्मोकी आईज, गुलाबी रंगाचे लिपस्टिक लावलं होतं.

(ड्रेस पाहिल्यानंतर लोक म्हणाले, अनुष्का शर्मानंतर आता पक्का प्रियंका चोप्राचा नंबर)

मोठे-मोठे हुप्स ईअररिंग्ज परिधान केले होते, या लुकमध्ये अनुष्का अतिशय मोहक आणि सुंदर दिसत होती. दरम्यान विराट कोहलीच्या वाढदिवशी अनुष्का शर्माने परिधान केलेल्या या डिझाइनर ड्रेसची किंमत २८ हजार रुपये एवढी असल्याचे म्हटलं जातं आहे.

(Bollywood Fashion अनुष्का शर्माच नव्हे तर या अभिनेत्रींनीही प्रेग्नेंसीमध्ये परिधान केले होते स्विमसूट)

​अनुष्काचा हटके आणि स्टायलिश लुक

दरम्यान यापूर्वीही स्टायलिश व हटके आउटफिट परिधान केल्यानं अनुष्का शर्मा चर्चेत राहिली आहे. याआधी अभिनेत्रीने दोन हजार रुपयांचे काळ्या रंगाचे सुंदर टॉप परिधान केलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओसाठी अनुष्काने काळ्या रंगाच्या कोल्ड-शोल्डर टॉपची निवड केली होती. हे टॉप फॅशन लेबल Asosने डिझाइन केलं होतं.

(Stylish Bag वेस्ट बॅग्सचा ट्रेंड भन्नाट)

कोल्ड-शोल्डरसह या टॉपमध्ये स्पेगेटी स्ट्रिप देखील तुम्ही पाहू शकता. या आकर्षक आणि कम्फर्टेबल टॉपमध्ये अनुष्का नेहमी प्रमाणे सुंदर दिसत आहे. कूल लुकसाठी अनुष्काने लाइट टोन मेकअपसह सॉफ्ट कर्ल्स हेअर स्टाइल केली होती.

(इतक्या वर्षांनंतर जेव्हा माधुरी दीक्षितच्या स्टायलिश ड्रेसबद्दल ट्रोलर्स म्हणाले, ‘अखियाँ मिलाऊँ या चुराऊँ…’)

या पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली गुड न्यूज

अनुष्का शर्माचा स्टायलिश अवतार
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *