रात्री गाढ झोप मिळण्यासाठी लक्षात ठेवा या ७ गोष्टी

Spread the love

मुंबई टाइम्स टीम
गेले आठ महिने करोनाची भीती आणि कामाचा व्याप या सर्वांचा परिणाम मानसिक आरोग्यावर (Health) झाला. अनेकांना निद्रानाश, एन्झायटी यांसारख्या आजारांना सामोरं जावं लागलं. यावर्षी झोपेसंबंधी आजारांच्या प्रमाणात कमालीची वाढ झालेली पाहायला मिळाली, असं तज्ज्ञ सांगतात. विशेष म्हणजे प्रौढांसोबतच लहान मुलांनाही निद्रानाशाच्या समस्यांचा सामना करावा लागतोय अशी माहिती समोर आली आहे. न्यू नॉर्मलमध्ये नव्या उमेदीनं काम करण्यासाठी झोपेच्या योग्य वेळा, पौष्टिक आहार आणि पुरेसा व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

ध्यानधारणेचे फायदे अनेक…
गेले आठ महिने आजूबाजूच्या नकारात्मक परिस्थितीमुळे मानसिक तणावाचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळालं. झोपेसंबंधी आजारांवर योग्य उपचार घेऊन ते बरे करता येतात. पण, यावर लवकरात लवकर मात करण्यासाठी मानसिक शांतता मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ध्यानधारणा करण्याचे असंख्य फायदे आहेत. ताण-तणाव, नैराश्य, एन्झायटी व निद्रानाश हे आटोक्यात आणण्यासाठी व्यायाम आणि ध्यानधारणा करणं अत्यंत आवश्यक आहे.

सवयी बदला
दिवसभरात ठरावीक कामं सातत्यानं करत राहिल्यानं काही काळानंतर आळस येऊ शकतो. वर्क फ्रॉम होममुळे तासनतास एके ठिकाणी बसणं होतं. त्याचा कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. यासाठी तुमच्या दिनचर्येत थोडे बदल केलेत तरी हरकत नाही. घरी असताना आरामदायी कपड्यांना प्राधान्य देत असलात तरीही शक्य तितकं टापटीप राहण्याचा प्रयत्न करावा, असं तज्ज्ञ सांगतात. रिकामा वेळ लोळून वाया न घालवता तो सत्कारणी लावा.
(Health या गोष्टींमध्ये दडलीय तुमच्या आरोग्याची गुरुकिल्ली, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती)
० झोपेच्या वेळा ठरवा
रात्री लवकर झोपल्यानं मूड फ्रेश राहायला मदत होते. लहान मुलं आणि तरुणांमध्ये गॅजेट्स वापराचं प्रमाण जास्त आहे. लॉकडाउनमध्ये शरीराची योग्य हालचाल झाली नाही. परिणामी, जेवणाच्या आणि झोपायच्या वेळा बदलल्या. विनाकारण केलेलं जागरण निद्रानाशाला आमंत्रण देऊ शकतं.
(Health Care Tips ‘या’ सात पदार्थांचे सेवन केल्यानंतर पाणी पिण्याची चूक करू नका, अन्यथा…)
झोप येण्यासाठी
– झोपण्याआधी गरम पाण्यानं अंघोळ करा.
– संगीत ऐका.
– झोपायच्या आधी खांदे आणि मानेवर हलका ताण येण्यासाठी स्ट्रेचिंग करा.
(काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती)
० स्क्रीनटाइमला आवर घाला…
आजकाल स्क्रीनसमोर बसण्याचं प्रमाण भरपूर वाढलंय. कामाव्यतिरिक तासनतास स्क्रीनसमोर बसणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. गॅजेट्सच्या अतिवापरामुळे झोपेचं चक्र बिघडतंय. डॉक्टरांच्या मते, स्क्रीनमधून निळा प्रकाश बाहेर पडत असतो. ज्यामुळे शरीरातील मेलेटोनीन संप्रेरकाचा (झोप येण्यासाठी मदत करणारं संप्रेरक) नैसर्गिक स्राव कमी होऊ शकतो. परिणामी, झोपेसंबंधी आजारांच्या प्रमाणात वाढ जाणवू लागते.

काय कराल?
– पालकांनी मुलांसाठी प्रकाशाचं प्रमाण कमी असणाऱ्या खोलीची निवड करावी.
– डोळ्यांवर येणारा अतिरिक्त ताण रोखण्यासाठी स्क्रीनचा ब्राइटनेस कमी करा किंवा नाइट मोड ऑन करा.
– शक्य असल्यास रात्रीच्या वेळी घरात कमी प्रकाश असणारे दिवे लावावेत, असं तज्ज्ञ सांगतात.

० पौष्टिक खा…
सुदृढ राहण्यासाठी पौष्टीक आहार आणि पुरेसं पाणी शरीरात जाणं अत्यंत गरजेचं आहे. आहारात फळं, हिरव्या पालेभाज्या, कोशिंबीर आणि सुक्या मेव्याचा समावेश करा. तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन केल्यानंसुद्धा झोपेवर परिणाम होऊ शकतो. लॉकडाउन काळात मद्यपान करण्याचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळालं. मद्याच्या अतिसेवनानं कित्येकांना निद्रानाशाचा त्रास सुरु झाला. मद्य मज्जासंस्थेवर थेट परिणाम करतं. यासोबतच कॅफेनचं विनाकारण सेवन देखील झोपेचं गणित बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं.

संकलन- तेजल निकाळजे, साठये कॉलेज


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *