रात्री झोपण्यापूर्वी गुळाचे सेवन का करावे? आरोग्यदायी लाभ माहीत आहेत का, जाणून घ्या

Spread the love

गुळाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात. यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात. काही जण साखरेऐवजी नियमित गुळाचा चहा पितात. गुळामध्ये पोषक तत्त्वांचा अधिक प्रमाणात समावेश असल्यास घराघरांत गुळाचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे.
(चालण्याचा व्यायाम कोणत्या वेळेस करणं आरोग्यास असते अधिक फायदेशीर? जाणून घ्या)

प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन बी ६, फॉलेट, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस आणि सेलेनिअम यासारख्या कित्येक पोषक घटकांचा गुळामध्ये खजिना आहे. विशेष म्हणजे यामध्ये फॅट्स अजिबात नाहीत. यामुळे फिट राहण्यासाठी गूळ खाण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळी देखील देतात. सविस्तर जाणून घेऊया गूळ खाण्याचे फायदे…
(Health Care रक्तवाहिन्यांचे आजार, जाणून घ्या लक्षणे आणि उपचारपद्धती)

​आरोग्यासाठी गुळाचे फायदे

हिवाळ्याच्या दिवसांत आजार दूर ठेवण्यासाठी गुळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. गुळामध्ये आढळणारी पोषण तत्त्वे संसर्गाविरूद्ध लढण्याचे आणि शरीराचे संरक्षण करण्याचे कार्य करतात.

(हिवाळ्यात आरोग्य निरोगी राहण्यासाठी कशा पद्धतीने घ्यावी स्वतःची काळजी, जाणून घ्या माहिती)

फिटनेसाठी : गुळामध्ये पोटॅशिअमची मात्रा भरपूर असते. पोटॅशिअम आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटची पातळी संतुलित ठेवण्याचे कार्य करते. तसंच चयापचयाची क्षमता वाढण्यासही मदत मिळते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गुळाचे सेवन केल्यास शरीरात अतिरिक्त पाणी जमा होण्याची समस्याही दूर होण्यास मदत मिळेल.

​बद्धकोष्ठतेची समस्या

पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास उपयुक्त असलेल्या पोषण तत्त्वांचा गुळामध्ये साठा आहे. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. विशेषतः बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. तसंच यातील पोषक घटक डाययुरेटिक स्वरुपातही कार्य करतात आणि शरीरामध्ये मल अथवा विषारी पदार्थ जमा होऊ देत नाहीत. जेवणानंतर गुळाच्या छोट्या तुकड्याचं नियमित सेवन केल्यास आपल्या पचनसंस्थेचं कार्य सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. यातील औषधी गुणधर्मांमुळे अन्नपदार्थांचे पचन सहजरित्या होते.

(सब्जाचे सेवन करण्याची योग्य वेळ आणि पद्धत, जाणून घ्या सविस्तर माहिती)

​मासिक पाळीतील त्रास कमी होतो

शरीरास आवश्यक असणारे अनेक प्रकारचे पोषक घटक गुळामध्ये आढळतात. मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी कमी करण्यासाठी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. सोबतच गुळातील पोषण तत्त्वांमुळे आपला मूड देखील चांगला राहतो. गुळाच्या सेवनामुळे शरीरात एंडोर्फिन हार्मोनचा स्राव होतो, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही गुळाचे सेवन करणं लाभदायक असते.

(Health Care Tips मधुमेहींनी उत्सवांमध्ये केवळ मिठाईच नव्हे तर ‘या’ गोष्टींपासूनही राहावे दूर)

​यकृत राहते निरोगी

गुळातील पोषण तत्त्व आपले शरीर नैसर्गिक स्वरुपात स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. यातील औषधी गुणधर्म यकृत स्वच्छ ठेवण्यासह शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर फेकण्याचे कार्य करतात. सोबतच यकृत डिटॉक्सिफाय देखील करतात. यामुळे यकृतावरील अतिरिक्त ताण कमी होतो. ज्यामुळे यकृताचे आरोग्य निरोगी राहते.

(कृति सेनॉनच्या फिटनेसचे ‘हे’ आहे सीक्रेट, जाणून घ्या तिचं वर्कआउट प्लान)

​अ‍ॅनिमिया

लोहाचा उत्तम स्त्रोत म्हणजे गूळ. शरीराला योग्य प्रमाणात लोहाचा पुरवठा झाल्यास लाल रक्त पेशींची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते. तसंच शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही. गुळाच्या सेवनामुळे हिमोग्लोबिन वाढते. गर्भवती महिलांनीही गुळाचे सेवन करणं लाभदायक ठरते. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. शरीरातील थकवा दूर होतो.

(Health Care करीना कपूरची न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरकडून जाणून घ्या आवळा खाण्याचे फायदे)

NOTE आहारामध्ये गुळाचा समावेश करावा किंवा करू नये? तसंच किती प्रमाणात गूळ खाणे शरीरासाठी योग्य ठरेल? याबाबतचा सल्ला आपल्या आहारतज्ज्ञांकडून घ्यावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *