रितेश-जेनेलियाचा लव्ह फॉर्म्युला वापरल्यास पत्नीशी होणार नाहीत कधीच वाद!

Spread the love

यात काही शंका नाही की रितेश (ritesh deshmukh) व जेनेलिया (genelia d’souza) कुल आणि लवली कपल्सपैकी एक आहेत. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर देखील दोघांनीच बॉन्डिंग इतकी भारी आहे की नवीन लग्न झालेली जोडपी व प्रियकर-प्रेयसी देखील या प्रेमापुढी फिकी पडतील. नातं आनंदी व चिरतरुण ठेवण्यासाठी रितेश व जेनेलिया दोघेही सारख्या पट्टीतले प्रयत्न करतात. ज्यामुळे त्यांचा बॉन्ड दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. सर्वांनाच एक सुखी व आनंदी संसार हवा असतो पण प्रत्येकाच्या नशीबी हे सुख येत नाही.

काही काही जोडप्यांमध्ये दररोज विविध व छोट्या मोठ्या गोष्टींवरुन वाद होत असतात. कधी कधी वाद इतके टोकाला जातात की प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहचतं. दोघांच्या या वादात दोन्ही कुटुंबीय होरपळून निघतात. म्हणूनच वाद टाळून समाधानी राहिलेलंच बरं असतं. त्यामुळे रितेश-जेनेलिया एकमेकांना खुश व आनंदी ठेवण्यासाठी ज्या टिप्स वापरतात त्या फॉलो करुन तुम्हीही वाद टाळू शकता व रिलेशनशीप इम्प्रूव्ह करु शकता.

वय फक्त नंबर

रितेश व जेनेलियाच्या वयातील अंतर खूप आहे. रितेश १९७८ मधील तर जेनेलिया १९८७ मधील आहे. या वयातील अंतरापेक्षा दोघांनीही ट्यूनिंग व समजुतदारपणा किती आहे? यावर भर दिला. यानंतर दोघांनाही ते एकमेकांसाठी परफेक्ट आहेत ही जाणीव झाली तेव्हा कुटुंबीयांच्या सहमतीने दोघे विवाहबद्ध झाले. लग्न ठरवताना सर्वात आधी वधु-वरातील अंतर पाहिले जाते पण दोघांमध्ये प्रेम व समजुतदारपणा चांगला असेल तर वय दुय्यम मानले जाते. हे आजकालची तरुण पिढी समजू लागली आहे म्हणूनच आजकालची मुलं आपल्यापेक्षा मोठ्या मुलीशी लग्न करु लागले आहेत.

(वाचा :- ‘या’ ५ गोष्टींवरुन ओळखा तुम्ही आई-बाबा बनण्यास आहात मानसिकरित्या तयार!)

एकत्र वेळ व्यतीत करणे

रितेश देशमुख कामात व्यस्त असतो तर जेनेलिया सध्या चंदेरी दुनियेपासून दूर आहे. एकाचं व्यस्त राहणं व दुस-याचं घर सांभाळणं, ही स्थिती कित्येकदा जोडप्यांमध्ये दुरावा घेऊन येते. कारण त्यांना एकत्र वेळ व्यतीत करण्यासाठी खूप कमी संधी मिळतात. त्यामुळे रितेश-जेनेलियाने ठरवलं आहे की, दोघेही एकाच शहरात असताना एकत्र जेवण करणार जेणे करुन दोघांना एकत्र राहण्यास, गप्पा मारण्यास वेळ मिळेल. यासोबतच ते कपल आउटिंगसाठीही जातात.

(वाचा :- ‘या’ ५ गोष्टी सांगतात नात्यातील प्रेम चाललंय आटत, वेळीच घाला वाईट सवयींना आवर!)

प्रेम व्यक्त करणं

एका मुलाखतीत रितेशने सांगितले होते की, जेनेलिया खूप बिनधास्त असल्यामुळे ती आपल्या भावना व प्रेम अगदी मनमोकळेपणे व्यक्त करते. तर रितेश आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गर्दीतही जेनेलियाचा हात घट्ट पकडून ठेवतो व तिला डेटवर घेऊन जाण्यासारखे फंडे वापरतो. अर्थातच हे जोडपं आपलं प्रेम व्यक्त करायला अजिबात मागे-पुढे पाहत नाही. याच कारणामुळे लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही दोघांतील प्रेम व रोमांस जिवंत आहे.

(वाचा :- Tips For Single people – लग्नापासून दूर पळण्यापेक्षा ‘या’ ५ गोष्टींवर करा लक्ष केंद्रित!)

आदर व सपोर्ट

वयातील अंतर, एकाचं वर्किंग असणं व दुस-याचं घर सांभाळणं, मुलांची जबाबदारी सांभाळणं अशी तारेवरची कसरत तेव्हाच शक्य होते जेव्हा जोडप्यामध्ये एकमेकांप्रती आदर असतो व ते एकमेकांना ठाम साथ देतात. रितेश जेनेलिया फक्त एकमेकांच्या आवडी-निवडीचा आदरच करत नाहीत तर एकमेकांना सुख-दु:खाच्या काळात साथही देतात. कोणते वाद झाले तर ते संवाद साधून सोडवतात. म्हणूनच आजवर दोघांमध्ये वादाचे प्रसंग कधी उद्भवले नाहीत.

(वाचा :- अफेयर करणा-या नव-याला ‘या’ अभिनेत्रींनी दिली दुसरी संधी, हे कितपत सुरक्षित आहे?)

मुलांनंतरही प्रेम चिरतरुण

खरं तर प्रेमात पडल्यानंतर व लग्न झाल्यानंतरचा सुरुवातीचा काळ प्रत्येक जोडप्यासाठी विलक्षण आनंद देणारा किंवा अनोखा असतो. या काळात पती-पत्नी दोघेही एकमेकांना खुश पाहण्यासाठी वाटेल ते करण्यास तयार असतात शिवाय ते जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत व्यतीत करतात. पण मुलं झाल्यानंतर त्यांची प्राथमिकता बदलते व जास्तीत जास्त वेळ त्यांचा मुलांची जबाबदारी पार पाडण्यात जाते. कुठेतरी याचा परिणाम नात्यावर होतो. असं होऊ नये असं वाटत असेल तर रितेश-जेनेलियाचा फॉर्म्युला वापरा व मुलं झाल्यानंतरही प्रेम चिरतरुण ठेवा.

(वाचा :- सुपरस्टार रजनीकांतचंही झालं होतं ब्रेकअप, पण नव्या जीवनसाथीने असं सावरलं त्यांचं आयुष्य!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *