लग्नादिवशी दिसायचं आहे आकर्षक? मग एक महिना आधीपासूनच सुरु करा ‘हा’ स्पेशल डायट!

Spread the love

नारळ पाणी व नारळाचे दूध

लग्नाआधी तुम्ही खरेदीला जा अथवा घरातच राहा पण रोजच्या रोज नारळ पाणी मात्र न चुकता प्या. कारण कोरड्या त्वचेचे पोषण करण्यासाठी नारळ सर्वोत्तम ठरतो. कोरडेपणामुळे जेव्हा त्वचा काळवंडलेली, निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागते तेव्हा नियमित नारळाच्या दूधाने चेहर्‍याचा मसाज केला तर त्वचा पुन्हा स्निग्ध तुकतुकीत आणि आभायुक्त दिसायला लागते. खरे पाहता त्वचेसाठी नारळाचे दूध किंवा पाणी म्हणजे एक वरदानच आहे. कारण नारळ पाणी शरीराला हायर्डेटेड ठेवते. या व्यतिरिक्त फेशियल मसाज करताना देखील नारळाचे दूध क्रीममध्ये मिसळून वापरावे. असे केल्याने त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.

त्वचेप्रमाणे डोक्यावरील केसांसाठीही नारळाचे दूध अतिशय पोषक आणि गुणकारी ठरते. केस वाढत नसल्यास नारळाच्या दुधाचा उपयोग उपकारक ठरतो. नारळाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन ई ची गोळी फोडून घालावी व मिश्रणाने टाळूला हलक्या हाताने मसाज करावा. असे आठवड्यातून किमान दोनदा करावे. या प्रयोगाने निश्चितच केसांचे आणि टाळूच्या त्वचेचे आरोग्य सुधारेल.

(वाचा :- नाश्त्यामध्ये पौष्टिक स्प्राऊट्स खाताय? मग ही माहित जाणून घ्याच!)

भरपूर पाणी प्या

भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि चेह-यावर चमक येते. असं म्हणतात की जो व्यक्ती भरपूर पाणी पितो त्याला जास्त आजार होत नाही आणि त्याची त्वचाही रेशमासारखी तलम राहते. म्हणूनच तहान लागली नसेल तरी लग्नाआधी जास्तीत जास्त पाणी पिण्यास सुरुवात करा. सोड्याच्या एका बॉटलमध्ये १० चमचे साखर असते ज्यामुळे स्किन ब्रेकआऊट्स होतात. त्यामुळे सोडा, कोकोकोला किंवा इतर कोणत्याही पेयांचे सेवन करु नये. साधं पाणी पिऊन तुम्ही त्वचा उजळदार बनवू शकता तर गरम पाणी पिऊन वजन कमी करु शकता.

(वाचा :- ‘या’ पदार्थांसोबत दही खाणं टाळा अन्यथा…!)

ब्राऊन राईस आणि ब्रेड

भात असो वा ब्रेड, कायम ब्राऊन व्हरायटीमधील पदार्थांचेच सेवन करा. सॅंडविच किंवा टोस्टसाठी मल्टिग्रेन ब्रेडचा वापर करा. शेतात उगवणाऱ्या तांदळाच्या दाण्यावर तांबूस रंगाचं टरफल (हस्क) असतं. हे टरफल आरोग्यदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असतं. यामध्ये अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. जेव्हा तांदूळ यंत्राद्वारे पॉलिश केला जातो, तेव्हा त्याचं टरफल पूर्णपणे काढून टाकलं जातं. त्यामुळे उरलेल्या तांदळाच्या दाण्यातली अत्यावश्यक आणि महत्त्वाचं घटक बाजूला काढलं जातात आणि उरतो तो फक्त पिठूळ पदार्थांचा गोळा. या ब्राउन राइसमध्ये २१६ कॅलरी, ६ ते ७ पटीनं जास्त म्हणजे चार ग्रॅम फायबर, पिष्टमय पदार्थ फक्त ४१ ग्रॅम असतं. वजन कमी करण्यासाठी पांढरा भात सोडावा लागतो. मात्र, आहारातील एकूण कॅलरी सांभाळत ब्राउन राइस वाटीभर जरी रोज खाल्ला ना तरी वजन कमी होऊ शकतं.

(वाचा :- डायट प्लानमधून ‘हे’ पदार्थ करा कमी, लठ्ठपणा आणि आरोग्यावर दिसून येतील चांगले परिणाम!)

घरचं जेवन आणि भरपूर फळं खा

लग्नाआधी काही महिने बाहेरील जंक फुड खाण पूर्णत: बंद करा आणि घरातील पौष्टिक व सात्विक जेवण खाण्यास सुरुवात करा. सोबतच प्रोसेस्ड फुडपासूनही लांब राहा. दिवसाची सुरुवात फळं खाऊन करण्यापेक्षा अजून काय चांगलं असू शकतं? सकाळी सकाळी कोमट पाणी प्यायल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचं सेवन करा. यामुळे चेह-यावर चमक तर येईलच शिवाय एक वेगळाच फ्रेशनेस जाणवेल.

(वाचा :- ओट्स आवडत नसतील तर ट्राय करा ‘हे’ पौष्टिक पर्याय)

ब्रेकफास्ट जास्त पण डिनर कमी करा

संपूर्ण दिवसभर शरीराला एनर्जेटिक म्हणजेच उर्जावान ठेवण्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट खूप आवश्यक असतो. सकाळच्या वेळी मेटाबॉलिज्म जलद आणि संध्याकाळी तो कमी असतो. त्यामुळे सकाळच्या वेळी नाश्ता जास्त किंवा जड नाश्ता करा पण रात्रीचं जेवण एकदम कमी प्रमाणातच सेवन करा. सोबतच पटापट जेवण्याची सवय सोडून द्या. पटापट खाणारे लोक जास्त जेवतात. याचं कारण हे आहे की पोटाकडून मेंदूला संदेश पोहचायला वेळ लागतो. यामुळे आरामात खा आणि कमी खा. तर मंडळी आहारात हे काही बदल करुन तुम्ही वजनावर नियंत्रण मिळवू शकता आणि लग्नादिवशी आकर्षक दिसू शकता.

(वाचा :- ‘या’ बहुगुणी पदार्थापासून बनवा आरोग्यदायी आणि सर्वात टेस्टी नाश्ता!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *